Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कोंढवा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याने पोसलेल्या सांडांची पुणे महापालिकेत झुंडशाही

अगरवाल व हुसेन पठाण या बेकायदा बांधकामाच्या टोळीविरोधात पोलीस महासंचालक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली
महापालिका आयुक्त व शहर अभियंता कार्यालयाच्या कुंभकर्ण झोपेमुळे पुण्यातील पेठांचे उध्वस्तीकरण

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावानं पोलीस आयुक्तालयात दिवस-रात्र धोसरा काढला जातो. गुन्हेगारांवर नियंत्रण, गैरवाजवी वाहतुकीवर सनियंत्रण ही तर पोलीस ड्युटी तक्त्यावर नियमित छापलेलं ब्रिदवाक्यच. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, पोलीसांची ना गुन्हेगारांवर पाळत, ना वाहतुकीवर नियंत्रण अशी आजची अवस्था पुणे शहर पोलीसांची झाली आहे. नागरीक व संघटनांकडून एखाद्या गुन्हेगाराबाबत तक्रार अर्ज आल्यास, त्यावर कार्यवाही केली जातच नाही. एका पोलीस स्टेशन मधुन दुसर्‍या पोलीस ठाण्यात व दुसर्‍या पोलीस ठाण्यातून पहिल्या पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाचा प्रवास सुरू असतो. महिलांची सुरक्षा, बालकांचे शोषण, ज्येष्ठांना आधार याबाबत नेहमी कंठशोष केला जातो, त्यासाठी नामधारी वेगवेगळे ऍप पुणे शहरात कार्यरत आहेत. परंतु पुणे शहर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी दहा/ १० वेळा लावुन देखील लवकर फोन लागत नाही एवढी प्रगती पुणे शहर पोलीसांनी केली आहे. नागरीक व संस्थांच्या तक्रार अर्जासंबंधी नवीन यंत्रण पुणे शहर पोलीसांनी सुरू केली आहे, तुमची तक्रार घेतली काय, तुमची तक्रार अमूक एका पोलीस ठाण्यात पाठविली आहे असे सांगुन स्वतः नामानिराळे राहणारी यंत्रण पुढील कार्यवाहीबाबत ढिम्मच असतात. एवढी कर्तव्यपारायणता पुणे शहर पोलीस दलाची आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोंढवा पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या कर्तव्य पारायणतेमुळे आज पुणे शहरात वाहतुकीची भंयकर समस्या निर्माण झाली आहे. पुणे शहर पोलीस व वाहतुक विभागांच्या ढिसाळ कारभारामुळे पुणे महापालिकेतील अभियंते सोकावले आहेत. पुण्यातील पोलीसांचे मोठे हेडर्क्वार्टर बुधवार पेठेत आहे, त्याच बुधवार, शुक्रवार, गुरूवार पेठेत कमालिचे बेकायदा बांधकामे सुरू आहेत. सर्व वाहने रस्त्यावर उभी राहत आहेत. तरी देखील पुणे शहर पोलीस व वाहतुक पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत.
पुणे शहरात चारचाकी वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. बुधवार, शुक्रवार व कसबा पेठेत तसेच सदाशिव, नारायण, रास्तापेठेत तर पाय ठेवायला देखील जागा नसतांना, गल्ली बोळातून चारचाकी वाहने दामटली व पार्कींग केली जात आहेत. हळु-हळु करून, पुढील दोन तीन वर्षात आज अस्तित्वात असलेले पाडून तेथे विना परवाना बांधकामे केल्यास पुढील ५० वर्षे ती हटविता येणार नाहीत. म्हणजे पुढील ५० वर्षात वाहतुकीवरून हिंसक घटना घडणार यात शंकाच राहिली नाही. आज कोंढवा पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्तबगार पोलीस अधिकार्‍यांमुळे बेकायदा बांधकाम करणारी टोळी अतिशय सक्रिय झाली आहे. त्याला पुणे महापालिकेतील अभियंत्यांचे साथ संमगनमत आहे. त्यामुळे ह्या विषयावर आत्ताच शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी कार्यवाही न केल्यास, भविष्यात पुणे शहरात महासंगर झालाच म्हणून समजा.
पुण्यातील पेठांमध्ये बेकायदा बांधकामे करणार्‍या टोळीला पुणे महापालिकेच्या अभियंत्यांची साथ- मनपा आयुक्त का देत नाहीत यांच्या पृष्ठस्थलावर लाथ –
पुणे शहरातील पेठा म्हणजे पुणे शहराचे वैभव आहे. आज त्याच जुन्या पुणे शहरावर बिल्डरांची संक्रांत आली आहे. पुणे महापालिकेची एका कागदावर बांधकामाची मान्यता घ्यायची आणि जागेवर मनमानी बांधकाम करण्याचा सपाटा पुण्यातील काही बेकायदा बांधकामे करणार्‍या टोळीने प्रताप सुरू केल्याची तक्रार व निवेदन पुणे महापालिका आयुक्तांना सादर केले आहे. परंतु पुणे महापालिका आयुक्तांना स्वतःच्या खुर्चीची इतकी चिंता आहे की, पुणे शहराच्या समस्या गेल्या चुलित…. आपली खुर्ची महत्वाची समजुन पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे एक एक दिवस मंत्रालयाकडे डोळे विस्फारून एका एका कागदावर सह्या करती सुटले असल्याची वार्ता आहे.
पुणे महापालिकेतील अभियंत्यांसह आगरवाल व हुसेन पठाण विरोधात पोलीस महासंचालक व अ. जाती आयोगाकडे तक्रार –
पुणे शहरात बहुतांश ठिकाणी बेकायदा बांधकामे होत आहेत. याबाबच्या तक्रारी व निवेदने विविध संस्था संघटनांकडून आयुक्तांकडे सादर आहेत. शहर अभियंता कार्यालय व मनपा आयुक्त कार्यालय कुंभकर्णासारखे गाढ झोपले आहे. अनाधिकृत बांधकामाबाबत दर मंगळवारी आढावा घेतला जातो. कागदं रंगविली जातात. परंतु प्रत्यक्षात काहीच नसते.
त्यामुळे जयंत सरवदे यांच्या विभागातील अभियंते कमालिचे निर्ढावले आहेत. याबाबत संस्था व संघटनांकडून पाठपुरावा करीत असतांना, अभियंते मनमानीपणे उत्तरे देत आहेत. याबाबतचे वृत्त मागील एक दिड महिन्यांपासून येत असल्याने सैरभैर झालेल्या अभियंत्यांनी आरवाल व हुसेन पठाण यांच्या मार्फत पत्रकारांना व संघटनांच्या प्रमुखांना धमक्या सुरू केल्या आहेत. मजल इथपर्यंत गेली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे व उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
या शिवाय पुणे महापालिकेत सातत्याने अनाधिकृत बांधकामे करणारी टोळीतील सदस्य १) विक्रम आगरवाल, २) प्रशांत आगरवाल ३) ला. आर्कि.मनिष आगरवाल, ४) आशिष आगरवाल, ५) सुशिल आगरवाल व ६) हुसेन पठाण यांना मुख्य आरोपी म्हणून तक्रार अर्जात नमूद केले आहे. तर रामचंद्र शिंदे व देवेंद्र पात्रे यांना सहआरोपी नमूद करण्यात आले आहे.
कोण हा हुसेन पठाण –
हुसेन पठाण हा पुणे महापालिकेतील नगरसेवक हाजी गफुर पठाण यांचा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. वस्तुस्थिती माहिती नसली तरी गफुर पठाण या नावानेच फोन केला जातो. दरम्यान हुसेन पठाण याने कोंढवा भागात बहुतांश ठिकाणी अनाधिकृत बांधकामे (दोन गुंठ्यावर पाच मजली इमारत, तीन/४ गुंठ्यावर पाच सहा मजली इमारत, काही ठिकाणी तीन/ तीन मजल्याचे बांधकाम) करून, कोंढवा भागात रिअल इस्टेटचा धंदा तेजित आणला आहे. कोंढवा भागातील बांधकामाचे अभियंते तर भयभित असल्यासारखेच वागत असतात. यावरून या भागात हुसेन पठाण याची किती मोठी दहशत असावी याचा अंदाज येतो.
रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र या संघटनेला स्थानिक आंबेडकरी चळवळीतील व दलित संघटनांतील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे की, हुसेन पठाण याची कोंढवा भागात मोठी दहशत आहे. त्याने कोंढव्या सहीत पुणे शहरात धमक्या व दमदाटी करून, अनेक स्थावर व जंगम मालमत्ता संपादीत केलेल्या आहेत. तसेच कोंढवा भागात तर त्याने मोठी दहशत निर्माण केली असून, इथल्या अनु. जाती, दलित तसेच हिंदू धर्मिय व बहुजन समाज घटकांना टार्गेट करून, त्यांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मुस्लिम समाला देखील याचा भयंकर त्रास आहे.
बहुतांश मुसिलम हे उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून आलेले आहेेत. काही परजिल्ह्यातूनही व काही शहरातील मुस्लिम आहेत. त्यांना तर जीव नको नकोसा करून ठेवला असल्याचे सांगण्यात आले आहे. जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून, पठाण याने पुणे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे.
सदर कोंढवा या परिसरात अनेक ठिकाणी पुणे महापालिका किंवा राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता बांधकामे केली आहेत. कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ८० ते १३० फ्लॅट/ सदनिका सबंधित इसम नामे हुसेन पठाण याचे असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर सदनिका ह्या भाडेतत्वावर देणेत आलेल्या असल्याचे समजते.
हुसेन पठाण हा एखाद्याची जागा रिकामी करणे. मोकळ्या जागेवर ताबा मारणे, दहशतीने कब्जा करणे आदि सर्व प्रकार कोंढवा भागात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. खरं तर वस्तुस्थिती काय आहे हे स्थानिक पोलीस स्टेशनला याची माहिती असू शकते. परंतु कोंढवा पोलीस स्टेशन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना दाद देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुणे शहर गुन्हे शाखेने याबाबत योग्य ती माहिती घेतल्यास याची माहिती आम्हालाही होवू शकेल. कार्यकर्त्यांकडून आलेली माहिती जशीच्या तशी शहर पोलीस व पुणेकरांपुढे आम्ही मांडली आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टोलवा – टोलवी
पुणे महापालिका ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मोडते. त्यामुळे इथल्या सर्व तक्रारी ह्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येणे स्वाभाविक आहे. शिवाजीनगर भागात घडलेल्या व होत असलेल्या अपराधाबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नागरीकांनी दिलेले तक्रार अर्ज, निवेदनांवर कार्यवाही होत नाही. ते अर्ज थेटच असंबंध असलेल्या संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून दिले जातात. ह्याप्रकरणात तर पोलीस उपायुक्त परिमंडळ एक, सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी पाठविलेल्या पत्राची नोंदच नाही. कुणाला याबाबत अधिक माहिती हवी असल्यास, ती माहिती अधिकारात कोणीही पुणेकर मागवुन स्वतः खातरजामा करू शकतो.
दरम्यान गुन्हा कुठेही घडलेला असला तरी पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद न करता, गुन्हेगारांवर कारवाई करावी असे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांचे आदेश कदाचित शिवाजीनगर पोलीस स्टेशनला लागु नसावते असे वाटते. पोलीस आयुक्तांनीच याबाबत योग्य ती माहिती घेवून शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीसांचा यथोचित सत्कार करणे योग्य ठरेल. क्रमशः