Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शोले चित्रपटाचा पार्ट- टू, पुण्यात सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खुन

crime bracnch 1

क्राईम ब्रॅंच युनिट क्र. 1 ने सराईतांना साडेतीन तासात केले जेरबंद
पुणे/दि/ प्रतिनिधी/
सख्ये जीवाभावाचे मित्र. चोरी, दरोडे एकत्रच घालायचे. एकत्रच जेलवारी करायचे. थोडक्यात शोले चित्रपटातील जय-विरूची जोडी. पण मध्येच शोले मधली बसंती आडवी आली आणि घात झाला. भाईविश्वातील भाषेचा वापर करायचा तर, नम्रकारीने जयचा घात केला. एवढा की, चेहराही ओळखु आला नाही. पोलीसांची शोधा शोध सुरू झाली. क्राईम ब्रँच युनिट एक ने पूर्वीच्या दूरदर्शनवरील एक शून्य शून्य मालिकेतील हिरोसारखी भूमिका निभावली आणि साडेतीन तासातच खरे गुन्हेगार शोधून काढले. शोले चित्रपटातील पार्ट दोनचा उलगडा झाला.


गुन्ह्याची हकीकत अशी की, विश्रामबाग पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पुना हॉस्पीटलचे पाठीमागील बाजुस मोकळ्या मैदानात एक अनोळखी व्यक्तींचा धारदार शस्त्राने वार करून खुन झाला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भोसले युनिट 01 , गुन्हे शाखा पुणे शहर यांना नियंत्रण कक्ष गुन्हे शाखा येथून मिळाली . गुन्हा घडलेबाबत माहिती मिळताच तात्काळ युनिट 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली.

कानुन के हाथ बहोत लंबे होते है-
खुन इतका निर्धुन पणे केला होता की मयताच्या चेहऱ्यावरून त्याची ओळख पटवणे अवघड झाले होते . मयताचे सोबत कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नव्हते . घटनास्थळ हे निर्जन असल्याने सी.सी.टी.व्ही . कॅमेरा उपलब्ध नव्हते . खुन केव्हा झाला, कोणी केला, मयत इसम कोण, हे समजणे कठिण झाले होते. आजुबाजुस दारुच्या बाटल्या जेवणाची प्लेट , सिगारेट अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या . पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन घटनास्थळावर उपलब्ध असलेला वस्तुजन्य पुरावा व मुखबिरामार्फत मिळालेल्या माहितीवरून मयत इसमाचे नाव आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी वय 32 वर्ष रा रूम नं 5. चाळ नं 50. पर्वतीदर्शन कॉलनी, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी गुन्हा करुन धायरी भागात पळुन गेले –
तसेच घटनास्थळी मिळालेल्या जेवणाच्या प्लेटवरुन जवळपासचे विविध हॉटेलमधील सी सी टि व्ही फुटेज चेक केले असता , त्यापैकी एका हॉटेलमधुन मयत इसम हा दोन अनोळखी इसमांबरोबर जेवणाचे पार्सल घेत असतानाचे फुटेज प्राप्त झाले त्यानुसार या फुटेज बातमीदारांना दाखवुन आरोपींचे व मयताचे नाव निष्पन्न केले.
आरोपी राहत असलेल्या भागात दोन टिम तात्काळ रवाना केल्या. स्वत पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे आरोपींच्या मागावर पथकासह होते. आरोपींचा शोध घेत असतानाच बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन्ही आरोपी हे गुन्हा करुन धायरी भागात पळुन गेले आहेत .

तात्काळ दोन्ही टिम धायरी भागाकडे रवाना करुन प्राप्त बातमीप्रमाणे धायरी गाव या ठिकाणी सापळा रचुन दोन्ही संशयीत इसमांना शिताफीने महिती मिळाल्यापासून साडे तीन तासात ताब्यात घेवून जेरबंद केले आहे . ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयीतांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी आपले नाव पत्ते 
1 ) सुधीर उर्फ बंडु गौतम थोरात वय 32 वर्ष रा हॅपी हाऊस समोर , कुंभारवाडा , पुना हॉस्पीटलजवळ , पुणे 2 ) संदीप उर्फ सॅन्डी सुरेंद्र नायर वय 28 वर्ष रा शेळके वस्ती , अप्पर इंदिरानगर , बिबवेवाडी , पुणे. या दोन्ही संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडे खुनाबाबत चौकशी केली असता त्यांनी इसम आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी याचा खुन केला असल्याची कबुली दिली आहे.   
 संशयीत आरोपी संदीप ऊर्फ सॅण्डी नायर याचे विरूध्द पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यास गंभीर दुखापतीचे 02 , जबरी चोरी 01 असे 03 गुन्हे दाखल असून त्याला पुणे शहर व जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आलेले आहे . 

आरोपी सुधीर उर्फ बंडु थोरात याचे विरूध्द गंभीर दुखापतीचे 02. घरफोडीचा 01 , इतर चोरीचे 09 असे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत . मयत इसम नामे आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी हा देखील रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचे विरुध्द पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यास घरफोडी चौरी च्या 08 , इतर चोरी 02 , फसवणुकीचा 01 . अमलीपदार्थ 01 व तडीपार आदेशाचा भंग केल्या प्रकरणी 03 असे एकुण 15 गुन्हे दाखल असून , त्याचे विरूध्द तिन वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे . 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर , श्री . अमिताभ गुप्ता, मा . पोलीस सह - आयुक्त , श्री . संदीप कर्णिक , मा . अपर पोलीस आयुक्त श्री . रामनाथ पोकळे गुन्हे शाखा , पुणे मा.पोलीस उप - आयुक्त , श्री . श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखा पुणे शहर सहा . पोलीस आयुक्त गुन्हे -1 मा.गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली,

क्राईम ब्रॅंच युनिट एकची कामगिरी –
क्राईम ब्रँच युनिट 1 कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी , रमेश तापकीर , पोलीस अंमलदार निलेश साबळे, राहुल मखरे , शशिकांत दरेकर , अनिकेत बाबर , दत्ता सोनवणे , शुभम देसाई, अभिनव लडकत, अयाज दडडीकर, विठ्ठल साळुंखे व महिला पोलीस हवालदार रुक्साना नदाफ यांनी केली आहे .