पुणे/दि/ प्रतिनिधी/
शासन आणि पुणे महापालिकेच्या खात्यांत भरपेट चरून गेल्यानंतर, त्या चार्याच पचन थोडक्यात रवंथ करण्यासाठी बरीच मंडळी देवपूजेला लागलेली असतात. थोडक्यात आम्ही साधी देवभोळी माणसं. चरणं म्हणजे काय हे आम्हाला दूरपर्यंत माहितीचं नसल्याचा आव बरीच शासन व महापालिकेतील अधिकारी- कर्मचारी आणत असतात. पुणे महापालिकेच्या बहुतांश खात्यांत व ८० टक्के रुम मध्ये दत्ताची तस्वीर आहे. तर मग ही देवभोळी माणंस, दर गुरूवारी दत्ताच्या फोटोची सांगोंपांग सोवळ्यात पुजा करतात. दत्ताचा फोटो मिनरल वॉटर अर्थात गंगाजलाने पुसणे, भला मोठा शे-दीडशे रुपयांपर्यंतचा फुलांचा हार घालणे, नारळ वाढविणे, महिला व पुरूष अधिकारी कर्मचार्यांच्या कपाळावर चंदनाचा गंध लावणे अशी ही सांगोपांग पुजा चाललेली असते. शासकीय कार्यालयात देव-देवतांचे फोटो लावून, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तास दीड तास पुजा करावी असे मात्र महापालिकेचे परिपत्रक नसतांना देखील सर्व अधिकारी- कर्मचारी या पुजेत दर गुरूवारी दंग असतात. कार्यालयात गेल्यानंतर धूप अगरबत्तीचा एवढा सुगंध दरवळत असतो की, मन भक्तीने ओतप्रोत झालयं की काय अस्सं वाटू लागत. थोडक्यात जे चरलय ते पचविण्याचा हा एक मार्ग असू शकतो. सगळेच असे नसतात. काही जण भक्तीभावाने करतात असेही काहींचे म्हणणे असेल.
परंतु अधिकारी- कर्मचार्यांना देवाची भक्तीच करायची असेल तर त्यांनी त्यांच्या घरी करावी. किंवा मंदिरात जावून षोडचर पुजा करावी. पुजा किंवा भक्तीभाव दाखविण्यासाठी, पुणे महापालिका हे काही ठिकाण नाही. परंतु बहुतांश मंडळी अशा प्रकारची भक्तीभावाना दाखवित असतात. ज्या खात्यात खाबूगिरी जास्त त्या खात्यात भक्तीचा जागर सुरू असतो. अशाच काही महाभागांचे प्रताप समोर आले आहेत.
विठ्ठला… विठ्ठला…हरी ओम विठ्ठला….
पुणे शहरात आज १०० च्या आसपास दैनिक आहेत तर शेकडोंनी साप्ताहिक, मासिक, पाक्षिक प्रसिद्ध होत असतात. न्यूज पोर्टल तर पावसाळ्या उगवणार्या कुत्र्याच्या छत्रीसारखी झालेली आहेत. राजकीय पक्ष आणि ठेकेदार – बिल्डरांचे खबरे तर वेगवेगवळ्या माध्यमांना खबर पोहचविण्याची कामे करीत असतात. परंतु पुणे महापालिकेत नेमकपणांन काय चाललये, हे मात्र कुणीच पुणेकरांना सांगत नाही. पुणे महापालिका ही पुणेकरांची संसद भवनच आहे. त्यामुळे या विषयावर कोणतेच माध्यम भाष्य करीत नाही.
पुणे महापालिकेतील बदल्यांचे टेंडर तर सर्वांनाच माहिती आहे. पैसे फेको आणि नियुक्ती मिळवा अशा प्रकारचे टेंडर दरवर्षी व दर महिन्याला निघत असते. अगदी त्याच धर्तीवर पगाराला एका खात्यात आणि कामाला दुसर्या खात्यात ही तर पुणे महापालिकेची खास खासियत आहे. पगाराला पाणी पुरवठा खात्यात आणि कामाला बांधकाम खात्यात, पगाराला डे्रनेज विभागात तर कामाला पथ विभागात अस्सं हे संगळ चाललेली असत. ८० टक्के अधिकारी कर्मचारी हे पगाराला एका खात्यात आणि कामाला दुसर्या खात्यात. जगाच्या पाठीवरील शे-दीडशे राष्ट्रे, देशात, राज्यात वा कोणत्यातील महापालिकेत अशा प्रकारची प्रथा नाही. ही प्रथा- परंपरा केवळ आणि केवळ पुणे महापालिकेतच आहे. राज्य शासनातील अधिकारी वर्ग तर पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेली असतात. त्यांना तर काहीच सोयरसुतक नसते. वरीष्ठ अधिकारी तर मूग गिळून बसलेली असतात. तर नगरसेवक मंडळीं मात्र त्यांच्या सोईची माणंस(अधिकारी-कर्मचारी) कशी बसतील हेच पाहत असतात.
पुणे महापालिकेत अनेक खाती व विभाग कार्यरत आहेत. परंतु नगरसेवक, आमदार, खासदार, बिल्डर, ठेकेदार या मंडळींना बांधकाम खातेच अधिक प्रिय आहे. त्यामुळे बांधकाम खात्यापासूनच आपण सुरूवात करूया. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील षोङचर पुजेत दंग असलेल्या एका कर्मचार्याचे प्रताप पुणेकरांसमोर मांडत आहोत. हे केवळ हिमनगाचे टोक आहे. नव्हे ही सुरवात आहे. पुढील पाच वर्षे जरी ही मालिका सुरू ठेवली तरी कमी होईल इतके भयान वास्तव पुणे महापालिकेत आहे.
बांधकाम विभागातील विठ्ठला… विठ्ठला… हरी ओम विठ्ठला…
पुणे महापालिकेच्या सेवा पुस्तकानुसार मूळ खातं – पाणी पुरवठा. बिगारी या पदावर गेली १८-१९ वर्षे कार्यरत आहे. पाणी सोडणं आणि बंद करणं एवढच त्याच काम. परंतु अशा बिगारी पदावरील कर्मचार्याला बांधकाम विभागात आणण्यात आलं. आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या जवळचा माणूस म्हणूनही त्याची ओळख आहे. ते खरं आहे की खोट याच्या फंद्यात न पडता मूळ विषयाला सुरूवात करणे आवश्यक आहे.
चंदनाची चोळी अंग अंग जाळी….
चंदनाची चोळी अंग अंग जाळी हे म्हणत्यात ते काही खोट नाही. सुवर्णकांती असलेल्या हरणाच्या कातड्याची कंचूकी अर्थात चोळीच्या हव्यासापोटी सितामाईच्या सुचनेवरून प्रभु रामचंद्र हरणामागे धावले अन् सितामाईचे अपहरण झाले थोडक्यात रामायण घडलं.
मूळ पाणी पुरवठा खात्यातील हा बिगारी कर्मचारी बांधकाम विभागात कामाला सुरूवात केली. चतुर्थश्रेणीतील असल्यामुळे बदल्यांबाबत फारसं कुणी मनांवर घेत नाही. त्यातच महाराष्ट्र नागरी सेवेतील एकही कलम/परिच्छेद किंवा ओळ देखील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांसाठी बंधनकारक नसल्यामुळे मत्ता व दायित्व विहीत वेळेत सादर करण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. त्यामुळे उधळलेल्या वारू सारखा हा कर्मचारी उधळत सुटला आहे. अधिकारी वर्गाने देखील हा वारू स्वतःकडे ठेवला आहे. शहर अभियंता कार्यालयापासून ते कार्यकारी पर्यंतचे सर्व प्रकारचे टायपिंग करणे, झोन दाखले देणे, डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन सर्टीफिकेट देणे, लॅन्ड सर्व्हरची कामे करणे अशा प्रकारची मोठी कामे एका बिगारी दर्जाच्या कर्मचार्याकडे सोपविण्यात आली आहेत. आजही ही कामे हाच बिगारी कर्मचारी पाहत आहे.