Monday, August 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

बियार्णी तो बहाणा है, पोलीस उपआयुक्त प्रियंका नारनवरे यांच्यावर आरोप करून कुणाला काय साध्य करायचे आहेघ?

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंत्रालयातील १०३ कक्ष अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. याशिवाय मुंबई पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. एकत्रित प्रसिद्ध केलेल्या बदल्यांमध्ये गृहमंत्रालय, सामान्य प्रशासन, उद्योग, शालेय शिक्षण, विभागातील अधिकार्‍यांना धक्का देण्यात आलेला आहे. तसेच सहकार व पणन खात्यातील बदल्यांचे दोन डझन आदेश जारी करण्यात आले आहेत. २ ऑगस्ट २०२१ रोजी बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात देण्यात आले आहेत. तसेच जर अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर झाला नाही तर त्याच्या विरोधात २३ डिसेंबर २०१६ च्या शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निदेश देण्यात आलेले आहेत. ठाकरे सरकारने २५ टक्के कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केल्यांपासून बदलीपात्र अधिकारी कर्मचारी बैचेन झाले होते. त्यातच मंत्रालयातूनच बदल्यांना प्रारंभ झाल्यामुळे सगळ्याच खाते व विभागात बदल्यांची वावटळ उठली आहे. त्यात पुण्यातील पोलीस अधिकच भेदरलेले असल्याचे दिसून येत आहेत. या बदली प्रक्रियेत आपल्यावर हातोडा पडू नये यासाठी बिर्याणीचे निमित्त करून वरीष्ठ अधिकार्‍यांना देखील कसे जेरीस आणू शकतो हे पुणे शहरातील पोलीसांनी दाखवुन दिले आहे. बिर्याणी तो बहाणा है … असल बात कुछ अगल ही है.

पोलीस उपआयुक्त प्रियंका नारनवरे यांच्याकडून परिमंडळ एकची झाडाझडती –
पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका जुगार अड्डे चालविणार्‍यांना रट्टा मारून त्यांच्यावर प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई केली, वर्षानुवर्षे फरासखाना इमारतीत ठाण मांडून बसलेल्यांची बदली केली, एसीपी, डीसीपी कार्यालयात प्रतिनियुक्ती वरील पोलीस कर्मचार्‍यांची इतर पोलीस ठाण्यात बदली केली, ज्या ज्या ठिकाणी हप्तेखोरी होते, त्या त्या ठिकाणी नाकाबंदी करून, गुन्हेगारांना जेरबंद केले. परिमंडळातील कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी कधी कधी कठोर निर्णय घेण्यात आले. यामुळेच दुखावलेल्या मंडळींनी एकत्र येवून, पोलीस उप आयुक्त प्रियंका नारनवरे यांच्या विरूद्ध षडयंत्र करून, त्यांच्या बदनामीचे कारस्थान रचले असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणांतून प्रियंका नारनवरे आतल्या व बाहेरच्यांना कशा प्रकारे लढा देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचार्‍याला जेवणाची ऑर्डर देतानाचे संभाषण आहे. हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. तर, या संभाषणातील महिला अधिकरी म्हणजे पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे असल्याचे बोलले जात असल्याने, यावर स्वतः पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी आपली बाजू मांडली आहे.
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे म्हणाल्या की, माझ्या झोनमध्ये काही कर्मचारी होते जे बर्‍याच वर्षांपासून ठाण मांडून बसलेले होते. त्यामुळे त्यांचे काही आर्थिक हितसंबंध जुडलेले होते. हप्तेगिरी तिथे चालत होती. माझ्या अगोदर जे अधिकारी काम करत होते, ते देखील यामध्ये सहभागी आहेत. बदल्यांच्या काळातच ही मॉर्फ क्लिप बाहेर का आणली गेली? ही संपूर्ण क्लिप माझी नाही. माझ्या विविध संभाषणांमधील वाक्य यामध्ये जोडलेले आहेत. तसेच, यातील काही भाग जो आहे तो मी बोलली नाही. ही संपूर्णत: मॉर्फ क्लिप आहे, याबाबच चौकशी झाली पाहिचे आणि मी या विरोधात सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार आहे.
महेश साळुंके म्हणून जे कर्मचारी माझ्या कार्यालयात होते, त्यांच्यासोबत जे दुसरे कर्मचारी होते. ज्यांना १२ वर्षे झाली होते, त्यांच्याबाबत मी डिफॉल्ट रिपोर्ट पाठवला होता, कारण ते हप्तेखोरी करत होते. हे सगळं मी येण्या अगोदर व्यवस्थित सुरू होतं आणि मी आल्यानंतर ते सगळं काही बंद झालं. त्यामुळे या सर्वांचे हीतसंबंध फार दुखावले गेले आहेत आणि म्हणून माझी इथून उचलबांगडी व्हावी व त्यांचं जे अगोदर सुरू होतं ते सुरू रहावं यासाठी केलेला हा कट आहे. यामध्ये काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा देखील त्यांना पाठींबा आहे. त्यांच्याच आदेशाने व निदर्शनात हे सुरू आहे. माझ्या करिअरला नुकसान व्हावं, म्हणून हे केलं गेलं आहे.
ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील या ऑडिओ क्लिपची दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

  • फरासखाना बिल्डींगमधील वर्षानुवर्षे ठिय्या मांडून बसलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली केली.
  • पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. १ यांच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील मटका जुगार अड्डे चालविणार्‍यांवर मोक्का अंतर्गत प्रथमच कारवाई केली.
  • अवैध कृती करणार्‍या ज्या हॉटेलांवर मागील ३० वर्षात कधीच कारवाई झाली नाही, त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला.
  • एसीपी व डीसीपी कार्यालयातील प्रतिनियुक्तीवर असलेल्या व वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविला.
  • पुण्यातील लॉकडाऊन काळात परिमंडळांतर्गत चोख बंदोस्त बजावून, अवैध कृती करणार्‍यांना येरवडा जेल मध्ये रवानगी केली.
  • कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तडीपार गुंडांची यादी अपडेट ठेवून, पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश निर्गमित केले.
  • पोलीस परिमंडळातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी, गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढुन अनेक गुन्हेगारांना तडीपार केले.
  • परिमंडळातील पोलीस ठाण्यांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांकडून दबाव आल्यास,तशा प्रकारचा दबावही मोडून काढला, प्रसंगी अनेक विरोधांना तोंड दयावे लागले.

पोलीस बिर्याणी व पोलीस ज्यूस-
मुंबई-ठाण्यात ज्यांनी पोलीस कर्तव्य बजाविले आहे, ते बिर्याणी कधीच मागवित नाहीत –
ज्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुंबई- ठाण्यात कर्तव्य सेवा बजाविली आहे, ते कधीच बिर्याणीची ऑर्डर देत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे. पुण्यातील पोलीसांना कदाचित माहित असेल किंवा नसेल, तसेच पुणेकरांना देखील पोलीस बिर्याणी व पोलीस ज्युस याची माहिती असेलच असे नाही.
मुंबई ठाण्यात पोलीस बिर्याणी व पोलीस ज्युस अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. मुंबई ठाण्यातील कोणताही पोलीस अधिकारी- कर्मचवारी बिर्याणी व ज्युस घेतच नाही. त्यामागचं कारण ऐकलं तर तुम्ही देखील म्हणाल, छी ऽऽ हा काय प्रकार आहे अशा प्रकारचा संताप येईल.
मुंबई व ठाण्यात अनेक अधिकारी, त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यासांठी, वरीष्ठ अधिकार्‍यांसाठी व्हेज व नॉनव्हजे बिर्याणी व ज्युसची ऑर्डर देतात. परंतु त्यासाठी पोलीसांना पैसे देत नाहीत. अशा वेळी पोलीस कर्मचारी देखील आपल्या पदाचा वापर करून, हॉटेलमधुन आपल्या ताकदीच्या बळावर बिर्याणी व ज्युस आणून देतात. परंतु वास्तव असे आहे की, मुंबई ठाण्यातील हॉटेल चालक देखील भयंकर हुश्शार आहेत. पोलीस ज्युस म्हणजे काय – तर ज्युस साठी आणलेल्या फळातून चांगली फळे एका बाजूला व थोडी सडकी फळे एका बाजूला करतात. पोलीसांनी ज्युसची ऑर्डर दिली की, लगेच सडक्या फळांचा सडलेला अर्धाभाग कापुन टाकुन, त्या राहिलेल्या फळांचा ज्युस करून दिला जातो.
पोलीस बिर्याणीची देखील अशीच स्थिती आहे- आपल्या पुण्यामध्ये हॉटेलमध्ये जेवण अर्धवट ठेवत नाहीत. चाटून पुसून खाण्याची पुणेकरांना सवय आहे. परंतु मुंबई ठाण्यात तसे होत नाही. हॉटेलमध्ये जेवण मागविल्यानंतर रद्दा ठेवण्याची मुंबई ठाण्यातील नागरीकांना सवय आहे. तसेच एक कुंडा किंवा कटोरी मधले सगळे जेवण संपत नाही. तेंव्हा तेथील हॉटेल चालक देखील अशा प्रकारचे रद्दा झालेले अन्न एकत्र गोळा करून ठेवतात. पोलीसांनी व्हेज- नॉन व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिली की, हॉटेल मधील रद्दा राहिलेले अन्न गरम करून पोलीसांना दिले जाते. हे रहस्य ज्यांना माहिती आहे, ते सहजा सहजी मुंबई – ठाण्यातील पोलीस बिर्याणीची ऑर्डर देतच नाहीत. बिर्याणी खायची झाल्यास, आम्ही पैसे देणार आहोत हे अगोदर काऊंटरवर सांगतात अशीही भयावह परिस्थिती आहे. मॅक्सच्या आंबेकर यांनी देखील यावर उघड भाष्य केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरला झाला आहे.
त्यामुळे *** मुंबई- ठाण्यात कर्तव्यसेवा बजाविलेल्या व पुण्यात कर्तव्यावर आलेल्या महिला पोलीस अधिकार्‍यांवर केलेले शरसंधान गलिच्छ स्वरूपाचे आहे यात शंकाच नाही. दरम्यान डीसीपी कार्यालयात पूर्वीसारखे येणे होत नाही. त्यामुळे काही अनाहुत सल्ला द्यावासा वाटतो की, कार्यालयाशी निगडीत नसलेला व असलेला एक पतरकार परफेक्ट नाही. त्या पीएसआचे सगळेच ऐकणे उचित ठरणार नाही. झेड ब्रीज आणि फुटक्या बुरूजावरून कुणी वाकुल्या दाखवित असेल तर पोलीसी कर्तव्य बजाविणेच योग्य ठरेल.