Sunday, October 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुणे शहरातील खाजगी डॉक्टर्स व परिचारिका यांना शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात मागील एक दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. पुणे शहरातील खाजगी दवाखाने व छोटी मोठी हॉस्पीटल्स मधील डॉक्टर्स आणि परिचारीका दिवस-रात्र कोरोना ड्युटीवर कार्यरत आहेत. अशा खाजगी डॉक्टर्स आणि परिचारीका यांना शासनाने अधिक सवलती उपलब्ध करून देण्याची मागणी सोशल नवपरिवर्तन संघाचे अध्यक्ष अमोल लोंढे यांनी केली आहे.


कोरोना कालावधीत काही नागरीकांना उलटी, जुलाब, ताप, सर्दी व खोकला झाल्यानंतर जवळच्या स्थानिक खाजगी दवाखान्यात जावुन उपचार घेत आहेत. काही रूग्ण बरे झाले तरी काही रूग्णांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह येत आहेत. सर्व रूग्णांवर खाजगी दवाखाने व छोटे मोठे हॉस्पीटल्स उपचार करत आहेत. परंतु दवाखाने, डिस्पेन्सरी सारख्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर्स आणि परिचारीका यांना कोणत्याही प्रकारच्या सवलती शासनाने दिलेल्या नाहीत.
तरी शासनाने खाजगी डॉक्टर्स व परिचारीका व दवाखान्याशी निगडीत कर्मचार्‍यांना कोरोना सेंटर आणि स्वॅप कलेक्शन सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे, पीपीई किट, सॅनिटायझर मोफत देण्यात यावे, खाजगी डॉक्टरांना विमा कवच संरक्षण द्यावे, तसेच कोरोना कालावधी काम करीत असणार्‍या खाजगी डॉक्टर्स व परिचारिका यांचा योग्य तो सन्मान शासनाने करण्याची मागणी करण्यात आली आहे.