Friday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपा महायुती, काँग्रेस महाविकास आघाडीतील रूसवे फुगवे..बदनामी मात्र वंचितची

लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपा महायुती, काँग्रेस महाविकास आघाडीतील रूसवे फुगवे..बदनामी मात्र वंचितची

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/भाजप प्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरूच आहे. महाविकास आघाडीतही तणाव आहे. मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला असल्याची बातमी लोकमतच्या पहिल्या पानावर यदु जोशी यांच्या नावाने बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीमध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये तणाव आहे, खटके उडत आहेत. तसेच भाजप प्रणित महायुतीमध्ये देखील तणाव असल्याचे नमूद केलं आहे. दरम्यान या दोन प्रस्थापितांच्या महायुती व महाआघाडीच्या सत्तास्पर्धेच्या वादात बदनामी मात्र वंचित बहुजन आघाडीची केली जात आहे. काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रथम काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या बैठका म्हणजे सत्यनारायणाची पूजा नाही असं खोचक विधान...
प्रकाश पवार व राजेश फटाले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयात एक गाव अन्‌‍ महाचोरांच्या बारा भानगडी…?

प्रकाश पवार व राजेश फटाले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयात एक गाव अन्‌‍ महाचोरांच्या बारा भानगडी…?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सध्या नगरसेवकाविना पुणे महापालिका आणि क्षेत्रिय कार्यालये भकास झाली आहेत. पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नगरसेवकांचा दबाव नाही, नगरसेवक नाहीत त्यामुळे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्ते नाहीत तर नागरीकही पुढे येत नाहीत. त्यातच गैरकृत्यांचा जाब विचारणारी पुणे महापालिका मुख्य सभा अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत भ्रष्टाचार आणि गैरव्यवरांने कळस गाठले आहे. पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयात देखील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, निविदा कामांच्या माध्यमातून विकास कामांचे ढोंग करून पुणे महापालिकेच्या हातावर तुरी देण्यात आलेल्या आहेत. तत्कालिन सहायक महापालिका आयुक्त श्री. प्रकाश पवार आणि उपअभियंता श्री. राजेश फटाले यांनी हा गैरव्यवहार दडपुन टाकण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कनिष्ठ अभियंता शशिकांत निवदे...
पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली म्हणजे दुसरी मनुस्मृती, भेदभाव करणारी व मनमानी अटी व शर्ती मुळे बदनाम झालेली सेवाप्रवेश नियमावली रद्द करा…

पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली म्हणजे दुसरी मनुस्मृती, भेदभाव करणारी व मनमानी अटी व शर्ती मुळे बदनाम झालेली सेवाप्रवेश नियमावली रद्द करा…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मनुस्मृतीनुसार, ब्राह्मणांचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला, क्षत्रियांचा जन्म भुजातून, वैश्यांचा जन्म जांघेतून तर शुद्रांचा जन्म पायातून झाल्याचे सनातन वैदिक धर्मशास्त्रात नमूद आहे. तसेच श्रीमद्‌‍ भागवत महापुराण व स्कंध-7 वा, अध्याय 11 वा यामध्ये त्याच्या नोंदी आढळुन येतात. वर्षानुवर्ष ही वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था टिकुन होती. परंतु भारतीय संविधानाने ही वर्णव्यवस्था मोडून काढली आणि प्रत्येक नागरीकाला मुलभूत अधिकार बहाल केले. कुणीही श्रेष्ठ नाही व कुणीही कनिष्ठ नाही. सर्वांना समान अधिकार बहाल केले. परंतु पुणे महापालिकेतील सेवा प्रवेश नियमावली - 2014 चा अभ्यास केला असता, असे दिसून येते की, ही नियमावली नसुन मनुस्मृती असल्याचे दिसून येत आहे. वर्ग 1 ते 3 मधील पदांसाठी कुठेही समानता आढळुन येत नाही. प्रत्येकाचे शिक्षण, अनुभवाच्या अटी वेगवेगळ्या आहेत. काही ठ...
पुणे मनपा मधील बोगस इंजिअरच लचांड, पुणेकरांच्या माथी का मारताय… काय ते रस्ते, काय ते फुटपाथ, काय त्ये अनाधिकृत बांधकामे… ना मोजमाप, ना फुटपट्टी… करा आता ह्यांची हाकालपट्टी..

पुणे मनपा मधील बोगस इंजिअरच लचांड, पुणेकरांच्या माथी का मारताय… काय ते रस्ते, काय ते फुटपाथ, काय त्ये अनाधिकृत बांधकामे… ना मोजमाप, ना फुटपट्टी… करा आता ह्यांची हाकालपट्टी..

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील नरपतगिर चौक असो की, रामोशी गेट चौक असो, स्वारगेट चौक असो की पानमळा, लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी असो की, पौड रोड, कोथरूड… 2010 पूर्वीच्या पावसाळ्यात कधीही रस्ते किंवा पदपथ पाण्याखाली गेले नव्हते. परंतु पुणे महापालिकेत राजस्थान, आसाम, मणिपूर सह धाराशीव (उस्मानाबाद), बीड, लातुर सारख्या ठिकाणाहून ज्यांनी सिव्हील इंजिनिअरचे प्रमाणपत्र आणून पदोन्नती मिळविली, त्यांच्या हातातच पुणे शहराचा कारभार देण्यात आला. ह्याच तथाकथित बोगस इंजिनिअरमुळे पावसाळ्यात पुणे शहर बुडून गेले आहे. बोगस इंजिअरांनी ठेकेदार कल्याण विभाग सुरू केल्यामुळे पुणे शहराची वाट लागली आहे. त्यातच पुणे शहरातील संपूर्ण पेठा आणि उपनगरात मोठ मोठे अनाधिकृत बांधकामे झाली आहेत. अनाधिकृत बांधकामांना नोटीसा दयायचा आणि मागच्या दाराने जावून बांधकाम पूर्ण होईपर्यंत एवढच नव्हे तर लोक राहण्यास येण्यापर...
पुणे महापालिका बोगस अभियंते व बोगस अधिकाऱ्यांच्या ताब्यात, गोलमाल है भाय, सब गोलमाल है…

पुणे महापालिका बोगस अभियंते व बोगस अधिकाऱ्यांच्या ताब्यात, गोलमाल है भाय, सब गोलमाल है…

सर्व साधारण
मुम्बई हिन्दी विद्यापीठ आणि बॉम्बे टेक्निकल बोर्डाकडून किती सेवकांनी डिग्री आणली आहे….देशातील व्यावसायिक अभ्यासक्रम वर्गात बसून पूर्ण वेळेचे असतांना महाभागांनी डिग्य्रा आणल्या कशा… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. येथे विद्वानांची कमतरता नाही, बुद्धीवाद्यांची कमतरता नाही, मेरिट पुण्यातच आहे. देश व जगभरातील लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात, मेरिटवर पास होतात. युपीएससी व एमपीएसी करणारे पुण्यातच शिक्षणासाठी येतात, एवढे मेरिट पुण्याकडे आहे. परंतु ह्याच पुणे शहराच्या पुणे महापालिकेतील सेवक नोकरी करता करता, शिक्षणासाठी राजस्थान, आसाम, मणिपूर, तसेच राज्यातील उस्मानाबाद, लातुर, बीड सारख्या ठिकाणी शिक्षण घेतल्याचे दाखवुन आज वर्ग 1 या पदावर येऊन बसले आहेत. तसेच काही सेवकांनी तर मुम्बई हिन्दी विद्यापीठ आणि बॉम्बे टेक्निकल बोर्ड यांच्याकडून सर्टिफिके...
10 वीत दोन/दोन वेळा नापास झालेले व पुणे महापालिकेत गवंडी, बिगारी, शिपाई, आरेखक पदावरील सेवक आता कनिष्ठ अभियंता म्हणून पदाचा वापर करीत आहेत….आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांनी पुणे महापालिका विकायला काढली आहे काय…

10 वीत दोन/दोन वेळा नापास झालेले व पुणे महापालिकेत गवंडी, बिगारी, शिपाई, आरेखक पदावरील सेवक आता कनिष्ठ अभियंता म्हणून पदाचा वापर करीत आहेत….आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांनी पुणे महापालिका विकायला काढली आहे काय…

सर्व साधारण
बोगस डिग्री आहे हे माहिती असतांना देखील नियुक्ती व पदोन्नती कशाच्या आधारे दिली जात आहे,2015 मध्ये पदोन्नती दिलेले कोण आहेत हे अभियंते….कारवाई करू नये म्हणून प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याचा आपने आरोप केला आहे, कुठून आणल्या डिग्र्या… पूर्वीचे त्यांचे पद काय होते सर्व सविस्तर माहिती पहा आजच्या अंकात… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी, पुणे महापालिकेतील बदल्यांचे दर 10 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये दिल्याशिवाय नियुक्ती व पदोन्नती दिली जात नसल्याचा तक्रार अर्ज नगरविकास मंत्रालयास दिला होता. आता देखील आम आदमी पक्षाने बोगस अभियंत्यांनी, कारवाई करू नये म्हणून सुमारे 10 लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे पैसे जातात तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता पुणे महापालिकेत समाविष्ठ केलेल्या गावातील कर्मचाऱ्यांना थेट वरिष्ठ लिपि...
बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

सर्व साधारण
एका बांधकाम लेआऊटला मान्यता घेवून , प्रत्यक्षात जागेवर दुसऱ्याच प्रकारचे बांधकाम करणाऱ्या व पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या, बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करा…इंजिनिअगरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, पुणे महापालिकेतही कामाला हजर व राजस्थान, मणिपूर, आसाम राज्यातील शिक्षण संस्थेतही हजर कसे….बोगस डिग्रीधारकांच्यात ताब्यात पुणे महापालिका…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका सेवा प्रवेश नियमानुसार महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांमधुन कनिष्ठ अभियंता पदाची शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांना 25 टक्के पदोन्नती अंतर्गत 2015, 2018 व 2020 रोजी पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान इंजिनिअरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असतांना, संबधित कर्मचारी हे पुणे महापालिकेतही हजर होते आणि संबंधित शिक्षण संस्थेतही हजर होते. काही सेवकांनी तर दुरस्थ शिक्षण पद्धतीने इंजिनिअर...
ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

सर्व साधारण
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले...
पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या...
पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

पुणे महापालिकेतील शिवाजी दौंडकर, राकेश विटकर व साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या अन्टी करप्शन विरूद्ध न्यायालयात जाणार – सुनिल टोके

सर्व साधारण
मुंबई पोलीस दलातील सुनिल टोके हे आहेत तरी कोण….पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाया होणार काय… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील तत्कालिन मुख्य कामगार अधिकारी व नगरसचिव श्री.शिवाजी दौंडकर यांनी तत्कालीन शिक्षण प्रमुख, शिक्षण मंडळ प्रमुख पदासह पुणे महानगरपालिकेतील विविध ठिकाणी सेवेत रुजू झाल्या पासून सेवानिवृत्त होई पर्यंत अनेक भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना हाताशी धरून अनेक मोठे भ्रष्टाचार केलेले आहेत. अनेक बेकायदेशीर, मनमानी कारभार, गुन्हेगारी स्वरूपाच्या कामाचे उदात्तीकरण करून, अनेक भ्रष्टाचार करून स्वतःची व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आर्थिक विकास करण्याची कोणतीही बेकायदेशीर संधी सेवानिवृत्ती होईपर्यंत सोडलेली नाही. ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांनी देखील कारवाई करण्यात कसुरी केल्याने या सर्वांविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मुंबई पोली...