Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pune news

गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…

गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…

पोलीस क्राइम
पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडील सर्व पोलीस ठाण्यांची धडक कारवाई…. पुणे/दि/ प्रतिनिधी/natioanl forumदुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तिसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत येऊन राडा करतात, वाहनांची जाळपोळ, तोडफोड करतात, चौथ्या पोलीस स्टेशन हद्दीत कोयते, तलवारी हवेत फिरवून मस्तवाल गुन्हेगार पोलीसांना आव्हान देत लुटालूट करतात, पुनः हॉटेल फोडले, पेट्रोलपंप लुटला असे गुन्हे देखील कमी नाहीत, तोच अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी दारूची तस्करी, रोजच्या रोज शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना घडत असल्याने, पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीत कोंम्बिग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग वाढविण्याच्या सुचना दिल्यानंतर, आज संपूर्ण पुणे शहरातील पोलीस अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. मध्यवर्ती ...
शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

शिवाजीनगरात पुनः सुरू झाला पोलीस भागीदारीतील मटका जुगारीचा अड्डा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, पुणे शहरातील संपूर्ण पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र कोंम्बिग ऑपरेशन सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजुला पोलीस उप आयुक्त संदीपसिंह गिल हे स्वतः रस्त्यावर उतरून, वाहन परवाने तपासणे, दुचाकी वाहनावरील ट्रीपल सिट असणाऱ्यांवर स्वतः कारवाई करीत आहेत, तसेच काही पोलीस स्टेशन हद्दीतील स्लम एरियात जाऊन तेथील मुले व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून व्यसनमुक्ती सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लहान मुलांचा गुन्हेगार कसे वापर करीत आहेत, मुले व्यसन कशी करीत आहेत याबाबत पालकांनी कसे जागृत असले पहिजे याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मात्र भलताच कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भैय्यावाडी येथे पोलीस भागीदारीतील...
पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वाढते शहरीकरण, वाढते नागरीकरण, विस्तारित होत चालेला सोशलमिडीया यामुळे नशाखोरीचे ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखाबंदी केली असली तरीही शासन व पोलीस यांची नजर चुकवून, चोरट्या मार्गाने आजही गुटखा विक्री होत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनसह इतर गुन्हे शाखांकडून कारवाया सुरू आहेत. त्यातच आता अंमली पदार्थ सेवन करण्याचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी विभाग गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कारवाया केल्या तरी सोशल मिडीया आणि ऑनलाईन मार्केटमुळे पोलीसांची नजर चुकवून चोरटी विक्री होत आहे. दंडात्मक कारवाई होत असली तरी सामाजिक जाणिवेतून जनजागृती होणे देखील तितकीच आवश्यकता आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खडक पोलीस स्टेशन यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेज सह चौका चौ...
पुण्यात चोर-दरोडेखोरांनी घातलेल्या दरोड्यातील, सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, फिर्यादींना पुनः प्रदान….

पुण्यात चोर-दरोडेखोरांनी घातलेल्या दरोड्यातील, सुमारे 5 कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, फिर्यादींना पुनः प्रदान….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या पाचही परिमंडळातील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असणारे दरोडा, चेन चोरी, घरफोडी, चोरी व इतर गुन्हयातील चोरीस गेलेले सोने / चांदीचे दागिने फिर्यादी यांना पुनः प्रदानाचा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सुमारे पाच कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेले सोने चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीस दिले असल्याचे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. पोलीसांना 100 कोटींचा निधी देणार -अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्या प्रकारे करतात. पोलीसांना अद्ययावत शस्त्रे व साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि समाजातील उत्तरदायित्व न...
पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पुणे पोलिसांकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थाची बाजारपेठ होत आहे काय….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 व 2 यांनी मागील आठवड्यात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट यांनी देखील मोठी कारवाई करून सुमारे 5 लाख 19 हजार रुपयांचे चरस अंमली पदार्थासह 3 तलवार, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कु-हाड, 1 चाकु, 1 रापी अशी बेकायदेशिररित्या हत्यारांसह सुमारे 5 लाख 72 हजार 50 रु चा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ पथकाचे विनायक गायकवाड यांनी तर अंमली पदार्थाविरूद्ध मोहिम उघडली आहे. मागील सहा महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. थोडक्यात मुंबई पाठोपाठ पुणे ही अंमली पदार्थांची बाजारपेठ होत चालली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही घटनांचा आढावा घेतला आहे. उनजो ऑनलाईन डिलीव्हरी ॲपचा वापर करून एल...
पुण्यातील जनता वसाहत… अरुंद रस्ता… एकमेकांना लागला धक्का, झाली बाचाबाच… दिल्या शिव्या… चिडून जाऊन त्याने घातला डोक्यात दगड आणि केला खून,

पुण्यातील जनता वसाहत… अरुंद रस्ता… एकमेकांना लागला धक्का, झाली बाचाबाच… दिल्या शिव्या… चिडून जाऊन त्याने घातला डोक्यात दगड आणि केला खून,

पोलीस क्राइम
दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंदनॅशनल फोरम/ पुणे/ दि/ प्रतिनिधी/दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सुनील विठ्ठल मोरे वय 52 वर्ष रा. जनता वसाहत यांचा पहाटे कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्या बाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट तीन यांनी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दत्तवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने केलेले तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या बातमीदार मार्फत आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर स्थानिक घटनास्थळी उपस्थित असलेला आरोपी समीर उर्फ वीरेंद्र पांडुरंग चौरे वय-33 वर्ष रा.निलायम पुलाजवळ, पर्वती पायथा यास अटक करण्यात आली. तपासात निष्पन्न झालेला माहिती...
फुकटच्या जादा पैशाचे अमिष पुणेकरांना पडले महागात, पुण्यात 395 चा उद्रेक, 420 ही कमी नाहीत…

फुकटच्या जादा पैशाचे अमिष पुणेकरांना पडले महागात, पुण्यात 395 चा उद्रेक, 420 ही कमी नाहीत…

पोलीस क्राइम
395 मध्ये तथाकथित पत्रकार, कार्यकर्त्यांसह पोलीसांचाही सहभाग420 मध्ये खाजगी सावकार सामान्यांना गंडा घालतात, तर याच खाजगी सावकारांना शेअर मार्केट मधील लॉबी गंडा घालत आहे… पुणे/दि/ अनिरूद्ध शालण चव्हाण/पाण्यातील मासा, पाणी कधी पितो हे कुणालाच ठाऊक नसते…. लहान माश्याला मोठे मासे खातात हा निसर्ग नियम आहे…. एससी,एसटी वर ओबीसींसह प्रस्थापित सवर्ण मंडळी असंवैधानिक अत्याचार करीत असतात… अगदी तस्संच काहीस पुणेकरांचे झाले आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, सगळे जादा पैशाच्या मागे लागले आहेत. त्यातच पुणे शहरात सध्या मटका, जुगार अड्डयांचे महाव्दार उघडले आहे. गैरकायदयाच्या मंडळींनी त्या त्या हद्दीत एकत्र येऊ गैरकायदयाची कामे वेगात सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र ज्यादा पैशाच्या अमिषाने खाजगी सावकार सर्वसामान्य किरकोळ दुकानदार, नोकरदार,गृहिणी यांच्याकडून दुप्पट, तिप्पट व्याज वसूल करीत आहे, तर हेच...
महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

पोलीस क्राइम
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पु...
पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील सप्ताहात विमानतळ पोलीस स्टेशन व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दतील मजसा पार्लर, स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने त्यांच्याविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियमातील कलम 3, 4 व 5 सह भादवी 370 व 34 नुसार गुन्हे दाखल करून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध जबर दहशत बसविण्यात आली आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील चार महिन्यात सुमारे 8 ते 10 ठिकाणी कारवाया करून देखील अपव्यापाराची कमी शिक्षा व कमी दंडाचे कलम लावुन आरोपींवर दयामाया का दाखविण्यात आली याबाबत सामाजिक संघटना प्रश्न विचारत आहेत. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वर्षांपासून सेक्स टूरिझमच्या नावाखाली मोठा वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. कोरेगाव पार्क, कल्याणी न...
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील खराडी चौकातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्ठी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. धडक कारवाई -अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड , सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते आणि संदेश काकडे हे चंदनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते.यावेळी पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके आणि मारूती पारधी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील काहीजण हे खराडी चौकातुन रक्षक नगरकडे जाणाऱ्य...