Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: पुणे महापालिकेत 2018 पासून रोस्टर तपासून घेतलेच नाही

पुणे महानगरपालिकेत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षित पदांवर खुल्या गटातील उमेदवारांची नियुक्ती, पुणे महापालिकेत 2018 पासून रोस्टर तपासून घेतलेच नाही

पुणे महानगरपालिकेत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षित पदांवर खुल्या गटातील उमेदवारांची नियुक्ती, पुणे महापालिकेत 2018 पासून रोस्टर तपासून घेतलेच नाही

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षित पदांवर खुलेआमपणे खुल्या संवर्गातील सेवकांच्या धडाधड नियुक्त्या केल्या जात असल्याची बाब दिसून आलेली आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेने 2018 पासून आज 2023 या कालावधीत सर्व पदांचे रोस्टर विभागीय आयुक्त कार्यालय मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे आवश्यक असतांना देखील ते तपासून घेण्यात आली नसल्याची बाबही समोर आली आहे. दरम्यान शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी दरवर्षी मागासवर्गीयांना देण्यात येणारी पदोन्नती व पदस्थापनेमध्ये रोस्टर व बिंदू नामावली प्रमाणे तपासणी व नियुक्त्या करण्याचा शासन निर्णय असताना देखील पुणे महानगरपालिकेने 2018 पासून रोस्टर तपासणी केली नसल्याने जाणीवपूर्वक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग (अबकड), विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षित असलेल्या पदोन्नतीच्या जागांवर खुल्या स...