Sunday, October 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुणे महापालिकेत सेवाज्येष्ठतेने पदोन्नतीचे आदेश जारी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने शासनाच्या नियमानुसार अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याचा मुहूर्त शोधला आणि तु तु मैं मै च्या खलबतातून २७ मे २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पदोन्नती करीत असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता या वर्ग एक संवर्गातील अधिकार्‍यांना पदोन्नती देण्यात आली आहे. १८ फेब्रुवारी २०२१ ते २७ मे २०२१ अशा तब्बल तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आदेश जारी केले आहेत.

स्थापत्य विभागात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असलेले सेवाज्येष्ठ अधिकारी १) श्री. एन.डी. गंभिरे २) श्री. संतोष तांदळे ३) श्री. केशव हरिभक्त ४) श्रीमती शिर्के सुस्मिता ५) श्री कडु सुदेश ६) श्री. जोशी प्रसन्नराघव यांना अधीक्षक अभियंता या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान श्री. गंभिरे यांना प्रकल्प कार्यालय -१ येथे पदस्थापना देण्यात आली आहे तर प्रसन्नराघव जोशी यांना पाणी पुरवठा विभागात पदस्थापना करण्यात आली आहे. सहा पैकी चार अभियंत्यांना पदस्थापना देण्यात आली नसून ती नंतर देण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी १०० टक्के पदे सेवाज्येष्ठतेने पदोन्नती देण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. तथापी या कालावधीत अनेक शासकीय, निमशासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना १०० टक्के पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. पुणे महापालिकेने जाणिवपूर्वक १८ फेब्रुवारी २१ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. 
दरम्यान शासनाने २० एप्रिल २०२१ रोजी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता २००४ च्या स्थितीनुसार भरण्याचे आदेश काढले तसेच ३३ टक्के पदांवर आरक्षणानुसार पदोन्नती देण्यचे आदेश जारी करण्यात आले. १८ फेब्रुवारी २०२१ रोजीचा  शासन निर्णय रद्द करून आरक्षण आणि सेवा ज्येष्ठतेने पदोन्नती देण्याचे आदेश जारी करण्यात आले. तरी देखील पुणे महापालिकेने पदोन्नती देण्याबाबत कसुरी केली. 
तथापी १८ फेब्रुवारी २०२१, २० एप्रिल २०२१ रोजीचे शासन निर्णय पुन्हा ७ मे २०२१ रोजी  रद्द करून, पुनः २००४ च्या स्थितीनुसार आरक्षण धोरणाची अंलबजावणी करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शासनाने परस्पर विरोधी शासन निर्णय जारी करून, राज्यातील प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी, सेवाज्येष्ठतेने आरक्षण देण्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. आरक्षणाबाबत मागासवर्गीय संघटनांचे प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयात गेले असून, ऍड. रुपवते व ऍड. डहाट त्याबाबतचे कामकाज पाहत आहेत. २१ जुन रोजी कोर्ट सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. 
पुणे महापालिकेवर देखील अनेक संस्था आणि संघटनांचा दबाव वाढत होता. परंतु महापालिकेच्या प्रशासनातील निगरगट्टू बाबूंनी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत वेळकाढूपणा करण्याचे धोरण अवलंबविले होते. सरते शेवटी आज निर्णय झाला असून, पुणे महापालिकेतील वेगवेगळ्या विभागातील पदोन्नतीचे आदेश जारी केले जात आहेत. देर सही... दुरूस्त ही... 

३१ मे अखेर सेवानिवृत्तांची मोठी संख्या –
पुणे महापालिकेच्या अखंड सेवेतून आज अनेक अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. यामध्ये बांधकाम विकास विभाग झोन क्र. २ मधुन पदोन्नत झालेले अधीक्षक अभियंता श्री. एन.डी. गंभिरे सेवानिवृत्त होत आहेत. तसेच भारत मोहिते, प्रकश हेडाऊ (बायोकेमिस्ट) हे वर्ग एक संवर्गातून सेवानिवृत्त होत आहेत. तर नंदकुमार खळदकर, नानासाहेब रंधवे, मुरीगेप्पा बासंगी, नाथा चव्हाण, रामकृष्ण वारे हे स्थापत्य उपअभियंता तर वैदयकीय विभागातून प्रभाकर भोसले, चंद्रकांत जगताप, डॉ. सुधाकर भोसले हे वैदयकीय अधिकारी व फार्मासिस्ट सेवानिवृत्त होत आहेत. वर्ग तीन मधील ५१ तर वर्ग चार मधील ७४ कर्मचारी ३१ मे २०२१ अखेर सेवानिवृत्त होत आहेत.