Friday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही

आयुक्त, अति. आयुक्त कारवाई करण्यापासून त्यांना संरक्षण कशासाठी …
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
पुणे महापालिकेतील10 हजार कंत्राटी कामगार व खाजगी सुरक्षा रक्षकांचे किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय, कंत्राटी कामगार यांना सुरक्षा प्रावरणे, साहित्य आदि सर्वांमध्ये महाघोटाळा केल्यामुळे मागील सहा वर्षात पुणे महापालिकेवर शेकडोंनी आंदोलने झाली. यामुळे संपूर्ण राज्यात पुणे महापालिकेची नाहक बदनामी झाली. अ वर्ग असलेल्या महापालिकेची मान शरमेने खाली गेली. त्यात मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांच्यासह 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी या आठ कर्मचाऱ्यांनी महापालिकेची नाहक बदनामी केली आहे.

संविधान परिषदेसह अन्य संघटनांनी आंदोलन केल्यानंतर नाईलाजस्तव अति. महापालिका आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी या आठ महाभागांची बदली त्यांच्या मूळ खात्यात करण्यात आली आहे. परंतु या आठ महाभागांनी केलेला भ्रष्टाचार, गैरव्यवहार, ठेकेदारांनी टेंडर मधील अटी व शर्तींचे उल्लंघन करून देखील गैरकायदयाचे अंडरटेकिंग घेवून त्यांची मंजुर करण्यात आलेली बीले, तसेच त्यांच्याच्या चौकश्या हा विषय आजही प्रलंबित आहे. 

संबंधित आठ प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांची बदली केली असली तरी त्यांची चौकशी कधी होणार आहे हा गहन प्रश्न असला तरी, या आठ सेवकांनी अद्याप पर्यंत मूळ खात्यासह बदलीच्या खात्यात रूजु झाले नसल्याचे एकदोन पत्रावरून दिसून आले आहे. त्यामुळे या सेवकांना नोकरीची गरज नाहीये किंवा शिवाजी दौंडकर हे मे महिन्यात सेवानिवृत्त होत असतांना, या आठ जणांना कायम उपकागार अधिकारी पदावर बसवुन 25 लाख रुपयांचा मोबदला देऊन जाणार आहेत अशी देखील चर्चा आहे. वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे अद्याप पर्यंत गुलदस्त्यात आहे. परंतु ज्या सेवकांनी बदलीच्या खात्यात रुजु झाले नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. 

प्रभारी उपकामगार अधिकारी पदावर सध्या सुहास शेवते, देवराम तळपे, पंकज धायगावे, विशाल कदम, विकास खिलारे, संजय दारवटकर, दिलिप भोईर व प्रशांत चव्हाण यांना नियुक्ती देण्यात आली आहे. हे सर्व आठही सेवक झोपडपट्टी निर्मूलन, चाळ विभाग, जनरल रेकॉर्ड, स्थानिक संस्था कर, मालमत्ता, सांस्कृतिक केंद्र मलःनिस्सारण या खात्यातून आले आहेत. त्यामुळे ठेकेदारांच्या बिलांवर आता नेमके कोण सह्या करीत आहेत, नितीन केंजळे सह्या करीत आहेत काय, की शिवाजी दौंडकर यांनी सह्या करणे सुरू केले आहे याबाबत माहिती हाती आली नाही. तरी देखील बदली झालेल्या त्या आठ सेवकांची तातडीने चौकशीकरून दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी संविधान परिषदेने केली आहे.