Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

अमरावतीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने बळबळ उभा केलेला बळवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या निवडणूकीत पाडणाऱ्या काँग्रेसचा बदला घेण्याची अमरावतीकरांना सुवर्ण संधी…

अमरावतीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने बळबळ उभा केलेला बळवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडाऱ्याच्या निवडणूकीत पाडणाऱ्या काँग्रेसचा बदला घेण्याची अमरावतीकरांना सुवर्ण संधी…

राजकीय
NATIONAL FORUM/ PUNE/ काँग्रेसने 25 वर्षात अमरावती लोकसभेची निवडणूक लढविली नाही. रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये राखीवज जागेवर उमेदवार असल्याने काँग्रेस-भाजपाने ठरवुन काँग्रेसी आमदार बळवंत वानखेडे यांना उभे केले आहे. अमरावतीतत सर्वांना ठाऊक आहे की, बळवंत वानखेडे हे मंत्री यशोमती ठाकुर यांच्या चपला उचलतात, एवढच नाही तर यशोमती ठाकुर यांना विचारल्याशिवाय तोंडही उघडत नाहीत. त्यामुळेच अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडली तरी वानखेडे तिकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे काँग्रेस-भाजपा यांनी गुप्त समझोता केला असून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना लोकसभा निवडणूकीत पाडण्यासाठीच 48 पैकी 1 जागेवर बौद्ध उमेदवार उभा केला आहे. काँग्रेस आघाडीने 48 पैकी एकही जागेवर मुस्लिम उमेदवार दिला नाही. एकही बौद्ध उमेदवार दिला नाही. केवळ आनंदराज आंबेडकर...
प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

प्रस्थापित घराणेशाहीवाल्यांना सत्ता आपल्याकडेच रहावी असे का वाटते…? काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीची वृत्ती,

राजकीय, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. देशात 10 वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाची उणीदुणी काढण्यापेक्षा, हे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडी विरूद्ध गरळ ओकत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही. त्यांची देशात व राज्यात कुठेही सत्ता नव्हती, तरी देखील वंचित बहुजन आघाडीविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे चार पक्ष का तुटून पडले आहेत याचा विचार होणे गरजेचे ठरत आहेत. महायुती व महाविकास आघाडीने राज्यात एकाही मुस्लिम समाजातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. आंबेडकरी समुहातील नेतृत्वाला उमेदवारी दिली नाही. भटके, विमुक्त, आलुतेदार- बलुतेदारांना उमेदवारी दिली नाही. या समाजाने केवळ महायुती व महाविकास आघाडीला मतदान करायचे, परंतु सत्तेत वाटा मागायचा नाही असेच धोरण आजपर्...
शिवसेना-मनसेमधुन आलेल्या उपऱ्या उमेदवारावर पुणे शहर काँग्रेसची मदार, काँग्रेसचे निष्ठावंत मेले होते काय, उपऱ्याला उमेदवारी दिली….?

शिवसेना-मनसेमधुन आलेल्या उपऱ्या उमेदवारावर पुणे शहर काँग्रेसची मदार, काँग्रेसचे निष्ठावंत मेले होते काय, उपऱ्याला उमेदवारी दिली….?

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देशात सत्ता उपभोगलेल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या स्थानिक निष्ठावंताची अवस्था शहरात उंडरणाऱ्या भटक्या पाळीव प्राण्यासारखी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) मुळचे निष्ठावंत, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणूकीत आज उमेदवारी मिळेल, उद्या मिळेल म्हणून पक्षाचे काम निष्ठेने करतात. परंतु मागील 20 वर्षात त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सध्या देशात 2024 च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. पुणे शहरात देखील काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना व मनसे या पक्षातून काँग्रेस मध्ये आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे शहर काँग्रेसमध्ये कमालिची अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाने मात्र मोहोळांना उमेदवारी दिल्...
वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद

वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तृतीयपंथी समाज, जोगती, आराधी या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुषित आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या संधी मिळत नाहीत. शासनस्तरावरून देखील कोणत्याही तरतुदी केल्या जात नाहीत. तत्कालिन काँग्रेस राजवटीत तर ट्रान्सजेंड अर्थात तृतीयपंथीयांना दिल्लीत जबरी मारहाणीच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. आज भाजप देखील काँग्रेसचाच कित्ता गिरवित आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी मात्र कायम तृतीयपंथी, जोगती, आराधी या समाज घटनांना, मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत होता. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या कार्यकाळात त्यांनी किमान समान कार्यक्रम तयार करून महाविकास आघाडीकडे पाठविला आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने तयार केलेल्या 39 कलमी किमान समान कार्यक्रमात मुद्दा क्र. 31 वर तृतीयपंथी समाज घटकांना, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरतुद केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जाही...
वंचितच्या मसुदयावर 12 दिवस उलटले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) गप्प का…

वंचितच्या मसुदयावर 12 दिवस उलटले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) गप्प का…

राजकीय
प्रस्थापित पक्षांना वंचित समाजाची मते हवीत… मग त्यांचा सत्तेत सहभाग नको का…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/कायम सत्तेत राहिलेल्या पक्षांना, विरोधी पक्षात बसल्यानंतर, सत्तेत कधी पोहोचेल असे वाटू लागते. काँग्रस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेला चिटकलेले मुंगळे आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते करायला पुढे मागे पाहत नाहीत. हेच या दोन्ही पक्षांबाबत बोलले जाते. परंतु देशातचे संविधान वाचवायचे आहे, त्यासाठी वंचितने मागील दोन ते अडीज वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एका विचारपीठावर आणून, 39 कलमी समान कार्यक्रमावर बांधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु प्रस्थापित राजकीय पक्ष त्या 39 कलमी मुद्यांबाबत काहीच बोलत नाहीत. आज 12 दिवस उलटून गेले तरी काही बोलत नाहीत. देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण...
दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि काँग्रेस हटावची चळवळ सुरू झाली. इंदिरा हटाव मोहिम सुरू झाली. पुढे कालांतराने आता भाजपाने देखील काँग्रेसचाच भांडवलदार धार्जिणा कार्यक्रम पुढे रेटल्याने, देशात मोदी हटाव, भाजपा हटाव म्हणून विरोधी पक्ष एक होत आहेत. कुणाला तरी विरोध म्हणून किंवा सत्तेसाठी विरोधी पक्ष एकवटत असला तरी यातून जनतेचे कोणतेही हीत होत नाही. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमावर आधारित सर्व राजकीय पक्षांनी एक होवून देशातील निवडणूकांना सामोरे जावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने मागील दोन ते अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व जिल्ह्यात 8 ते 10 लाखांच्या सभा पार पडत आहेत. दरम्यान वंचित व शिवसेना...
1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशात मोदी हटाव, लोकशाही वाचवा म्हणून सर्व विरोधी पक्ष टाहो फोडत आहेत. लहान मोठ्या प्रसार माध्यमांतुन देखील मोदी हटाव ची घोषणा होत आहे. परंतु देशात हे पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वी देखील इंदिरा गांधीच्या आणीबाणीनंतर, देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी देखील इंदिरा हटाव, लोकशाही बचाव म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सर्व विरोधी पक्ष एक झाले होते. परंतु किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे जनता पार्टीचे विघटन झाले. चौधरी चरणसिंग देशाचे काही काळ पंतप्रधान राहिले. परंतु पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. पुढे राजीव गांधी व काँग्रेस विरूद्ध देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर, पुन्हा देशात विरोधी पक्ष एक झाले व त्यांनी र...
माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

राजकीय
नॅशनल फोरम/सोलापुर (माळशिरस)/ दि/ प्रतिनिधी/माढा लोकसभा मतदारसंघात कायमस्वरूपी घराणेशाहीचे राज्य आहे. प्रस्थापित शक्तींच्या हातात कायमस्वरूपी सत्ता असल्याने त्यांना जनतेचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. त्यामुळे माढ्यातून कायमस्वरूपी घराणेशाही संपवुन आता लोकशाहीतील मूल्यांनुसार, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी साझेदारी ह्या सुत्रानुसार माढ्यात आता ओबीसी नेतृत्वाला संधी देण्याच्या मागणीने जोर धरत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु स्थानिक कार्यकर्ते व नागरीकांचा देखील मोठा असंतोष पहायला मिळत असून, माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी बांधवानी यावेळी, माढ्यातून जर ओबीसी उमेदवार मिळाला तरच मतदान करणार अन्यथा मतदान करणार नसल्याचीही भूमिका जाहीर केली आहे. यावेळी प्रस्थापित राजकीय पक्ष पारंपारीक घराणेश...
बाळासाहेब आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

बाळासाहेब आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर जाणार नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप-आरएसएसने आपल्या निवडणूक फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावणी दिली होती की, “जर पक्षांनी देशापेक्षा महत्वाचा पंथ ठेवला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल.” माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. “देशा पेक्षा जास्त पंथा ला महत्वाचं मानणाऱ्या ” भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्री माई, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी पत्रावर सही केली. ...
राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राहूल गांधीच्या भारत जोडोचे बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण, पण इंडिया मविआचे नाही

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असल्याची माहिती प्रबुद्ध भारतने प्रसारित केली आहे. प्रबुद्ध भारतच्या वृत्तात नमूद केले आहे की, आमच्या सुत्रानुसार हे निमंत्रण फक्त ‘भारत जोडो न्याय यात्रे'साठी आहे, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेले नाही. वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीन वेळा काँग्रेस हायकमांडला पत्र लिहले होते. जर काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल असेही त्या वृत्तात नमूद केले आहे. ...