Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

लेखापरीक्षकांच्या आक्षेपांची पुर्तता नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, बेकायदा बांधकामांवर देखील कारवाई नाही, – आता … मुजोर अभियंत्यांचा सत्कार नेमका कोणत्या शालजोडीने करावा…

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांचे ऑडीट अर्थात लेखापरीक्षण केले जाते. ज्या खात्यांनी पुणे महापालिकेचे हित लक्षात न धेता विशिष्ठ वर्गाला अधिकचा लाभ देवून, पुणे महापालिकेचे नुकसान केले, त्या बाबतचे आक्षेप नोंदवून त्या रकमा संबधित खात्याने वसुल करण्याबाबतचे निदेश दिले जातात. ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे कोट्यवधी रुपयांचे येणे आहे, त्या रकमा बांधकाम विभागासह अन्य विभागांनी वसुल केलेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. अनाधिकृत बांधकामाबाबत मागील १५ वर्षांपासून उच्च न्यायालय, राज्य शासनाने वेगवेगळ्या आदेशांव्दारे कारवाईचे आदेश दिले आहेत. तथापी त्याची अंमलबजावणी देखील बांधकाम विभागाकडुन केली जात नाही. नागरीकांनी तक्रारी नोंदविल्यानंतर निव्वळ नोटीसा देण्याचे काम केले जाते, परंतु कारवाई केली जात नाही. महापालिका आयुक्त कार्यालय व शहर अभियंता कार्यालयास दर मंगळवारच्या बैठकीत केशरी चूना लावण्याचे काम बांधकाम विभागांची कार्यालये करीत आहेत. नेमून दिलेले कर्तव्य बजाविण्यात पुणे महापालिकेतील अभियंते कमी पडत आहेत, त्यामुळे पगारी नोकरदार पुणे महापालिकेचे आणि पदाचे काम मात्र बांधकाम व्यावसायिकांसाठी केले जात आहे.

बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर सोन्याची कौले लावणार्‍या पुणे महापालिकेने, मध्यमवर्गीय पुणेकरांच्या घरावर शेणाच्या गवर्‍या का थापल्या –
मध्यमवर्गीय सर्वसामान्य पुणेकर स्वतःच्या कुटूंबाच्या गरजेकरीता वा उदरनिर्वाहाकरीता रस्त्यावर वा स्वतःचे घरात पुणे महापालिकेच्या भाषेत अतिक्रमण केल्यास, अशा प्रकारचे अतिक्रमणावर व बांधकामांवर त्वरीत हातोडा मारला जातो. परंतु पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी पुणे महापालिकेचा डेव्हलपमेंट चार्ज न भरताच बांधकामे केली आहेत, काही ठिकाणी अधिकार्‍यांच्या साथ संगनमताने प्रिमियमची आकारणी कमी दराने केली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. थोडक्यात पुणे महापालिकेचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर सोन्याची कौले लावतात पण सर्वसामान्य पुणेकरांच्या घरावर शेणाच्या गौर्‍या का थापतात हा मोठा गहन प्रश्‍न आहे. पहिला बळी सर्वसामान्यांचा दिला जातो आजपर्यंतचा इतिहास आहे.
बांधकाम व्यवसायातील आगरवाल टोळीला महापालिका आंदण –
बांधकाम क्षेत्रात अतिशय निम्नस्तरावर जावून कामे करण्याची बॅड हॅबिट पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विक्र्रम आगरवाल, प्रशांत आगरवाल,यांना लागली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रकल्प करीत असतांना, नवीन संस्था स्थापन केली गेली आहे. वर्धमान असोसिएटस,नटराज रिऍलिटी, गणनगिरी डेव्हलपर्स आदि सारख्या नावांनी बांधकाम प्रकल्प मंजुर करून घेतले आहेत. प्रत्येक वेळी नवीन पार्टनर घेवून उदयोग वाढविला आहे.
७२७ क सदाशिव पेठ येथे नवीनच आशिष आगरवाल, विवेक आगरवाल व हुसेन पठाण यांना पार्टनर म्हणून घेतले आहे. शुक्रवार व कसबा पेठ येथे देखील विक्रम आगरवाल, प्रशांत आरवाल यांच्या सोबत हुसेन पठाण नामक पार्टनर कार्यरत असल्याचे दिसून येते. पुण्यातील बुधवार पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ व सदाशिव पेठ येथे नियमभंग करून बांधकामे केली आहेत. याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांनासह पुणे महापालिकेला बसला आहे. एका लेआऊटला मान्यता घेवून दुसर्‍याच प्रकारचे बांधकाम करण्याचे काम आगरवाल टोळीने केले आहे.
आगरवाल टोळीतील हुसेन पठाण
जुन्या पेठांमध्ये आगरवाल टोळीने २०११ पासून धुडगुस घातला आहे. यामुळे पेठांवर पूर्वीच ताण तणाव होता, आगरवाल टोळीमुळे अधिक सोई सुविधांवर ताण पडला आहे. बेकायदा बांधकामामुळे नवीन संख्या वाढली आहे. पाणी पुरवठा, डे्रनेज व रस्त्यांवर ताण आला आहे. वाहतुकीवर ताण पडला आहे. नवीन वाहने वाढत आहेत. तरीही आगरवाल टोळीवर कारवाई केली जात नाहीये. आगरवाल यांच्या टोळीत हुसेन पठाण नामक व्यक्ती आढळुन आली आहे. बर्‍याच ऍग्रीमेंटवर व दिलेल्या नोटीसांवर आगरवाल टोळीसह हुसेन पठाण याचे नाव आगरवाल टोळीतील हुसेन पठाण नेमका कोण इसम आहे… हे आता पुढील अंकात पाहूयात.
तथापी बांधकाम विभागातील रामंचद्र शिंदे ह्या शाखा अभियंत्याने पुणे महापालिकेचे नियम मोडून आगरवाल टोळीला त्याचा विभाग आंदण दिला आहे. बेकायदा कृत्यांना नोटीसा न देणे, नोटीसा दिल्या तरी कारवाई न करणे अशा प्रकारचे कृत्य शिंदे याच्याकडून केले जात आहे. शहर अभियंता कार्यालयाच्या निदर्शनास ह्या बाबी आलेल्या आहेत. त्यामुळे आगरवाल टोळीच्या कारवाईस प्रतिबंध घालुन मुजोर अधिकार्‍यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.