Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: disadvantaged’ from India?

‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

‘वंचित’ ला INDIA आघाडीपासून वंचित ठेवण्याचा कोणता शहाणपणा ?

राजकीय
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/इंडीया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत पार पडली. भाजप विरोधात एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाहीत. वंचित सोबत नसेल तर महाराष्ट्रात इंडीया आघाडीचे भविष्य काय असेल? आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या बैठकीमध्ये 2024 ला भाजपला घेरण्याचे मनसुभे आखले गेले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्रित येण्याची हाक देणाऱ्या या आघाडीने महाराष्ट्रातील राजकारणात प्रबळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रणच दिले नसल्याची बाब वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्पष्ट केलीय. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचितचा झंझावात निर्माण झाला होता. युतीची बोलणी फिस्कटल्याने वंचितने एम आय एम सोबत निवडणुका लढवल्या होत्या. ...