/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
रस्त्यावरील वाढते अपघातांना वाहनचालकच अधिक जबाबदार असतात. सिट बेल्ट किंवा हेल्मेट परिधान न केल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्या कारणामुळे राज्य शासनाने रस्ता सुरक्षा अभियान सुरू करून, शासन निर्णयाव्दारे ते आदेश पारीत केले आहेत. अगदी त्याचाच धागा धरून, पुणे शहर वाहतुक विभागाने हेल्मेट सक्तीचा, पुणे शहरात कहर केला आहे. शासन निर्णय महाराष्ट्रासाठी आहे, केवळ पुणे शहरापुरता मर्यादीत नाही. एवढी मोठी जबरी कारवाई राज्यात कुठेही नसतांना,(आमचे शेजारी पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालय असतांना देखील तिथे एवढी जबरदस्ती नाही) निव्वळ पुणे शहरात ती रट्टावुन राबविली जात आहे. दोनशे रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत दंडाची वसूली केली जात आहे. कारवाई बाबत उद्रेक झाल्यानंतर मात्र वाहतुक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी, वाहतुक पोलीस निव्वळ समुपदेशन करीत आहेत असा सुर आळविला आहे. कायदयाच्या परिणामकारक अंमलबजावणीमागील खरे, सत्य भारती विद्यापीठ वाहतुक विभागात सुरू असलेल्या लुटीच्या अनेकविध फंड्यांनी ते दाखवुन दिले आहे. जिथं शासन व नागरीकांचीच लुट होत असतांना, वाहतुक पोलीस समुपदेशन करतात हे विधान हे सपशेल बनावट व लब्बाड आहे एवढे मात्र नक्की.
पुणे शहर वाहतुक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीला १०० कोटी रुपयांचा फटका
भारती विद्यापीठ पोलीस वाहतुक विभाग हे पुणे शहरातील सर्वात मोठ्ठे वाहतुक नियंत्रण कक्ष. भारती विद्यापीठ चौक म्हणजे बंगलोर, गोवा या परराज्यासह मुंबई, कोल्हापुर, सातारा, बारामती तसेच भोर, वेल्हा, मावळ मुळशी या तालुक्यांना -शहरांना जाणे- येण्यासाठीचे सर्वात मोठ्ठे प्रवेशव्दार आहे. त्यामुळे या चौकातून नेहमी लाखभर वाहने व प्रवासी प्रवास करीत असतात. त्यातील अर्धेनिम्मी वाहने, वाहतुक नियमांचे उल्लंघन करतात. परंतु भारती विद्यापीठ वाहतुक विभागाकडे निव्वळ ८ ई- चलन मशिन्स असल्याने जानेवारी २०१८ ते सप्टेंबर या ९ महिन्यात अवघ्या ११५ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती भारती विदयापीठ वाहतुक नियंत्रण विभागाकडून रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांना देण्यात आली आहे. पुणे शहरातील इतर लहान मोठ्या वाहतुक नियंत्रण कक्षाकडे १५ ते २० ई- चलन मशिन्स आहेत.
भारती विद्यापीठ वाहतुक विभाग हा पुणे शहरातील सर्वात मोठ्ठा वाहतुक विभाग असतांनाही त्यांच्याकडे सुमारे ५० ई चलनची आवश्यकता असतांना, त्यांच्याकडे केवळ ८ ई – चलन मशिन्स आहेत. वाहतुक पोलीस उपायुक्त यांच्या नाकर्तेपणामुळेच महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीला सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक तोटा सहन करावा लागत असल्याचे देखील रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांना दिलेल्या पत्रावरून दिसून येत आहे.
रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी, भारती विद्यापीठ वाहतुक विभागाकडील अनागोंदी कारभाराबाबत १३ ऑगस्ट २०१८ रोजी पोलीस उपायुक्त वाहतुक यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार नोंदविण्यात आली होती. तसेच भारती विद्यापीठ वाहतुक विभागाकडील पोलीस कर्मचारी श्री. घिसरे, कमाने व शिंदे यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार अर्जात महत्वाच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. याबाबत भारती विद्यापीठ वाहतुक विभागाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, त्याचे सर्व खापर श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त वाहतुक यांच्यावर ते फोडण्यात आले आहे.
भारती विद्यापीठ वाहतुक विभाग यांनी त्यांच्याकडील कार्यालयीन पत्र जा.क्र. १४९४/२०१८ दि. ६/९/२०१८ रोजीच्या पत्रात नमूद केले आहे की, भारती विद्यापीठ विभागा मधील कात्रज चौक हा पुणे सातारा हायवे रोडवरील महत्वाचा गजबजलेला पुणे शहराचा दक्षिण दिशेचा मुख्य प्रवेशव्दार चौक आहे.
सदर चौकामुधन बेंगलोर, गोवा, कोल्हापुर, सातारा, सोलापूर, बारामती मुंबई अशा शहरांना जाणे येण्यासाठी मार्ग आहेत. त्यामुळे सदर चौकात नागरिकांचे जाणे येणेचे सोई करीता एस.टी. महामंडळाचा बसथांबा आहे. तसेच पुणे महानगर पालिकेचे पीएमपीएमएल ची स्थाने व आगार आहेत. त्यामुळे सदर चौकात लोकांची वाहनांची गर्दी असते. तसेच इतर वाहने हा काहींना काही कारणास्तव चौकात थांबतात. सदर चौकातून अवैद्य प्रवासी वाहतुक होवू नये म्हणून कर्मचारी हजर असतात.
तथापी भारती विद्यापीठ वाजुक विभास ८ ई – चलन मशिन असुन, त्यापैकी ६ मशिन चालु आहेत, त्याही कधी कधी नेट अभावी बंद असतात. तसेच भारती विद्यापीठ वाहतुक विभागास मशिन कमी असल्याने कारवाईवर परिणाम होवून कारवाई कमी होत आहे. (दरम्यान पोलीस उपायुक्त, वाहतुक यांचेकडील निर्ढावलेल्या प्रशासनामुळे मशीन कमी वा बंद असल्या तरी) अवैध प्रवासी वाहतुक होवू नये म्हणून आम्ही स्वतः व एक माईक व सहा पोलीस कर्मचारी असे कात्रज चौकात थांबुन असतो. तसेच सदर चौकात वाहतुक कोंडी व अवैध प्रवासी वाहतुक होवू नये या करीता आम्ही लक्ष ठेवून आहोत. (ई-चलन मशिन कमी असल्या व बंद असल्या तरी संपूर्ण भारती विद्यापीठ पोलीस विभाग कात्रज चौकात थांबलेला असतो व लक्ष ठेवून असतो.बिच्चारे !!!) यामुळेच ०१ जानेवारी २०१८ ते सप्टेंबर पर्यंत ११५ वाहनांवर अवैध प्रवासी वाहतुकीची कारवाई व २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मशिन बंद व कमी असल्या तरी आम्ही (भारती विद्यापीठ पोलीस वाहतुक विभाग) अवैध प्रवासी वाहतुक मुळासकट बंद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांच्या अर्जाच्या अनुषंगाने कळवित आहोत. असे लेखी पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ वाहतुक विभाग पुणे शहर यांनी कळविले आहे. तसेच पुणे शहरातील सर्वात मोठ्ठा वाहतुक विभाग असतांना, वाहतुक पोलीस उपायुक्त यांच्या मनमानी कारभारामुळे भारती विद्यापीठ वाहतुक विभाग मेटाकुटीला आला आहे असे पत्रातून दिसून येत आहे.
ताकवले साहेब आचंबित झाले नसतील तर नवलच –
कमलाकर ताकवले यांनी पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशनमध्ये काम केले आहे. परंतु त्यांचा सर्वात जास्त ओढा भारती व कात्रजकडे का असतो ह्याचे उत्तर मलाही माहिती नाही. त्याचे उत्तर नेमकंपणांन तेच देऊ शकतात. परंतु माहिती अधिकारात देण्यात आलेली उत्तरे, तक्रार अर्जांवर करण्यात आलेले निवेदन आणि वस्तुस्थिती पाहता, कमलाकर ताकवले भलतेच आचंबित झाले असतील ह्यात नवलच नाही.
दरम्यान राजीव गांधी प्राणी संग्रहालय व सर्पोद्यानाजवळील लुटीचे नव नवीन फंडे पाहून ताकवले भलतेच गहिवरून आले असतील. त्यांच्या संपूर्ण शासकीय कर्तव्यातील कारकिर्दीत असे फंडे त्यांना पहायला मिळाले नसतील तेवढे नवीन नवीन फंडे श्री. कमाने व शिंदे यांच्या प्रतापामुळे त्यांना पहावयास मिळत असतील. उद्यानाजवळ स्वतःच्या व उद्यानाजवळ पाळणे, खेळणे आणि खाऊची दुकाने थाटलेल्यांची दुचाकी वाहने लावायची, मागाहून, ते नो पार्कींग मध्ये आहे म्हणून त्याला शासनाव्यतिरिक्त स्वतःजवळीची साखळदंडे जखडायची, आणि नोपार्कींग सह हेल्मेट, लायसन, दुचाकीच्या काचा वगैरे, वगैरेची एकुण दंड सुमारे २०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत आणायचा व पुढे ५०० रुपयांत हे प्रकरण मिटवायचे…. सॅटर्डे-संडे हेच फंडे सुरू असतात. ही कला पाहून ताकवलेंना गहिवर आला असेल आणि वाहतुक उपायुक्तांनी तर हातच जोडले असतील ह्यात शंकाच नाही बघ्घा….