पैशांसाठी प्रशासकांचा नंगानाच, पुणे महापालिकेतील सनदी अधिकारी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांच्या भ्रष्ट कारभारावर राज्य शासनाचे ताशेरे
शासनाच्या खांदयावर बंदूक ठेवून महापालिका कर्मचाऱ्यांना शुट आऊट करणाऱ्या प्रशासकांना शासनाची चपराक
तीन वर्षात 30 वेळा आकृतीबंधातील बदल कशासाठी पाहिजे,बदली,पदोन्नती आणि पदस्थापनेत भ्रष्टाचार आणि पैसे खाण्यासाठीच आरआरमध्ये बदल केले आहेत काय,
ईडी आणि सीबीआय वाले झोपले आहेत काय, त्यांना पुणे मनपातील भ्रष्टाचार दिसत नाही काय…
आयुक्त, अति. आयुक्त, उपआयुक्तांसह खातेप्रमुखांची 100 कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असण्याची शक्यता, संघटनांची चौकशीची मागणी….
पुणे महापालिकेत किती रामोड आहेत…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेचा आकृतीबंध 2014 साली लागु झाल्यानंतर लगतच्या काही वर्षांमध्ये त्यात सातत्याने बदल केले जात आहेत. काही कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता व अनुभवाची वर्षे समोर ठेवून, आकृतीबंधामध्ये त्याच पद्धतीने बदल केले जात आहेत. केवळ काही विशिष्ठ कर्मचाऱ्यांना त्य...