Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील सा.बां. मंडळातील वर्ग ३ च्या कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेत पळापळ, पदोन्नती झाली तरी विभागात कार्यरत राहण्याचा संकल्प

pwd pune

पुणे/दि/ प्रतिनिधी/
शासन म्हणजे स्वयंसेवा संस्था, मुळीच नाही. आणि स्वायत्त संस्था मुळीच नाही. शासन मंत्रालय, जिल्हे, तालुके आणि अतिदुर्गम भागापर्यंत याचा निरंतर वास. लोक सेवेसाठी राबणारे लोकसेवकांचा इथ राबता असतो. वेतन पगारासंबंधी विचारता काय… वा छान…. पगार नसेल तर कोण लोकसेवेसाठी झटेल… अहो, फुकटांत देवाला कोणी नमस्कार म्हणत नाही. असा. ज्याची त्याची भक्ती. कोणाची देवावर भक्ती कोणाची नैवेद्यावर भक्ती छान…
बदली प्रकाराला तड लागली आहे.

देवाच्या देवळात नैवेद्य आहे पण नैवेद्यावर ध्यान ठेवणार्‍या स्वार्थी, लबाड भक्ताला हद्दपार करण्यासाठी बदली ऍक्ट नाही. पण शासनात आहे. शासनाला कोणी नावे ठेवत नाही. तर शासनातील यंत्रणेला नकारात्कदृष्ट्या वा सकारात्मदृष्ट्या जनता नावे ठेवत असते. हा बदली ऍक्ट शासनात आहे. कार्यरत असलेला प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्या सततच्या एकाच कार्यपद्धतीने त्यांच्या पॅनिक ऍटक डिसॉर्डच्या बाबीकडे स्पष्ट लक्ष ठेवले तर बदली हा प्रकार ज्या सकारात्क अनुषंगाने राबविली जाणारी प्रक्रिया परिवर्तनाचा उत्तम उपाय म्हणून संबोधला जाऊ शकतो. बौद्धीक ताणामुळे होणार्‍या शारिरीक हानीला रोखता येते. हा बदली मागचा उद्देश गृहित धरला तर बदली, बदली न होणे, झाल्यास अंशतः बदल, कार्यालयीन व्यवस्थापनात ओढून घेणे अशा असंख्य कारणाने बदली करणार्‍या आणि बदली होणार्‍यांनी या प्रक्रियेत एवढी हवा भरली आहे की, बदली प्रकाराला तड लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला लागु आहे बरं. नाहीतर आपल्याला वाटत राहून जाईल की, वर्षानुवर्षे एकाच विभागात एकाच टेलवर कसब दाखविणारे सर्वांना परिचित होऊ लागतात, तेंव्हा उमजते, चार चार वेळा बदली झाली पण कुठं कुठं झाली. बदली झाली तर ती उपविभागात दर्शविली पण हे कसबगार विभागातच. वा. छान फार विस्ताराने लिहण्याची गरज नाही. घरांच्या मागे लपला काय अन् दाराच्या आडोशाला लपला काय, शेवटी घरातच ना… कंपाऊंडच्या बाहेर पला तर आपण समजू शकतो. कसबगाराने नाक डोळे न मोडता बदली आदेशाला स्विकारलं. पण असं चालं घडतच नाही. मोह सुटत नाही. व्यावहारिक हिरव्यागार शेतातून उठून माळरानावर भटकण्याची स्पप्न कोण कशाला डोळ्यात साठवेल. खले उकरल्यावर जाण्याची घाई करणारा मी निघतो, म्हणणारा तर पक्का लब्बाड… लांडगा आला रे आला अशी बदलीची आवई उठवणं चांगलं आहे का… पाहू या… २०१९ मेच्या लंपडावात कोण कोणाला हुडकुन काढते.
पुण्याच्या सा.बां. तील स्थापत्यसंपन्न निवडक कामांना गंध अक्षता लावून निरांजनाने ओवाळत टक्केवारीचा अचूक मुहूर्त साधणारे तरी सुद्धा टक्क्याच्या प्रसादातलं तूप ओरीजनल नाही हे जिभेने नव्हे खिशाच्या जडत्वाने ओळखणार्‍या अन् आक्रस्ताळेपणाने रडत पाय खोडणार्‍या या महाभागांच्या स्थापत्याची तशीच रंगवलेल्या कागदपत्रांची रोषणाई उतू जातेय हे केंव्हा उमगते. त्यांच्यापाशी गेल्याबिगर उमजत नाही. बदलीच्या लंपडावात वर्षानुवर्षे एकाच विभागात मानेचा काटा मोडेपर्यंत काम करित असल्याचे भासवून तूप ओरबडणारे दिवे दिपवून टाकताहेत म्हणून त्यांचा प्रकाश लांबवर पसरल्याचे आता स्पष्ट जाणवत आहे. आणि या महाभागांनी बदली प्रक्रियेतील आदेशाची प्रतारणा करित बदली ऍक्टला भुरळ पाडून केंव्हाच कागदात चिणलेले आहे. मात्र सात्विक संतापाची लागण झालेला एखादा विचारू शकतो. मग या स्थितीत नवं स्थित्यंतर केंव्हा येणार… कोण ढिलेले पडते आहे, कोण वरचढ होते आहे… कोण गुडघे टेकते आहे. हे फारस कळीचा मुद्दा म्हणून पुढे आणात येणार नाही, पण विभाग चालवतांना आपण आपल्याच सोयीने आपल्या हितासाठी होडी सारखी रचनात्मक वाहन सोडून जुन्हा ुरसटलेल्या ओंडक्यासह तरंगत जाऊन पैलतीर गाठायचा. या चाकोरीत स्थित्यंतर कोण आणणार… बदलीच्या निमित्ताने यांना हाताला धरून दुसर्‍या विभागात, दुसर्‍या टेवलवर काम करणायास कोण नेऊन सोडणार आहे…
आपल्या सोइनं….. सहेतूपेक्षा हेतूपुरस्सर केलेलं म्हणजे मनुष्यबळाची कमरता र्शवितांना मागणी करण्याचे कागदोपत्री घोडे नाचवून रडण्याचं ढोंग करित येणार्‍या इच्छुकांना प्रस्तावाचा बडगा ठेवत. थिजवून ठेवायचं की जेणे करून तो डब्यात शिरणार नाही इथप्रत दरवाजा घट्ट कडी कोयंड्यात दोन दोन टेवलाचा कार्यभार देत स्वार व्हायच. ओंडका तो ओंडकाच सार्‍या विभागाचा भार एकट्याच्याच अंगावर टाकला तरी रात्री बारापर्यंत ठेकेदारांसोबत प्रवाहात तरंगत राहणारचं आहे. वा. छान.. तुम्ही घरी जा… हे पोट तिडकीने सांगायला तो कदापि विसरणार नाही.
उंदराच्या शर्यतीत उंदिर पहिला येतो –
या दर्पाची दुर्गंधी लांबवर पसरत चाली आहे. हो खरंच की. खाली कोसळून पडलेला नाक वरच आहे म्हणणारा मात्र याला पुरावा काय… अवसान आणून विचारेल वा छान… किती जागृत प्रश्‍न त्याला जर समजावून सांगितलं तर कळेल सुद्धा. आपण मुक्े राहिला तर सारेच मुके मग हा ना ना बोंब… घ्या…पुरावे जनतेच्या फाटक्या खिशात केवंहापासनं खेळू लागले… पुरावे हे नेहमी यांच्याच कार्यालयात, यांच्याच टेबलवर, यांच्या टंकलिखित नस्तीत, टाकदौत वगळता पेनाच्या सहीच्या जंजाळात कण्हत पडलेले असतात. यांच्या विसरभोळेपणाच्या धाडसाचं कौतूकच… म्हणावं की नको… म्हणतो राव… उंदराच्या शर्यतीत उंदिर पहिला येतो हे मान्य करावं लागेल.
बदली प्रक्रियेतील ही कुपोषित बाब ही दुर्लक्षित करण्यासारखी मुळीच नाही. पण तालुक्याच्या वा अन्य स्थळातील कार्यालयात सरळ सरळ उपविभागासह शाखा मधून विभागातून कार्यरत असणारे स्वतः बदली मागत विकल्याच्या आधारे पुढे येत असतील त्याचं स्वागत होत नाही. हे अस्सं का… याला जबाबदार कोण आहे…
वास्तवात बदली ऍक्टला नव्हे पण बदली प्रक्रियेला आलेली कुपाषित स्थिती ही दुर्लक्षित बाब नव्हेच. सा.बां. मंडळ पुणेच्या अधिपत्याखालील सा.बां. पुणे, पूर्ण, दक्षिण, उत्तर या विभागातील वर्ग ३ च्या कर्मचार्‍यांच्या एकूण सेवेकडे लक्ष केंद्रीत केले तर कोणा कोणाला आश्‍चर्य वाटण्यसारखे तिळमात्र नाही असेही म्हणता येईल. म्हणताही येणार नाही. आमच्याशिवाय या टेबलाचे कामच होणार नाही. हा जो न्यूनगंड यांचा. त्यांच्या कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी एवढा पोसला आहे की तो तेवढा होईपर्यंत. परिणामी तुंबलेल्या बदली प्रक्रियेच्या चरकात न अडकणारी ही मंडळी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्युळे सगळ्यांना अपरिचित नव्हे तर परिचित झाली आहे. वास्तवात या मंडळींना एकाच टेबल वर्कची झापडं लावल्यामुळे बदलीच्या निमित्ताने वेगवेगळ्या टेबलवर्कमध्ये कामाचे प्राविण्य मिळवता आले नाही असेही म्हणावे लागेल. प्राविण्य आहे माझ्याकडे… असं म्हणणार्‍याकडे साशंकतेने पहावे लागेल असे का म्हणावे लागते. कारण आजही त्याचं कोणतही काम निटसे पाठ नसते म्हणूनच संगणकाच्या तबकडीवर शासन निर्णय, शासन परिपत्रके, नियम अधिनियम हुडकुन नाही तर सा.बां. नियमावलीचा पुस्तकी ठेकळा काढुन प्राविण्य येत असल्याचे मौखिक पद्धतीने दर्शवित असतात. मुळात दर बदली प्रक्रियेमध्ये बदली पात्र कर्मचार्‍याला हे बदलीने दुसर्‍या स्थही स्थालांतरीत करण्यासाठी त्या स्थही पूर्वीच्या कामाएैवजी दुसर्‍या टेबलवर्क मध्ये प्राविण्य यावे यासाठी प्रयत्न केला जातो पण तेल लावलेल्या पहिलवानासारखी सातत्याने या प्रक्रियेतून ते निसटून आलेले आहेत. आणि त्याच टेबलवर काम करित असतात. मग परिस्थिती कोणी निर्माण केली आहे. हा प्रश्‍न पडणे साहजिकच आहे.
विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला यात धरलं जाते की गोवले जाते… शासनाच्या अभिलेख्याने कार्यकारी अभियंता या पदाला प्रदान करण्यात आलेले हक्क व अधिकार जी व्यक्ती कार्यरत असते. ती कार्यालयीन रचनेत बदली नावाव्या अडसरातून सर्वांना सोडवते. विभगापुरते मर्यादित असलेले हक्क आणि अधिकार एवढे बेमालूमपणे बदली प्रक्रियेत वापरते. की त्या त्या कर्मचार्‍यांची विभागातून उपविभागात बदली करते आणि कार्यालयीन कामकाज व्यवस्थापनाच्या नावाखाली वेतन उपविभागातून आणि कार्यरत पुनश्‍चः आहे त्याच टेबलवर. त्यामुळेच कर्मचारी बदली प्रक्रियेत निर्ढावलेले आहेत की आमच्या शिवाय काहीच चालणार नाही. हा न्यूनगंड भला मोठा ठणक झाला आहे. मुळात अनेक वर्षे एकाच विभागात वारूळ बनवून फुत्कारत बसलेले हे कर्मचारी विकल्पाच्या अनुषागाने मागणी करति असेल तर यात मोइी अडचण हीच आहे की, आकृतीबंधामुळे सेवा निवृत्तीच्या मार्गाने परतलेल्या कर्मचार्‍यांच्या जागी बदली वा अन्य किारणाने ती जागा भरली जात नाही, नव्हे ती कित्येक वर्षै रिक्त राहते. मग त्या त्या विभागातून रिक्त जागे संबंधी व मनुष्यबळाची मागणी केली जाते. परंतु मनुष्यबळांची संख्या वा कुमक पुरविली जात नाही. ही सर्व कार्यालयीन व्यवस्थापनाची चढ अडचण असेल तरी या मे २०१९ मध्ये वर्ग ३ कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रिया ही स्वच्छपणे होणे जेवढे गरजेचे आहे. त्यामुळे बदलीच्या निमित्ताने पळवाटा शोधून आहे त्यांना कित्येक वर्षे एकाच जागेवर कार्यरत रहा. पदोन्नती झाली तरी याच विभगाात रहा असे बेमालूमपणे आशिर्वाद देण्याच्या कलेत स्थित्यंतर घडणे महत्वाचे होणार आहे.