Monday, December 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

सामाजिक सुरक्षा विभागाने बंदी असलेला पंतगाचा मांजा जप्त केला, तर गुन्हे युनिट क्र. 1 यांची कोयत्यावर संक्रांत

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
कोणत्याही जाती व धर्माचा सण उत्सव असो, घर सजावटीचे सर्व साहित्य बोहरी आळीत मिळणार म्हणजे हमखास मिळणार हे पुणेकरांना पक्के ठाऊक आहे. दिवाळी,दसरा असो की, ईद, ख्रिसमस, गणपती उत्सव की डॉ. आंबेडकर जयंती… पुणेकर नागरीक महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रोड वर आला नाही असे कधी होतच नाही. मंडई, लक्ष्मी रोड नंतर सर्वांचे पाय बोहरी आळीकडे वळतात असा अनुभव आहे. परंतु यंदा याच बोहरी आळीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखेची संक्रांत आली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाकडून प्रतिबंधित मांजा जप्त –
पुण्यातील रविवार पेठेतील बोहरी आळी येथे प्रतिबंधित मांजा साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा घरामध्ये साठवणूक करून विक्री करीत असल्याचे आढळुन आल्याने, संबंधितांकडून नायलॉन मांजाचे 24 रिल जप्त करून संबंधिताविरूद्ध खडक पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 188 अन्वये गुन्हा नोंद केली आहे. ही कारवाई सपोनि अनिकेत पोटे, अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, राजेंद्र कुमावत, नदाफ पठाण, कांबळे यांनी केली आहे.

गुन्हे शाखा युनिट क्र. 1 ने 105 कोयते जप्त केले –
पुणे शहरात सध्या कोयत्याची मोठी दशहत निर्माण झाली असून, पुणे शहराच्या बहुतांश भागातील अल्पवयीन मुले हातात कोयता घेवुन दहशत माजवित सुटले आहेत. दरम्यान कोयता गँगचा मुद्दा राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजल्यानंतर, मात्र पुणे शहर पोलीसांनी कंबर कसली. कोयत्याची एकच मोठी टोळी नसली तर वेगवेगळ्या भागातील अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते येतात तरी कुठून हा प्रश्न अनुत्तरीत होता. दरम्यान फरासखाना पोलीसांनी जुन्या बाजारात कोयता विक्रीवर कारवाई केल्यामुळे जुन्या बाजारातून कोयते विक्री बंद झाली होती. दरम्यान गुन्हे शाखेकडील श्री. निलेश साबळे व श्री. अजय थोरात यांनी जंगजंग पछाडले असता, बोहरी आळी येथे कोयता विक्री करीत असल्याचे आढळुन आले आहे. दुकानांवर कारवाई करून सुमारे 105 कोयते जप्त करण्यात आले आहेत.

संक्रांत अजुन लांब असली तरी आत्ताच बोहरी आळीवर संक्रांत आली आहे एवढं मात्र नक्की. एका पोलीस कर्मचाऱ्याने नॅशनल फोरम कडे प्रतिक्रिया व्यक्त केली होती, ते म्हणाले होते की, 30 दिवसात 720 तास होतात. या 720 तासापैकी आम्हाला केवळ 72 तास दया, साऊथचे चित्रपटही  पुणे पोलसांपुढे फिक्के पडतील. आम्हाला कारवाई करतांना, बंदूक नको, आणि विशेष म्हणजे मोबाईलही नको. ऐके काळात नेपाळची कुकरी देखील आम्ही गाडून टाकली आहे. 

कोयता काय घेवून बसता, गुन्हेगारच काय, खाटकाकडं देखील कोयता पहायला मिळणार नाही. गुन्हेगारांना कमरेतून न्हाई तर मुळासकट उखडून फेकु. महिन्यातील फक्त चारच दिवस... पोलीसांना दया. अशी थेटच गर्जना पोलीसांनी केली होती. दरम्यान पोलीस कर्मचारी श्री. निलेश साबळे व श्री. अजय थोरात यांनी कोयता विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून आता खाटकाकडं देखील कोयता राहतो की नाही असे मिश्कील टिपण्णी देखील सोशल मिडीवर व्यक्त केली जात आहे.