Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्ट्यांतील बेरोजगार युवकांची कृषी उत्पन्न बाजार समितीला कैफियत सनद सादर

apmc pune

* बाजार समितीचे कर्मचारी- रासकर, कोंडे, कळमकर आणि बिबव्यांकडून वरकमाईचे महाउदयोग.

       बाजार समितीला बदलीचा कायदाच लागु नाहीये काय… प्रशासक वर्षानुवर्षे तिथंच, कोंडे, रासकर हे देखील एकाच विभागात वर्षानुवर्षे, इतर अधिकारी व कर्मचारी आहे त्याच विभागात कार्यरत. वरील कर्मचार्‍यांचा विभाग बदली का होत  नाहीये… एकाच कर्मचार्‍याला वर्षानुवर्षे एकाच पदावर कशााठी…

पुणे/दि/ प्रतिनिधी/

       पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गुळ-भुसार, फळ व भाजीपाला विभाग, डाळींब यार्ड, फुल बाजार तसेच बाजार समितीकडील आऊटसोर्सिंगच्या कामांमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच परप्रांतियांना बाजार आवारातून काढुन टाकावे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र पुरस्कृत मार्केटयार्ड स्थानिक कामगार हक्क परिषदेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना देण्यात आले आहे. तथापी या विषयावर कोणताही निर्णय तातडीने घेण्यात येत नसून, परप्रांतियासाठी बाजार समितीचे व्दार उघडेच ठेवले आहे. प्रशासकांच्या स्वैर कारभारामुळे बाजार समितीतील कर्मचारी एकाधिकारशाही बजावित आहेत. बाजार समिती जाणिवपूर्वक हे कृत्य करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांकडून होत आहे.

       संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या बाजार क्षेत्रात, बाजारा लगतच्या झोपडपट्टीतील (आंबेडकरनगर झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, आनंदनगर, चैत्रबन, गुलटेकडी, डायसप्लॉट झोपडपट्टी) बेरोजगार युवकांना बाजार क्षेत्रात अंगमेहती कष्टाचे कामाबाबतचे निवेदन माहे दि. २७/६/२०१९ रोजी प्रशासकांना सादर केले होते. तसेच बाजार क्षेत्रात अंगमेहती व कष्टाची कामे करीत असतांना, बाजार क्षेत्राबाहेरील व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांकडून सातत्याने धमक्या व मारहाण होत असल्याचे निवेदनात नमूद केले होते. तथापी बाजार समितीच्या प्रशासकांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता, गुन्हेगारांना मोकळे रान ठेवले असल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण कामगारांनी नोंदविले आहे.

       कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळींब यार्डात बाजार समितीचे कर्मचारी बिबवे व कळमकर कार्यरत आहेत. त्यांच्या आशिर्वादामुळेच बाजार आवारात गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे लोक येत आहेत. आज या यार्डात आजही१. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे येत आहेत. त्यांच्या विरूद्ध  मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे भा.द. वी. ३०७ व ३४ अ तसेच ५०४ व ५०६ नुसार गुन्हे दाखल आहेत.तसेच शिवाजीनगर न्यायालयातील मे. गोसावी कोर्ट येथे केस क्र. ४४५/१८ नुसार कोर्ट केस सुरू आहे. तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २४०/१७  नमूद आहे. तसेच हे कोणतेही दलाल, आडते वा व्यापारी नसतांना बाजार आवारात येवून व्यापार्‍यांना दम देवून कुणाला कामे दयावीत व कुणाला कामे देवून नयेत यासाठी दबावतंत्राचा वापर करीत आहेत.

       काही हमाल व कामगारांकडून सांगण्यात येते की,वरील तीनही गुन्हेगारांकडे अग्निशस्त्र व इतर शस्त्र यांच्याकडे कायम असते असे सांगण्यात येत आहे. आज हत्यारे घेवून जर गुन्हेगार मंडळी बाजार आवारात येत असतील तर व्यापारी, हमाल, अंगमेहनती कामे करणार्‍यांनी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्‍न आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक  श्री. देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता, बाजार समितीने मार्केटयार्ड पोलीस स्टेशनला पत्र दिले असून, बाजार आवारात गुन्हेगारांना येण्यास मज्जाव करावा असे निवेदन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हेगारी लोकांच्या पाठीशी कळमकर व बिबवे असल्याचे सांगण्यात आले आहे, तसेच बाजार समितीला निवेदन देण्यात आले असतांना, बाजार समितीने या कळमकर व बिबवे यांची बदली करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी या गंभिर प्रकरणाकडे का दुर्लक्ष केले आहे ते प्रशासकांनाच ठाऊक.

रासकर, कोंडेंचे विभाग बदला –

       कृषी उत्पन्न बाजार समितीत रासकर व कोंडे या पुरता धुमाकुळ घातला आहे. प्रत्येक विभागाकडून बिनबोभाट भांडवलदारांना अभय दिले जात आहे. बाजार क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामे हा मोठा विषय आहे. अतिक्रमण हा देखील कळीचा मुद्दा आहे. परंतु या सर्व प्रकरणांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे यांची बदली करण्याची मागणी होत आहे.

       दरम्यान श्री. रासकर यांनी गुळ भुसार विभागातील काही प्रकरणांबाबत देण्यात आलेली उत्तरे भयंकर स्वरूपाची असून, यापुढील काळात त्यांनी कोणती बुद्धी पाजळीली आहे, ते संपूर्ण पणन विभागाला कळावे याासाठी यापुढील काळात सादर केली जाणार आहेत.

       पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला मागासवर्गीयांचा मोठा तिटकारा असल्याचे दिसून येत आहे. शासनाने काही पदे हे आऊट सोर्सिंगने भरण्यास सुचना केल्याने, बाजार समितीने मनमानीपणे मागासवर्गीयांना डावलून इतरांची या पदांवर वर्णी लावलेली आहे. आऊट सोर्सिंगमध्ये आरक्षण नाही. परंतु ज्या जागा मागासवर्गींयासाठी आरक्षित आहेत, त्या पदांवर आऊट सोर्सिंग मधुन एकही मागासवर्गीय उमेदवार बाजार समिती पुणे यांना शोधूनही सापडत नाहीये की, त्यांना तिथे मागासवर्गीयांना स्थानच दयायचे नाही असाही गंभिर प्रश्‍न पुढे आला आहे. श्री. रासकर  यांच्या भांडवलदारी कृत्याचा पंचनामा या पुढील काळात निश्‍चितच सहकार व पणन खात्यापुढे येणे आवश्यक आहे. (क्रमशः)

बी.जे.देशमुख बाजार समितीत प्रशासक पदावर एवढे वर्षे कसे…?

       कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याच्या कार्यालयात प्रशासक म्हणून बी. जे. देशमुख हे गेली अनेक वर्षे प्रशासक या पदावर काम करीत आहेत. बदलीचा अधिनियम त्यांना कसा लागु केला नाही याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. देशमुख यांच्या पूर्वी डोईफोडे, कोथंबिरे सारखी मंडळी आली आणि पदोन्नतीवर गेली. परंतु देशमुख हे आहे त्या जागेवर आहेतच. पूर्वी श्री. खर्चे होते, त्यानंतर जोगदंड आले. जोगदंड काही काळ बाजूला गेले, परंतु ते पुन्हा रूजु झाले. तोष्णिवालांनी काही काळ कामकाज पाहिले. परंतु देशमुख आहे त्या जागेवर आहेतच.

       सध्या देशमुख हा विषय आमच्या पुढे नाही. प्रशासक म्हणून मॉडेल ऍक्ट नुसार त्यांनी काय काम केलं…. शेतकर्‍यांसाठी कोणत्या नवीन योजना आणल्या….. किती शेतकर्‍यांना हमीभाव मिळवून दिला… तरकारी व भुसार विभागातील प्रलंबित प्रश्‍न… तसेच अनेक बाबी विचाराधीन आहेत. त्यामुळे देशमुख ह्या विषयावर नंतर विचार करू.