Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात चाललेली दुकानदारी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न कोण करणार? बदली ऍक्टला नेस्तनाबुत कुणी केलं…

Pune-PWD-law

शासन निर्णयांची शुद्धीपत्रके झाली. शासन परिपत्रकांची शुद्धीपत्रके झाली. पण बदली ऍक्टचे शुद्धीपत्र झालेले नाही. मग सेंन्ट्रल बिल्डींगच्या वेशीवर या कायदयाची लक्तरे कुणी वाळत घातली आहेत.

पुणे/दि/ प्रतिनिधी/

    पुणे शहर हे सोम्या, गोम्या पासनं टोम्यापर्यंत सार्‍यांना बक्कळ भुरळ पाडणारं आहे. पण पहिला आलेला दुसर्‍याला येऊ देत नाही. आपलं वारूळ कायम अबाधित रहावी ही टेकाची गचाळ वृत्ती त्यांच्या अंगात सातत्य ठेवूनच तो वावरत असतो. दुकानदारानं शिधा उधार द्यावा, भाजीवाल्यानं भाजी उधार द्यावी अशी एक तारखेची दहा तारखेला सारखे खिसे रिकामे करणारी  नोकरी आहेच. पण हल्ली खिसे रिकामे राहतच नाहीत. वाम मार्गाने आवक वाढलेली आहे.

    कारण या ना त्या कारणाने बदली सारख्या प्रक्रियेवर त्यानं केव्हाच सूड उगवला आहे. अर्थात एकाच कार्यालयात एकाच टेबलाभोवती राबता ठेवत त्यानं आपलं वारूळ आणखी घट्ट ठेवलं आहे. त्या रेल्वे प्रवासा सारखंच अधोरेखित करणारं. रेल्वे येईल मला माझ्या स्थळी सुखरूप पोहचवेल. ही तिष्ठत ठेवणारी भावना अंकुर धरेपर्यंत तेंव्हा रेल्वे स्टेशनात घुसते. तत्क्षणी डब्यात घुसणारांची त्रेधात्रिपाट उडते. पण सारखं कसं विपरित असतं. अहो, दार उघडा ही बाहेरच्यांची साद, आत बसलेल्यांपर्यंत पोहचतच नाही. आतले मात्र घटस्फोट झाल्यासारख्या मख्ख चेहर्‍याचे छातीला माना टांगुन ढिम्म…. विनंती करणार्‍यांच्या विनंतीला शिव्याचंया नाविन्यतेचा दर्प यायला लागतो. तेंव्हा आतल्याचं कसं ठरवून केल्यासारखं छद्मी वागणं सारं कसं कोणी तरी कोणाला आडकाठी करणारं. वाटते नव्हे असतेेच.पण अशा स्थितीतसुद्धा आतल्या तोंड्या कोणीतरी अनवाळू असतो. त्याला हा सात्विक संताप आवरता येत नाही. (कनवाळू म्हणजे कुटिल डाव टाकून मजा घेणारा नव्हे.) तो उठतो आणि सपशेल दरवाजा उघडतो. बाहेरचा आत येतो आणि पुढच्या स्टेशनापर्यंत तोही आतला होवून जातो. मग तोही दरवाजा उघडत नाही.

    एवढी निर्ढावलेली परिस्थिती अधिकतेने कुठे आढळते… अशी बेलगाम कोडी घालुन आम्ही कोणाच्या बुद्धीचा गुणांक हुडकणार नाही.

    पोटाला तड लागेपर्यंत खाणार्‍या खादाडाच्या बुद्धीचा गुणांक काय अणार… शिंगे मारण्यापुरता मर्यादित… कारण आम्हाला चांगल ठाऊक आहे. डबकं सापडलं की डराव डरावं बेडकंच करणार. मोर पिसारा फुलवुन नाचणार नाही. आपण सारेच हुकूमाचे बटीक पण आपण सारे साळसुदपणे विसरतो. विसरण्याचा तसा फायदाही धेत असतो. फारच विस्ताराने लिहिण्याची आवश्यकता नाही.

    सा.बां. प्रादेशिक विभागाच्या अधिपत्याखालील सा.बां. परिमंडळ, मंडळाच्या कार्यकक्षेतील सा.बां. पुणे विभाग, सा.बां. पूर्व विभाग, सा.बां. दक्षिण विभाग, सा.बां. उत्तर विभाग, सा.बां. इमारती विभाग आणि याला जोडून येणारे उपविभाग, आणि प्रत्येक विभागाच्या श्‍वास नलिका असलेल्या शाखा यातील राजपत्रित गणल्या गेलेल्या अधिकारी वर्गातील अभियत्याचं अस्थापना – प्रशासन मंत्रालय, सा.बां. विभागात कार्यरत आहे. उरलेले वर्ग -३ व वर्ग -४, मधील कर्मचार्‍यांची अस्थापना ही त्या त्या विभागातच आणि मंडळाशी संलग्न असते. परिणामी सारखे हिताचे लागेबांधे. मग वर्ग ३ च्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत सा.बां. पुणे मंडळात बदली कायदा आणि त्याची प्रक्रिया गांभिर्याने घेतल्याचे आढळत नाही.

त्याची नेमकी कोणती कारणे आहेत ते पाहूयात

    २०१६ ते २०१७, २०१७ ते २०१८ मधील बदली प्रक्रियेत प्रकर्षाने हेच जाणवते की, २०१८ मध्ये झालेल्या वर्ग तीनच्या बदल्यांकडे लक्षपूर्वकपणे पाहिले तर ध्यानात येईल. बदली पात्र वर्ग ३ कर्मचार्‍यांचे बदल्या केल्या हे तोंडदेखले कागदोपत्री आदेशाने प्रदर्शित केले असेल तर या बदली पात्र कर्मचार्‍यांच्या बदल्या नेमक्या कोणत्या ठिकाणी कोणत्या विभागात की जिल्ह्यातील तालुक्यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या आहेत. मुळातच नाही. तर विभागातील उपविभागात यांच्या बदल्या करण्यात आल्या.

    कोणी कुठेच बदलीने रुजू झाले नाहीत. अनेविध लिखित , अलिखित नियम अधिनियम शासन निर्णय, शासन परिपत्रके आहेत, दिमतीला. त्याच्या आधाराने कार्यव्यवस्थापनाच्या नावाखाली पुनश्‍चः त्याच टेबलवर त्याच कार्यालयात वर्षानुवर्षे तेच ते चेहरे झळकत असतात, नव्हे त्या त्या विभागाच्या आस्थापनेच्या ७/१२ च्या उतार्‍यावर याचीच नोंद असते.

    तालुक्याच्या उपविभागातून विभागात बदलीने येण्यासाठी धडपडणार्‍यांचीच संख्या कमी नाही, परंतू ठेविले अंनंते तैसे…

    दूरवर कशाला, रेल्वेच्या डब्याची स्थिती वर्षानुवर्षे शिरस्ता बदलात नाही. तो पर्यंत असेच राहणार म्हटल्यासारखे आहे. २०१९ ला बदली कायदयाने वारूळ उकरायलाच हवे. मग यातीलज बदली प्रस्तावाचं योग्य परिक्षण होणे गरजेचं राहणार आहे. खेळातील स्पर्धेतील निवडी प्रमाणे तेच ते खेळाडू निवडून घेवून कार्यकारी अभियंत्याने विभाग चालवतांना जुन्या कर्मचार्‍य व्यतिरिक्त अन्य नवा कर्मचारी काम करू शकत नाही. हा न्यूनगंड हद्दपार करणे अगत्यचे राहणार आहे.     कित्येक वर्षे अन्य नव्हे पण बदली कायदयाने ज्याला सरपटणे जमलेच नाही. त्यांना बिळातून बाहेर काढणे आवश्यक ठरणार आहे. राजकीय अराजकीय शासकीय, अशासकीय व्यक्तिंच्या माध्यमातून बदी कायदयाला शहर देणार्‍यावर अंकुश ठेवतांना त्याच्या शासकीय वर्तनाची नोंदही सेवा पुस्तकात करणे महत्वाचे ठरणार आहे.