
शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर, मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट
धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून ओबीसी वर्गातून त्यांना वाढता पाठिंबा
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून ते लवकरच शिंदेना रामराम ठोकुन राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे समजते. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून माहिती समोर येत आहे.
कोण आहेत हे सचिन जोरे -ॲड.सचिन जोरे हे माजी न्यायाधीश असून, एमपीएसी मध्ये राज्यात प्रथम आले आहेत. टॉपर असलेले श्री. जोरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीकडून इंदापुर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सत्ताधारी भाजपा व काँग्रेसच्या उमेदवाराच्या तोडीची मते...