Tuesday, January 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

भाजपावाल्यांचा सुसंस्कृतपणा… मला ठाण्याला दाखवायची गरज नाही पण महाजनांना बुधवार पेठेत दाखवा-एकनाथ खडसे

मु. पो. जळगाव/ दि/
भाजपा हा एक सुसंस्कृत पक्ष असल्याचा कांगावा केला जातो. कॉंग्रसेवाले देखील मागे नाहीत. किंबहुना सगळेच पक्ष सुसंस्कृती आणि शिष्टाचाराच्या गप्पा मारत असतात. परंतु आता हेच पक्ष हीणकस दर्जाची भाषा वापरू लागतात तेंव्हा यांचा खरा चेहरा बाहेर येतो. एकानाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय वैर आजपर्यंत कुणालाही दडलं नाही, आता गिरीश महाजन यांना कोरोना झाल्यानंतर खडसेंनी महाजनांना मोक्का लागण्याच्या भितीने कोरोना झाला का हे बघा, अशी कोपरखिळी मारली होती, त्यावरून आता पुन्हा वार-पलटवार सुरू झाले आहेत. मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवा
गेल्या काही महिन्यांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लावल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एका एकदा चर्चेला उधाण आले आहे, खडसेंच्या मोक्का लावण्याच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी काही वृत्तपत्राशी फोनवर बोलताना खडसे यांच्या र टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी पुन्हा आज उत्तर दिले आहे. आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला हवे, असा घणाघात केलाय. त्यामुळे हे किती सुसंस्कृत होते व आहेत याचा विचार करायला हवा.