Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

देशात गेल्या २० वर्षात बेराजगारीत सर्वाधिक वाढ

jobs

नवी दिल्ली : देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात भीषण समस्या बनताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब आणखी नव्याने पुढे आली आहे. गेल्या २० वर्षांच्या कालावधींचा अभ्यास केल्यास, सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

                देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास २.३ टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण २०१५ मध्ये ५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून १६ टक्के तरुण बरोजगार आहे.

                 स्टेट ऑफ वर्किंग इंडियाच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या २० वर्षांच्या कालवधीत सर्वात अधिक आहे. विशेष म्हणजे या अहवालानुसार देशातील ८२ टक्के महिलांना आणि ९२ टक्के पुरुषांना १० हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक वेतन मिळत आहे.

                देशातील बेरोगजगारीचे खरे कारण हे कमी पगार आणि अंडरएम्पॉयलमेंट (कॉन्टॅक्ट किंवा कमी रोजगार) आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. तर, नवीन आर्थिक धोरणांनुसार बेरोजगारीची मोठी समस्या उद्भवू शकते, असा धोक्याचा इशारा या अहवालातून समोर आला आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण जवळपास ५ टक्क्यांवर पोहोचले आहे. या अहवालासाठी दिग्गज पत्रकार, संशोधक, पॉलिसीमेकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्यासाठी २०१५-१६ या वर्षातील एंप्लॉयमेंट आणि अनएंप्लॉयमेंट सर्व्हे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे.