पाजा, पाजा… आंबेडकरी बहुजन समाजाला गावठी हातभट्टी पाजा,कष्टकरी, वंचित, पीडित बहुजन समाजाच्या तिसऱ्या पिढीला देखील देशी दारू आणि गावठी हातभट्टीपासून ठार करा, मारा, उध्वस्त करा,
वाडी ते बिबवेवाडी व्हाया 32 परगणा…बेकायदा धंदेवाल्यांना खूप पैसा कमवायचा आहे, पोलिसांना हप्ता घ्यायचाय, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षांचे नेते पुढारी आणि तथाकथित पत्रकारांना ब्लॅकमेलचा धंदा करून खंडणी उकळायची आहे, चौघेही मिळून आंबेडकरी बहुजन समाजाची तिरडी उचलत आहेत
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तातील सामाजिक सुरक्षा गुन्हे विभाग यांनी लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करून सुमारे 8लाख 28 हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन व विमानतळ पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लोणी काळभोर व विमानतळ पोलिस स्टेशन ही दोन पोलीस स्टेशन नाममात्र आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त...