चंदनाच्या झाडाला बाभळीची सालं लावून, किती दिवस पुणे मनपा व नगर अभियंता कार्यालयाला अडचणीत आणणार…
अपचारी अभियंत्यांविरूद्ध कारवाई करण्याएैवजी बदलीचा प्रसाद
रासकरांना महाप्रसाद तर बालवेंना तिर्थप्रसाद – तिघांच्या साठमारीत पाच वर्षे रजेवर असलेल्या जयंत सरवदेंना आमदार थाळीचे धनी बनविले
पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या उपनगरातील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याच्या तक्रार अर्जावरील चौकशीची फाईल्स, पुणे महापालिका आयुक्त कार्यालय व बांधकाम विभागातून गहाळ झाली आहे. याबाबत पुणे महापालिका आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी श्री. दयानंद सोनकांबळे यांनी १० जानेवारी २०१९ रोजी बांधकाम विभागाला पाठविलेल्या पत्रातून दिसून आले आहे. दरम्यान याबाबतचे वृत्त मागील आठवड्यात प्रसिद्ध झाल्यानंतर, शहर अभियंता कार्यालयाने बुधवार दि. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी १० कनिष्ठ अभियंत्यांचे बदलीचे कार्यालयीन आदेश जारी करून, त्यात प्रताप बालवे यांची बदली, झोन ५ मधील कोंढवा खुर्द, कात्रज विभागात करण्यात आली आहे. तर रासकरांना खराडीतच ठेवण्यात आले आहे. पुणे महानगर पालिकेतील बहुतांश नगरसेवक आज ठेकेदार झाले आहेत,तर अधिकारी, अभियंते हे बिल्डर वा बिल्डरलॉबीसाठी काम करणारे कर्मचारी झाले आहेत. शहर अभियंता कार्यालयाने केलेल्या बदल्यांमागे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच बदल्या केल्या असल्याचे दिसून येत आहे. बदली आदेशावर नगर अभियंता कार्यालयाची सही असली तरी प्रत्यक्षात तिसरीच यंत्रणा सुत्रे हलवित असल्याचेही दिसून आले आहे. यावरून हे प्रकरण किती गंभिर स्वरूपाचे आहे याचा पुणेकरांना अंदाज आलेला आहे.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातून चौकशीच्या फाईल्स गहाळ झाल्या हे एक कारण असले तरी, या सर्व बदली प्रकरणांमागे निश्चितच पुणे शहरातील बिल्डर लॉबीचा मोठा हात असल्याचे दिसून येत आहे. कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करून, प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु पुणे महापालिका झोन १ व झोन ४ मधील संगित खुर्चीचे प्रकार समोर आले आहेत. पुणे मनपा बांधकाम विभागाच्या झोन ४ चे कारभारी श्रीधरपंत येवलेकर हे देखील झोन ४ व ७ मध्ये घातलेल्या गोंधळातून सहिसलामत बाहेर पडले आहेत. ते आता झोन ६ मध्ये दाखल झाले आहेत. तर झोन ४ च्या रिक्त पदांवर पंतप्रधान आवास योजनेत अवघे काही दिवस राहिलेल्या जयंत सरवदे यांची नियुक्ती केली आहे. तर झोन १ मधील कार्यकारी अभियंता श्री. विलास फड हे बांधकाम विभागातील टीडीआर व झोन १ मध्ये घातलेल्या बट्ट्याबोळामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांनी झोन १ मधुन झोन चार मध्ये उडी मारली, तर झोन ४ मध्ये आलेले नवनियुक्त कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांनी झोन १ चा ताबा मिळविला.
दरम्यान या बदलीबाबतचे वृत्त नॅशनल फोरमच्या अंकात दोन आठवड्यापूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर, पुन्हा सोमवारी दुपारी मध्यान नंतर जयंत सरवदे यांनी झोन चारच्या खुर्चीवर बस्सकण मारली तर विलास फड हे पाठीच कुबड काढुन, छातीच्या पिंजर्यात बगळ्यासारखी मुंडी घालुन गुपचूप बोक्यासारखे झोन एक मध्ये येवून स्थानापन्न झाले. खरं तर दोघांच्याही बदलीची संगित खुर्ची सध्या पुणे महापालिकेत पहावयास मिळत आहे. कोण कोणत्या विभागाचे धोरणात्मक निर्णय घेत आहे, हे निव्वळ बिल्डर लॉबीलाच माहिती आहे, ५० लाख पुणेकर फक्त ह्यांचा तमाशा पाहत आहेत. आता ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर ह्या संगित खुर्चीत नेमका कोणता बदल होतोय ते पहावयाचे आहे.
कोण हे जयंत सरवदे –
जयंत सरवदे बंधूंचा बांधकाम व्यावसायिक म्हणून झालेला प्रवेश. अल्पावधीत बिल्डीत लॉबीशी झालेले घट्ट संबंध. बोटक्लब रोडशी झालेली सोयरीक. जयंत सरवदे यांचे पुणे मनाच्या अभियंतापदाच्या जाहीरातीविना रातोरात पुणे महापालिकेत अभियंता म्हणून नियुक्ती आणि काही दिवसांतच पदोन्नती. हा सर्व प्रकार एखाद्या मराठी चित्रपटात शोभेल असाच आहे.
दोन हजार १० की ११ किंवा २०१२ असू शकते. साल आता नक्की आठवत नाहीये. परंतु आपणांस आठवत असेल. पुणे शहरात मल्टिफ्लेक्स थिएटरची धूम सुरू झाली होती. एक पडदा थिएटर बंद करून, एकाच ठिकाणी चार चार पडदे असलेल्या मल्टिफ्लेक्सचा जमाना सुरू झाला होता. पुण्यात नवीन उदयाला आलेल्या सिंहगड रोड वरील अभिरूची मल्टिफ्लेक्स थिएटरचे काम अतिशय निकृष्ट आणि नियमबाह्य झाले होते. त्यामुळे या बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला दयायला कुणीच तयार नव्हते. यावेळी श्री. हेमंत देवधरांचे सारखे काही मुरब्बी कार्यकारी अभियंते कार्यरत होते. त्यांनी तर अभिरूची थिएटरची फाईल टेबलावरून भिरकावून दिली होती. परंतु याच वेळी अल्पावधीत पदोन्नत होवून उपअभियंता झालेल्या श्री. जयंत सरवदे यांनी चार वर्षे रखडून पडलेल्या व श्री. देवधरांसारख्या मातब्बर अभियंत्यांने फाईल भिरकावून दिलेल्या या थिएटरला पूर्णत्वाचा दाखला देण्याची कसब दाखविली. होय, ज्या थिएटरला पूर्णत्वाचा दाखला आजही देणे शक्य नाही, त्याच बांधकामाला श्री. सरवदे यांनी पूर्णत्वाचा दाखला दिला. हे कसे झाले. हा एक सॅरिडॉन सारख्या औषधी गोळीसारखा प्रकार आहे. खरं तर हा एक विनोदच झाला. सॅरिडॉन या डोकेदुखीवरील औषधी गोळीवर अन्नऔषध प्रशासनाने बंदी घातली आहे. परंतु सरदवे सारख्यांच्या धोरणावर मात्र कुणीही बंदी आणू शकले नाही. कारण काय…… कारण बोटक्लब.
आता हेच पहा ना, हेच जयंत सरवदे मागील पाच साडेपाच वर्षापासून मेडीकल रजेवर होते. दोन हजार १८ मध्ये पुन्हा ते पुणे महापालिकेच्या सेवेत रुजू झाले. आल्या – आल्या मलःनिस्सारण विभाग, काही दिवसांतच पंतप्रधान आवास योजना आणि काही महिन्यांतच बांधकाम विभाग, त्यातही झोन ४ आणि आता झोन एक. चित्रपट निघेल लेका-हो, चित्रपट….. आहात कुठे….
( आजचा चित्रपट समाप्त. भाग दोन पुढच्या सोमवारी..)
.सरदवे नेमके रजेवर का होते… निवडणूका आणि सरवदे…
पुणे मनपातील सॅरि-डॉन जयंत सरवदेंचे तळ्यात- मळ्यात- झोन १ की झोन ४
झोन १ मध्ये- खराडी, कळस, धानोरी, वडगांव शेरी (नवीन हद्द), हडपसर, उंड्री- महंमदवाडी
झोन ४ मध्ये – वडगांव शेरी, कल्याणीनगर, कळस, धानोरी (जुनी हद्द), विमाननगर,लोहगाव, मुंढवा, कोरेगाव पार्क (संगमवाडी टी.पी. स्कीम)
बांधकाम व्यावसायिकांचे सर्व प्रस्ताव क्रीम एरिया- खराडी आणि मुंढव्यात. सर्व प्रकरणे दोन्ही ठिकाणी अडकुन पडले आहेत. मग काय करावे. तळ्यात – की – मळ्यात (भाग २ पुढील अंकात…)
अपचारी अभियंत्यांविरूद्ध कारवाई करण्याएैवजी बदलीचा प्रसाद
रासकरांना महाप्रसाद तर बालवेंना तिर्थप्रसाद – तिघांच्या साठमारीत पाच वर्षे रजेवर असलेल्या जयंत सरवदेंना आमदार थाळीचे धनी बनविले
पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, नियमात न बसणार्या बांधकाम प्रकल्पांना मान्यता, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. ह्याला जसे अधिकारी जबाबदार आहेत, त्यापेक्षा नगरसेवक मंडळी अधिक जबाबदार आहेत. पुणे महापालिकेतील ८० टक्के नगरसेवक एकर स्वतः बिल्डर, ठेकेदार आहेत किंवा बिल्डरांच्या फाईल्स मंजुर करण्यासाठी दिवसभर अभियंत्यांच्या मागे बगलेत धोपटी मारून फिरत असतात.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात देखील ३० टक्के अभियंते, अधिकारी हे स्वतः, भाऊ व पत्नीच्या नावे ठेकेदारीचे लायसन काढण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील वेतनावरील नोकरीपेक्षा, त्या त्या कार्यक्षेत्रातील सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देवून, स्वतः बिल्डरगिरी करीत आहेत.
दरम्यान पुणे महापालिकेतील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, नियमात न बसणार्या बांधकाम प्रकल्पांना मान्यता, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याबाबतची तक्रार झाल्यानंतर, त्याच्या चौकशीचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तथापी हीच महत्वाची फाईल पुणे मनपा व बांधकाम विभागातून गहाळ झाली आहे. त्यातुनच श्री. बालवे यांची बदली केली आहे, तर रासकरांना अभय देण्यात आले आहे. वास्तविक पाहता, श्री. बालवे यांच्याकडील २० प्रकरणे असतील तर श्री. रासकर यांच्याकडील ४० प्रकरणे बाधित आहेत. त्यामुळे श्री. बालवे व रासकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होवू शकतो. यामुळेच बालवे यांची बदली जाणिपूर्वक केली आहे. बांधकाम विभागातील या साठमारीत जयंत सरवदे यांना मात्र नाहकपणे झोन चार मधुन झोन एक मध्ये विनाआदेश, विनालिखत नियुक्ती दिली आहे. दरम्यान श्री. बालवे यांच्या जागी श्री. खाडे यांची नियुक्ती झाली आहे. सध्या श्री. खाडे रजेवर आहेत. कदाचित श्री. बालवे यांच्या जागी नियुक्ती मिळावी म्हणून ते महापालिकेच्या बाहेर थांबुन पडद्यामागच्या हालचाली तर करीत तर नव्हते ना अशी शंका येते. श्री. खाडे यांना नेहमीच आखाड्यात उतरण्याची सवय झाली आहे. मध्यंतरी येरवड्यातून लोहगावात आले, आता इथं देखील येरवडा सोडून वडगाव शेरीत आले आहेत. कदाचित खाडेंना आखाडा अधिक आवडत असेल यांची दाट शक्यता आहे.
बालवे यांची बदली रद्द करून, रासकर व बालवे यांचे निलंबन नव्हे बडतर्फीचा आदेश जारी करा –
बांधकाम विकास विभागातील श्री. बालवे व रासकर यांच्या जोडगोळीने खराडी व कल्याणीनगर, वडगाव शेरीत गोंधळ माजविला आहे. त्यापैकी श्री. बालवे यांची बदली करून या प्रकरणार पडदा टाकण्याचे काम केले असले तरी हा बदली आदेश नियमबाह्य असून, बदली अधिनियमाविरूद्ध आहे. त्यामुळे बदली रद्द करून, श्री. बालवे व श्री. रासकर यांच्या निलंबन नव्हे बडतर्फीचा आदेश जारी करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र या संघटनेने प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.
(श्री.रासकर खराडीत का, औंध वा कोंढव्यात का नाहीत… मगरपट्याचे बिल्डर रासकर आणि कोद्रेंचा ह्या रासकरांच्या कामाशी संबंध आहे काय….श्री. रासकर हे पुणे मनपाचे वेतनावरील कर्मचारी की बिल्डर कार्यालयाचे मॅनेजर…. महारवतन जमिनीवर कब्जात रासकर यांची ले-आऊटगिरी….. वाचा पुढील अंकात….)
चंदनाच्या झाडाला बाभळीची सालं
ज्या घरात टाळ कटत्यात, त्या घरात चाळ घुसविण्याचे प्रयत्न –
ज्याच्या स्वतःच्या घरातही मातब्बर राजकरणी, काका देखील मोठ्या पक्षाचे नेते आणि आमदार. संपूर्ण परिवार वेल एज्युकेटेड. परंतु स्वतःच्या व्यतिक्तशः किंवा कामाच्या ठिकाणी कधीच ज्या व्यक्तीने राजकारण आणले नाही किंवा राजकारणाशी सुताएवढाही संबंध ठेवला नाही. त्या शहर अभियंता कार्यालयाला मात्र सातत्यपूर्वक बदनाम करण्याचे काम इथल्या यंत्रणेने केले आहे. खरं तर चंदनाच्या झाडाला बाभळीची सालं लावण्याची कामे, शहर अभियंता कार्यालयाकडील वेगवेगळ्या खाते/विभागांनी तसेच ताकदवार ठेकेदार, मुरब्बी अधिकारी व अभियंते यांनी केली आहेत. राजकारणी -बिल्डर-अधिकार्यांनी पोसलेल्या सटर=फटर संघटनाच्या रोडछाप कार्यकत्यांनी देखील नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या घरात मुळातच टाळ कुटले जात आहेत, त्याच घरात चाळ घुसविण्याचे प्रकार थांबविले जात नाहीत. हे आम्ही मागील तीन चार वर्षापासून सांगत होतो. मात्र आदल्या-मधल्या बडव्यांनी माझ्या विधानांचा विपर्यास केला. त्याची परिणीती आपण पाहत आहोत. माझ्या मूळ विभागासह सध्या महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आहे, अस्संच समजा. पूर्ण क्षमतेने मूळ खात्यात पुन्हा रिव्हर्ट व्हायचे आहेच. परंतु सध्या पालिकेतील झुरळ,पाली, लाल मुंग्या सोकावल्या आहेत. काळ विनाकारण सोकावत चालला आहे. यावेळचा प्रतिनियुक्तीचा काळ मोठा असेल यात वादच नाही. त्यातून चंदनाच्या झाडाला बाभळीची साल लावणार्यांना चाप बसणं आवश्यक आहेच.
खरं तर बांधकामाला परवानगी देणे, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देणे ही बाब मुळातच कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता यांचे पर्यंत मर्यादित असलेली बाब आहे. पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, भवन रचना, पथ विभाग, या सारख्या तांत्रिक खाती असलेल्या विभागात देखील कनिष्ठ अभिंयता ते कार्यकारी अभियंता यांच्या पर्यंतच मर्यादित निर्णय घेतले जातात. फार तर तांत्रिक विभागाचे नियोजन, संकल्पन ह्याबाबींना तांत्रिक मंजुरी नगर अभियंता कार्यालय देत असले तरी निविदा (टेंडर) कामे, बिलांची मंजुरी, ह्या सर्व बाबी कार्यकारी अभियंत्यापर्यंतच मर्यादित आहेत. त्याचा पुणे मनपा नगर अभियंता कार्यालयाशी कोणताही संबंध येत नाही. परंतु जाणिवपूर्वक शहर अभियंत्यांना नाहकपणे गोवण्याचे प्रकार वाढले आहेत. ही बाब (माझ्याखेरीज) कुणीच मांडू शकणार नाहीये. त्यामुळेच या फाईल गहाळ होणे व अपचारी अभियंत्यांच्या बदली प्रकरणांच्या निमित्ताने ही बाब पुणेकर नागरीकांच्या समोर चार वर्षातून प्रथमच मांडत आहे.