Thursday, December 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील कायम व 10 हजार कंत्राटी कामगारांच्या पाठीशी कारवा संस्था उभी – ॲड. अंबादास बनसोडे

पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/
राज्यातील शोषित, पिडीत, अत्याचारग्रस्त, वंचित घटक व समुहांच्या न्याय हक्कांसाठी कारवा ही संस्था कार्यरत असून, वकीलांसह सुसज्ज केडरबेस कार्यकर्त्यांची एकसंघपणे वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच महापालिका, जिल्हापरिषदांसह स्थानिक स्तरावरील सर्व शासन यंत्रणांमधील अधिकारी, कर्मचारी तसेच अन्यायग्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी कारवाँ ही संस्था महाराष्ट्रात कार्यरत असल्याची माहिती ॲड. अंबादास बनसोडे यांनी येथे दिली आहे.
पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत त्यांनी नमूद केलं की, राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालये व उच्च न्यायालयात शोषित, पिडीत वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी कोर्ट प्रकरणे सुरू आहेत. तसेच अनुसूचिज जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदयानुसार देखील अनेक प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल आहेत. प्रखरपणे ही कोर्ट प्रकरणे तडीस नेली जात आहेत.


पुणे महापालिकेतील 20/25 हजार कायम सेवकांसह 10 हजार कंत्राटी कामगारांच्या पाठीशी कारवा संस्था उभी असून वेळोवेळी प्रत्येक विभागांचा आढावा घेवून त्याबाबत कार्यवाहीची सुरू आहे. तसेच वर्ग 1 ते 4 संवर्गातील बदली, पदोन्नती, पदस्थापनेबाबत तसेच महिलांच्या अत्याचाराबाबत न्यायाची भूमिका कारवा संस्था बजावित असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केलं आहे.
कारवा या संस्थेचे रास्ता पेठ, केईएम हॉस्पीटल येथे कार्यालय असून वंचित शोषित घटकांनी संपर्क करण्याचे आवाहन नॅशनल फोरमच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच संस्थेच्या वतीने 9975265007 हा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे.