Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

घरातील कपाटाचं लॉक दुरूस्त करायला सांगितल अन्‌‍ चोरानं 15 तोळे सोन्यासह दोन लाखावर हात साफ करून पोबारा केला

  • श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली –
    आंतरराज्य घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह नंदुरबार जिल्हयातुन अटक
  • टोळीकडून सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने व रोख 1 , 9 0,000 / – रुपये जप्त
  • बंडगार्डन पोलीस स्टेशनची कामगिरी,

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यात घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचे पुनः एकदा आढळुन आले आहे. एखादया भागात फिरून त्या भागाची पूर्णपणे रेकी करायची आणि घरफोडी करण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांचा उपयोग धंदा करीत असल्याचे दाखवुन, घरफोडी करण्याचा प्रकार बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील ताडीवाला रोड येथे समोर आला आहे.


दिनांक 26/07/2022 रोजी फिर्यादी महिला वय 42 वर्षे , रा . 344/46 पाण्याचे टाकीजवळ 13 ताड़ीवाला रोड़ पुणे या त्यांचे घरी असताना लॉक दुरुस्ती करणारे दोन इसम त्यांचे वस्तीत आले होते . त्यांनी इसमांना त्यांचे कपाटाचे खराब झालेले लॉक दुरुस्त करणेस सांगितले. या इसमांनी हे लॉक दुरुस्त करत असताना फिर्यादी यांना लॉक बसविणे करीता एक नट दुकानातुन आणावा लागेल असे सांगुन यांना नट आणने करीता दुकानात पाठविले नंतर त्याचा फायदा घेऊन सदर इसमानी फिर्यादी यांचे घरातील कपाट बनावट चावीने उघडुन कपाटामधील रोख रक्कम तसेच सोन्याच्या बांगडया , सोन्याची चेन , मंगळसूत्र , कानातील टॉप्स , झुमके सुमारे 15 ताळे वजनाचा असा ऐवज घरफोडी करुन चोरी करुन नेल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा रजि नंबर 202/2022 भादवि कलम 454,380.34 प्रमाणे गुन्हा दिनांक 27/7/2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे .

गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन श्री. प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन व श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक यांनी जातीने लक्ष घालुन तपास पथकास मार्गदर्शन करुन तपासासाठी टिम तयारी करण्यात आली.
 गुन्हयातील फिर्यादी महिला यांनी आरोपीना पाहिलेले असल्याने त्यांचेकडुन आरोपींचे वर्णन घेऊन तसेच सीसीटीव्ही कॅमेरातील आरोपींचे फुटेजचे आधारे तपास सुरु केला असता तपास पथकाचे नितीन जगताप यांचे गुजरात राज्यातील गुप्त बातमीदाराकडून दाखल गुन्हयातील आरोपी हे नंदुरबार शहरातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ तेथील स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार नितीन जगताप, सागर घोरपडे, ज्ञानदेव बढे यांचे पथक तयार करुन त्यांना नंदुरबार या ठिकाणी पाठविले . 
त्यांनी नंदुरबार या ठिकाणी जावुन संशयीत आरोपींचा तपास केला असता चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्याचे तयारीत असताना 1 ) प्रधानसिंग ऊर्फ पठाण बख्तावरसिंग शिकलीकर , वय 41 वर्षे , रा . एकता नगर , नंदुरबार व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना 24 तासाचे आतमध्ये ताब्यात घेऊन त्यांचेकडुन फिर्यादी यांचे घरातील चौरी केलेले सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने व 1 , 9 0,000 / - रोख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी प्रधानसिंग शिकलीकर हा घरफोडीचे गुन्हे करणारा आंतरराज्य सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द राजकोट , सुरत , गुजरात राज्य इत्यादी ठिकाणी एकुण 07 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असुन नमुद आरोपी सध्या जामीनावर असताना त्याने वरील प्रमाणे गुन्हा केलेला आहे . 
सदरची कारवाई श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर . श्री . सागर पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02 पुणे शहर , श्री . आर . एन . राजे . सहा . पोलीस आयुक्त लष्कर विभाग , श्री . प्रताप मानकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे व श्रीमती अश्विनी सातपुते पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली 
श्री . राहुल पवार पोलीस उप निरीक्षक तसेच पोलीस अमलदार नितीन जगताप, अनिल कुसाळकर , अमोल सरडे , संजय वणवे , किरण तळेकर , सागर घोरपडे , शिवाजी सरक . ज्ञाना बढे , मनोज भोकरे , सतिष मुंढे यांनी केली आहे .