Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची शहरात जोरदार कारवाई, मुजोर दुकानदार, व्यापार्‍यांची बेकायदा अतिक्रमणे हटविली.

karwai pmc market yard

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे, शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानदार व व्यापार्‍यांनी मनमानीपणे दुकानाच्या पुढे पाच/दहा/१५ फुटांचे बेकायदा अतिक्रमण करून, पदपथावरून चालणार्‍यांना नेहमीचा अडथळा ठरत होता. अशा मुजोर दुकानदार व व्यापार्‍यांविरूद्ध पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

पुण्यातील सर्व पेठा तसेच लगतच्या उपरात मोठे दुकानदार व व्यापार्‍यांनी राजकीय आश्रयाचा वापर करून, बेकायदा अतिक्रमणे करणे सातत्याने सुरू ठेवले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्मिाण होवून, वाहतुक कोंडी सातत्याने होत आहे. यावर पुणे महापालिकेतील अतिक्रमण विभागाने कारवाई सत्र करून, शहरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे.
पथारी व्यावसायिकांची हातचलाखी –
मागील पाच/दहा वर्षांपासून पथारी व्यावसायिकांच्या संदर्भात केंद्र व राज्य शासनाने नियम व उपबंध तयार केले आहे. त्या अनुषंगाने त्यांचे पुनर्वसन व्यवस्थितरित्या करण्यात आले आहे. तथापी एकाच परवान्यावर दोन ते तीन ठिकाणी व्यवसाय थाटले जात असल्याचे दिसून येत आहे. या शिवाय नियमित दिलेल्या भूखंडावर व्यवसाय करून देखील पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून, व्यवसाय केले जात आहेत. याबाबतच्या काही तक्रारी पुणे महापालिकेत आलेल्या असल्याचे समजते.
एकाच परवान्यावर दोन ते तीन ठिकाणी व्यवसाय करीत असल्याने पथारी व्यावसायिकांना नेमून देण्यात आलेली आजची सवलत हक्क स्वरूपात ते मांडू व सादर करू लागले आहेत. परवान्याचा सातत्याने दुरूपयोग सुरू आहे. याबाबत काही ठिकाणी कारवाई करीत असतांना, ह्या बाबी सकृतदर्शनी समोर येत आहे. दरम्यान ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची पुणेकरांची मागणी असल्याने, बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणाविरूद्ध सातत्याने कारवाई करण्याची मागणी पुणेकरांकडून होत आहे.