Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण

Upendra-Kushwah

पुणे: विकासाच्या अजेंड्यावर सरकार असेल, अशी चर्चा केली गेली. मात्र सरकार आल्यावर विकासाऐवजी भाजपने त्यांचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. त्यांचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. तो आमच्यासाठी नव्हे, तर देशातील लोकांसाठीही योग्य नाही.त्यामुळे सरकारमधून बाहेर पडलो अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले बिहारमधील ’राष्ट्रीय लोक समता पार्टी’चे नेते उपेंद्र कुशवाह यांनी केली.

      छगन भुजबळ यांच्यासमवेत कुशवाह यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कुशवाह विरोधकांच्या गोटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत कुशवाह म्हणाले, पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेटलो. भुजबळ गेल्या १२ वर्षांपासून माझे मित्र आहेत. भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध असून, राजकारणात त्यांचे मार्गदर्शन मिळत असते. मंत्री असतानाही त्यांच्याकडे येत असे. कुशवाह यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

      कॅबिनेटमधील निर्णय प्रधानमंत्री कार्यालयातून होतात. कॅबिनेटमध्ये फक्त चर्चा होते. कोणाशीही सल्लामसलत केली जात नाही अशी टीका करून आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची की युती किंवा महाआघाडी करून याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.       पुढील भूमिकेबाबत ते म्हणाले, आगामी काळात काय करायचे, याबाबत तीन पर्याय आहेत. लोकसभेची निवडणूक बिहारमध्ये स्वतंत्र लढवायच्या हा एक पर्याय आहे. अन्य पक्षांशी युती करून निवडणूक लढविणे हा दुसरा पर्याय असून, महाआघाडी करणे हा अंतिम पर्याय आहे. सहकार्‍यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार आहे.  मंत्रिपद सोडण्यामागील कारणमीमांसा करताना ते म्हणाले, आम्ही सरकारमध्ये असताना काही प्रश्नांसाठी सरकारविरोधात आवाज उठविला. विकासाबाबत बोलण्यात येत होते, त्यामुळे प्रश्न सुटतील असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. त्यांच्याबरोबर राहणे योग्य नसल्याचे लक्षात आल्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला.