Monday, August 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

काय बाई सांगु, कस्स गं सांगू? कोंढवा कोरेगावात हुक्का भरलाया, मसाजचा साज चढलाया, काय बाई सांगु..

पुणे/दि/ प्रतिनिधी/
माझ्या डोळ्यात कचरा गेल्ला, कुणी येवोनी फुंकर्र घाला अशी आजच्या पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षकांची अवस्था झाली आहे. लॉकडाऊन नंतर तर सगळी कडे बेकायदा आणि अवैध धंद्यांचा पुर आला आहे. अधिकृत व्यवसाय कोणते आणि अवैध धंदे- व्यवसाय कोणते असा प्रश्‍न पडावा इतकं अंतर दोन्ही व्यवसायामध्ये आले आहे. कोंढवा-मुंढवा, कोरेगावपार्क-विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत तर कहर झाला आहे. हुक्का पार्लरवर युवकांचे तांडेच्या तांडेनशेसाठी धडकत आहेत, तर मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला महिलांचा अपव्यापार सुसाट वेगाने सुरू आहे. रशियन, उब्जेकेस्तान, कजाकिस्तान, क्युबा सारख्या राष्ट्रातील तसेच इशान्य भारताच्या बाजूकडील इतर राष्ट्रातील लहान मुली, बालके, युवती आणि ललनांचा मोठा बाजार सध्या विमानतळ, कोरेगावपार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अपव्यपाराने व्यापला गेला आहे. त्यामुळे कारवाई करण्यात पोलीसांचे हात बांधले गेले असतील तर निदान दुष्कृत्यांवर थोडंतरी नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.


पुण्यातील मागील दहा दिवसापूर्वी कोंढवा येथील बेकायदा हुक्का पार्लरवर धाड टाकुन पोलीसांनी कारवाई केली. पोलीस आयुक्त कार्यालयातील समाजिक सुरक्षा विभागाकडे महिलांचा अपव्यापारासह अवैध धंदेवाल्यांविरूद्ध कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तथापी दर महिन्या दोन महिन्यांतून निव्वळ तोंडदेखले पणाने कारवाई केली जात असून, पोलीस स्टेशनच्या नाकासमोर सुरू असलेले धंदयावरदेखील कारवाई होत नसल्याचे विदारक चित्र सध्या वरील पोलीस स्टेशन हद्दीतील अपव्यापारावरून दिसून येत आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील नोंदीनुसार, ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत, त्यांची जुनी आहे. तथापी आता जुन्यासह नवीन धंदे सुरू झाल आहे. एका पोलीस स्टेशन हद्दीत अपव्यापाराचे ५० अड्डे होते आता त्याच ठिकाणी दुप्पट- तिप्पट म्हणजे ५० चे १५० धंदे झाले आहेत. तरी देखील कारवाई होत नाही याचा अर्थ समजुन घेण्यात पुणेकर मंडळी इतकीही मुंबईकर झाली नाहीयेत.
मसाज पार्लरमध्ये देशी विदेशी महिलांची तस्करी –
पुण्यामध्ये बहुतांश सगळ्याच पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर नामक नवीन वेश्यालये सुरू आहेत. पूर्वी जेवढी संख्या होती आता त्याच्यापेक्षा मोठी संख्या दुपटीने वाढली आहे. पुणे शहरातील ज्या पोलीस स्टेशन हद्दीत मोठ मोठे कॉलसेंटर, मॉल्स आहेत, त्या पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे खुलआम मसाज पार्लर आणि स्पा च्या नावाखाली महिलांचा अपव्यापार सुरू आहे. याच मसाज पार्लरसाठी रॉ मटेरिअल मधुन देशी आणि विदेशी महिलांची तस्करी वेगात सुरू आहे.
रशियन, उब्जेकेस्तान, कजाकिस्तान, क्युबा तसेच ईनान्य भारताकडील छोट्या छोट्या राष्ट्रातील लहान मुली, बालके, युवती आणि ललनांचा मोठ्ठा बाजार भरला जात आहे. अरब राष्ट्रात पूर्वी ज्या प्रकारे महिलांची विक्री केली जात होती, अगदी त्याच्यापेक्षा अधिक पटीने आज कोंढवा, मुंढवा, कोरेगावा पार्क, विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत सुरू आहेत.


चारामुळे ४०० जणांची बदनामी –
आज प्रत्येक पोलीस स्टेशन मधील चार/आठ पोलीसांच्या असुरी कृत्यांमुळे पोलीस स्टेशनमधील कर्तव्यावर असलेले ४०० पोलीस बदनाम होत आहेत. सगळे पोलीस सारखेच असतात असा पुणेकरांचा आता समज झाला आहे. त्यामुळे पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील बदलत चालला आहे. पोलीस स्टेशन कारवाई करीत नसेल तर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने गुन्हे शाखेचे वेगवेगळे सेल निर्माण केले आहेत. गुन्हे युनिट १ ते ५ तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळी यंत्रणा निर्माण केली आहे. परंतु या सगळ्या यंत्रणा हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्यासारखे का गप्प बसले आहेत, कुणास ठाऊक…. (क्रमशः)