Saturday, June 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची आली तरी सत्ताधारी हेच असतात व विरोधी पक्षातही हेच असतात.

कोणताही राजकीय पक्ष आणि त्याचा नेता महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण या विषयावर बोलत नाहीत. पदोन्नतीचे आरक्षणाबाबतही यांना काहीच देणं-घेणं नाही. सगळे गप्प असतात. जनतेचा रेटा आल्यास, तेवढ्यापुरते तोंड उघडतात, आणि पुन्हा गप्प बसतात. ते का गप्प बसतात हे तरी पहा-
१. शरद पवार – प्रा.एन.डी. पाटील.
२. शंकरराव मोहिते-पाटील – बाळासाहेब देसाई.
३. दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) माजी राज्यमंत्री अजित घोरपडे हे परस्परांचे साडू-बंधू
४. अजित पवार यांची पत्नी – सुनेत्रा पवार या खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे.
५. जयंत पाटील यांची बहीण – माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे (मेहुणे)
६ जयंत पाटील – शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू-बंधू).
७ आमदार विलासराव शिंदे यांची बहीण – शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे.
८ आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी – सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री ह्या सख्ख्या बहिणी आहेत.
९ प्रमोद महाजन + गोपीनाथ मुंडे = मेहुणे. (प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ. आहे.)
शरद पवार + बाळासाहेब ठाकरे = व्याही. (शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई, भाचा सदानंद सुळे यांच्या सौभाग्यवती आहे.)
१० सचिन पायलट + फारूक अब्दुल्ला = जावई. (केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मिरचे फारूक अब्दुल्ला यांचे जावई).
११ कलमाडी + निंबाळकर राजघराणे = व्याही. (निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई).
१२ शरद पवार + सुशीलकुमार शिंदे = साडू-बंधू (शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे ह्या सख्ख्ख्या बहिणी).
१३ स्व. विलासराव देशमुख + डिसुझा + भागनानी + हुसैन = व्याही.
(विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत. जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी).
मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते.
१४ विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत.
१५ विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून.
१६ विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे. (चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून).
१७ पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते.
१८ शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण ऍड. विराज काकडे यांची पत्नी आहे.
१९ कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले…!
२० दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून कॉंगेसचे विद्यमान आमदार मालोजीराव यांची पत्नी.
२१ राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी.
२० शरद पवार यांची एक मेहुणी ना.म. जोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.
२१ पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खडेर्कर यांची पत्नी. दादाराजे खडेर्कर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी.
२२ दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे शिवेंद्रराजे यांची पत्नी.
२३ कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात.
२४ कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेसचे आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे. (राजळे यांची आई ती थोरातांची बहीण).
२५ राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी.
२६ नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई.
२७ अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री कॉंग्रेसचे नेते होते. त्याची नात ही नारायण राणे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची पत्नी. २८ कर्जत जामखेडचे कॉंगेसचे बापूसाहेब देशमुख व उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघे व्याही.
२९ जालन्याचे अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव व विद्यमान मंत्री राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.
३० भोकरदन भाजपा चे खा.रावसाहेब दानवे यांची मुलगी शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांना दिलेली आहे…

  • हे सगळे एका ताटात जेवतात म्हणून कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी सारे एकच…!
  • वरिल नातेसंबंध समजुन घेवुन जनतेने आपला भाऊ/नातेवाईक/मित्र पहावा राजकारणासाठी एकामेकांवर लाठ्या काठ्या घेवून डोकी फोडू नयेत.. यांच्यासाठी आपापसात भांडू नये..
    हा संदेश संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर फिरला पाहिजे की, जे माझे समाज बांधव आपल्या नेत्यासाठी भावाभावात , मित्रात , नात्यात वैमनस्य निर्माण करून नाती तोडतात व एकमेकाची डोकी फोडतात….तेंव्हा राजकारण हे काय व कस आहे हे आपणच ओळखावे (साभार= व्हॉटसऍप)