10 आरोपी आणि 10 हजार रुपडे घेवून,
राणा भिमादेवी थाटाची विजय कुंभारांची कारवाई
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेतून कर्तबगार व धाडसी पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांची बदली केल्यानंतर, त्यांच्या जागी आलेल्या पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत एका जुगार अड्यावर कारवाई केली असून त्यात 10 आरोपी आणि 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठ्या राणाभिमादेवी थाटाची कारवाई करून सामाजिक सुरक्षा विभाग किती क्वॉलिटीचे काम करीत आहे याची त्यांनी साक्ष दिली आहे.
मागील आठवड्यात पोलीस आयुक्त कार्यालयात, आयुक्तांच्या भेटीसाठी गेल्यानंतर, सहज जाता- जाता पोलीस निरीक्षक श्री. कुंभार यांची भेट धावती भेट घेतली, त्यात श्री. कुंभार यांनी, मी केवळ क्वालिटीचे काम करणार आहे, छाटछूट काम करणार नसल्याचे सहज सांगितले. दोन तीन दिवसांनी जेंव्हा कारवाईची बातमी आली तेंव्हा मलाही ज्ञान मिळाले की, पोलीस निरीक्षक श्री. कुंभारांनी केलेली कारवाई किती क्वालिटीची आहे. ह्याला क्वॉलिटी म्हणतात हे मला पहिल्यांदाच समजले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत माळीमळा , गायकवाड वस्ती , लोणी काळभोर , पुणे येथे बेकायदेशीरपणे पत्यांचा जुगार खेळत व खेळवत असलेबाबत पोलीस अंमलदार यांना त्यांचे गोपनिय बातमीदार मार्फतीने दि. 24 ऑगस्ट रोजी खात्रीशीर बातमी मिळाली.
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी सदर ठिकाणी काही इसम बेकायदेशीर पणे 52 पत्त्यांचा गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाक रमी हा जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे 10 इसम मिळुन आले
त्यात . 1. लक्ष्मण संभाजी जगताप वय 60 वर्षे , रा.माळीमळा , अहिल्यादेवी शाळेजवळ , लोणी काळभोर , पुणे 2 मंगेश कुंडलीक शिंदे वय 27 वर्षे , रा . माळीमळा लोणी काळमारे पुणे 3. मल्हारी पोपट शिंदे वय 26 वर्षे रा . सातववाडी , हडपसर पुणे 4. सचिन उत्तम मालपानी वय 35 वर्षे रा . लोणीगांव , ननवरे चाळ , लोणी काळभोर पुणे 5. राहुल बाबासाहेब गायकवाड वय 40 वर्षे 6. शकिल अहमद शेख वय 35 वर्षे 7. अन्सर अली झीया उद्दीन कोरबु वय 45 वर्षे, 8. अक्षय बळीराम यलगुंडे वय 33 वर्षे 9 . संदीप रामचंद्र लांडगे वय 32 वर्षे रा . घोरपडेगाव पुणे 10. परमेश्वर गोविंद कुसाळकर वय 42 वर्षे रा . माळीमळा लोणी पुणे त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यात रोख रक्कम 10,400 / – रु . घटनास्थळावरून जप्त केले .
सदर प्रकरणी नमुद 10 इसमांविरूध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुरनं 445/2022 महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 ( अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विजय कुंभार तसेच पोउपनि श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली असल्याचे पोलीस आयुक्तालयातील प्रेस विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.