Saturday, May 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

१२ आमदारांचे निलंबन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक : आंबेडकर

पुणे/दि/
राज्यातील बारा आमदारांचे निलंबन करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असंवैधानिक असल्याचे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले, हा निर्णय असंवैधानिक आहे. सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. सभागृह, मग ते पार्लमेंट असो की राज्याची विधानसभा असो, नेशन विदिन नेशन या तत्वावर चालते.


सभागृहातील लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का? हे पाहावे लागेल. आमच्या मतानुसार हा निर्णय असंवैधानीक असून अधिकारक्षेत्र नसताना दिलेला आहे. असे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.