Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

फरासखाना पोलीस हद्दीतील भोई गल्ली येथे रोडवर राडा, हवेत कोयता फिरवुन, आमच्या नादला कुणी लागले तर याद राखा

पुणे/दि/ प्रतिनिधी/
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील भाई गल्ली येथे सार्वजनिक रस्त्यावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाच टोळ्यांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, हातामध्ये कोयते घेवून आराडा ओरडा करून आमच्या कुणी नादाला लागले तर याद राखा असे म्हणत परिसरात दशहत निर्माण केली आहे.

श्री. देवकाका शिरोळे वय 19 रा. कसबा पेठ यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, यातील नमुद इसमांनी पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हातामध्ये कोयते घेवुन आरडा - ओरडा करून , फिर्यादी देवकाका शिरोळे यांचा पाठलाग करून, तसेच दहिहंडी उत्सवासाठी सराव करणारे मुलांवर दगडफेक केली . तसेच रोडचे बाजुस उभ्या असलेला मोटार सायकलवर कोयत्याने व दगडाने मारुन, तोडफोड करुन , त्यांचे हातातील कोयता हवेत फिरवुन आमच्या नादाला कोणी लागेलतर याद राखा असे म्हणुन सदर परिसरात दहशत निर्माण केली . 
त्यामुळे आजुबाजुस असणारे दुकानदार व स्थानिक नागरीकांनी भितीने त्यांची दुकाने व घरे बंद करून घेतली आहेत. फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला पाच आरोपींवर ादविक 143 , 147 , 148 , 14 9 , 427 , क्रिमीनल लॉ अमेडमेंट ॲक्ट कलम 3 . 7 , महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 ( 1 ) ( 3 ) 135. आर्म ॲक्ट कलम 4 ( 25 ) प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली नसून अधिकचा तपास पोलीस उप निरीक्षक दाढे करीत आहेत.