Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

पुणे महापालिकेत अतिरिक्त व प्रभारी पदावर कार्यरत असणारे, नितीन केंजळे व राकेश विटकर यांना पोलीस अधिकाऱ्यांसारखी वर्दी व ओळखचिन्ह वापरण्याचा अधिकार आहे काय?

पुणे महापालिकेत अतिरिक्त व प्रभारी पदावर कार्यरत असणारे, नितीन केंजळे व राकेश विटकर यांना पोलीस अधिकाऱ्यांसारखी वर्दी व ओळखचिन्ह वापरण्याचा अधिकार आहे काय?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत ज्या खात्यातून पैसे मिळतील, त्या खात्यातील सेवकांच्या पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये बदल करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जात आहेत. ज्या खात्यातुन टेंडर सिस्टिम कार्यरत आहे, त्याच खात्यात केवळ जवळच्या सेवकांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या जात आहेत. पैसे देणाऱ्या सेवकांनाच अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभारावर नियुक्त्या दिल्या जात आहेत. असा सर्व प्रकार आज पुणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटी सुरू असल्याची ओरड आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर उघडपणे किती पैसे घेतात याचे तक्रार अर्ज शासन दरबारी पाठविले आहेत. तसेच ज्या सेवकांना अतिरिक्त व प्रभारी पदभार दिला आहे, आज तेच सेवक कोणताही अधिकार नसतांना, तसेच भारतीय दंड विधान संहितेतील कलम 171 चा भंग करीत असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिन...
पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदातही आर्थिक भ्रष्टाचार करून मनमानी बदल, पुणे महापालिकेतील आरआरचा घोटाळा, हर्षद मेहता व तेलगी घोटाळ्यापेक्षा कमी नाही

पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदातही आर्थिक भ्रष्टाचार करून मनमानी बदल, पुणे महापालिकेतील आरआरचा घोटाळा, हर्षद मेहता व तेलगी घोटाळ्यापेक्षा कमी नाही

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहाराव यांच्या 1991-92 या आर्थिक वर्षात सुधारणांना सुरूवात झाली होती. गॅट व डंकेल करारावर स्वाक्षऱ्या करून संपूर्ण जगाला भारताचे दरवाजे खुले करण्यात आले. याच 1980-90 काळात हर्षद मेहताने सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केला, जो आजच्या काळात 50 हजार कोटी पेक्षा अधिक आहे. तर अब्दुल करीम तेलगी याने देखील 1992 मध्ये स्टॅम्प पेपर घोटाळा केला, जो 2003 मध्ये उघड झाला. त्याने 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला, आजच्या काळात त्याचे 150 हजार कोटी रुपये मूल्य होते. अशाच प्रकारचा महाघोटाळा पुणे महापालिकेत झाला आहे. 2014 मध्ये पुणे महापालिकेचा आकृतीबंध अर्थात सेवा प्रवेश नियम शासनाकडून मंजुर करून घेण्यात आला. सेवकांच्या भर्ती, पदोन्नतीमध्ये मनमानी अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. आता 9 वर्षानंतर पुन्हा त्यात बदल करून पुन्हा मनमानी...
पुणे महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी पदातही भ्रष्टाचार?

पुणे महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी पदातही भ्रष्टाचार?

सर्व साधारण
नितीन केंजळे व राकेश विटकर यांच्या खाबुगिरीला कुठेतरी लगाम घालण्याची 10 हजार कंत्राटी कामगारांची मागणीनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचा आकृतीबंध हा भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना निमंत्रण देणारा आहे. सेवा प्रवेश नियमावलीमध्ये अनुभव, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्तींमध्ये कमालीचा भेदभाव करण्यात आला आहे. पदोन्नतीमध्ये देखील नियमबाह्य तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात जो पैसे घेवून येईल त्याला पदभार देण्यासाठीच ह्या तरतुदी केल्या आहेत. केवळ शासन आणि मंजुर आकृतीबंधावर खापर फोडण्यापेक्षा त्यातील त्रुटी काढुन आकृतीबंध परिपूर्ण करणे आवश्यक ठरत आहे. तथापी जाणिवपूर्वक त्यात त्रुटी ठेवून, चुकीच्या आकृतीबंधाची गैरमार्गाने अंमलबजावणी सुरू आहे. सुरक्षा अधिकारी हे पद देखील भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले आहे. यापर्वी देखील आम्ही कामगार विभाग, विधी विभागातील आकृतीबंधातील तरतुदींमध्ये कशी व...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

सर्व साधारण
एक पोलीस स्टेशन 2 पोलीस चौक्या, एक एस.टी.स्टँड अन्‌‍ खंडीभर मटक्याचे अड्डे -जोडीला ठेवले 3 जुगाराचे क्लबनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुण्या एका इसमाने बादशहा औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने, छत्रपती संभाजी नगर (जुने औरंगाबाद) जिल्ह्यात दंगल पेटली, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्यात अहमदनगरसह कोल्हापुरात देखील दंगली पेटल्या. पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. तेंव्हा कुठे दंगली शांत झाल्या. परंतु पोलीसांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध कुठेही कारवाई केली नाही. आज पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवून लाईन बॉयच्या नावाने जुगाराचा क्लब मागील एकदीड महिन्यांपासून सुरू आहे. तरी देखील पुणे पोलीस कारवाई करीत नाह...
कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. कैलास वाळेकर हे पुणे महापालिकेच्या सेवेत 2011 साली नेमणूक झाली. परंतु ते रुजु झाले नाहीत. त्यांच्या 16/12/2011 च्या आज्ञापत्रकात अट क्र. 8 मध्ये नमूद आहे की, संबंधित उमेदवार हे आज्ञापत्रकाच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत कामावर हजर न झाल्यास त्यांची नेमणूक रद्द समजण्यात येईल असे नमूद केले आहे. तरी देखील श्री. वाळेकर हे रुजु झाले नाहीत. आज्ञापत्रकाच्या चार वर्षानंतर त्यांना पुणे महापालिकेत रुजु करून घेण्यात आले. तथापी वाळेकर यांनी पुणे महापालिका नियमभंग केलेला असतांना देखील तसेच प्रोव्हिबिशन परियड पूर्ण केलेला नसतांना देखील त्यांची सेवा विलोपित करून सेवेत कायम करून घेवून त्यांना थेट टॅक्स विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तत्कालिन अति. आयुक्त श्री. राजेंद्र जगताप व उपआयुक्त सामान्य प...
पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
अनु. जाती आदिवासी समाजातील अधिकाऱ्याला जातीव्देषातून पदोन्नतीपासून रोखणाऱ्या….आयुक्त-प्रशासक विक्रम कुमार, अति. आयुक्त रविंद्र बिनवडे, उपआयुक्त सचिन इथापे, सहआयुक्त उल्का कळसकर, मुख्य लेखापरीक्षक अंबरिष गालिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा, आर.आर.मध्ये मनमानी बदल, ठराविक सेवकांना डोळ्यासमोर ठेवून आकृतीबंधाची रचना, मुळात आकृतीबंधच सदोष असतांना, पुनः त्यात दोष वाढविण्याचा गुन्हा का केला जात आहे…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सेवकवर्ग विभागाकडून अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत आरोप केले आहेत. नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या दि. 6 एप्रिल 2023 च्या पत्रात त्यांनी पुणे महापालिकेतील प्रत्येक बदली व पदोन्नती प्रकरणांत पदनिहाय लाखोंची बोली लावली जात असून, 10 लाख, 20 लाख व 30 लाख रुपये घेतल्याशिवाय...
दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील नगरसेवक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार काम करू देत नाहीत, सतत दबाव सहन करावा लागतो म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सतत ओरड होत होती. मागील दोन अडीज वर्षात पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदयातील तरतुदीनुसार काम करण्यासाठी त्यांचे कुणी हात धरले आहेत काय, ते आता नियमानुसार काम का करीत नाहीत. त्या उलट पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून बाहेरून अर्थात सरळसेवेने नोकर भरतीचा धडाका सुरू आहे. परंतु 15/20 वर्ष कार्यरत सेवकांना पदोन्नती देत नाहीत, पदोन्नतीची साखळी खिळखिळी केली आहे. त्यामुळे पुढील किमान 10 वर्ष याचा फटका पुणे महापालिकेतील सेवकांना बसणार आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीसाठी संवर्गनिहाय 10 लाख, 20 लाख व काही प्रकरणांत...
हर्षद मेहता शेअर्स घोटाळा, तेलगी स्टॅम्प घोटाळ्या पेक्षाही पुणे महापालिकेत आरआरचा महा स्कॅम

हर्षद मेहता शेअर्स घोटाळा, तेलगी स्टॅम्प घोटाळ्या पेक्षाही पुणे महापालिकेत आरआरचा महा स्कॅम

सर्व साधारण
पुणे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची साखळी विस्कळीत केल्याचा बहुमान हा विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांनाच जातो- पुढील 10 वर्षातील प्रशासकीय कामकाज साखळी विस्कटविलीप्रशासकीय राजवटीतील बदली-पदोन्नतीच्या विस्कटलेल्या घडीमुळेपुणे महापालिकेतील वर्ग 1 ते 4 कर्मचाऱ्यांना पुढील 10 वर्षात परिणाम भोगावे लागणार…. नॅशनल फोरम/ पुणे /दि/ प्रतिनिधी/प्रशासकीय सेवेमध्ये शिपाई- जमादार- हवालदार- लिपिक टंकलेखक - वरीष्ठ लिपिक - सहाय्यक अधीक्षक - उप अधीक्षक- अधीक्षक- प्रशासन अधिकारी - सहायक आयुक्त- उपआयुक्त- व शेवटी अतिरिक्त आयुक्त या पदांची एक साखळी आहे. त्यानंतर अभियांत्रिकी व तांत्रिक सेवांमध्ये कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता व पुढे शहर अभियंता अशी ही साखळी आहे. तसेच वैदयकीय सेवा, निमवैदकीय सेवा, अग्निशमन सेवा यामध्ये पदोन्नतीची साखळी ...
पुणे महापालिकेच्या आरआरचा प्रशासकीय राजवटीत खुला बाजार, बदली, पदोन्नती, अतिरिक्त पदभार, प्रभारी पदभारासाठी पात्रता नसली तरी, पैसे घेवून या आणि ऑर्डर घेवून जा… आरआरचा धंदा मांडलाय काय…

पुणे महापालिकेच्या आरआरचा प्रशासकीय राजवटीत खुला बाजार, बदली, पदोन्नती, अतिरिक्त पदभार, प्रभारी पदभारासाठी पात्रता नसली तरी, पैसे घेवून या आणि ऑर्डर घेवून जा… आरआरचा धंदा मांडलाय काय…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील नागरीकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, रस्त्यांवरील दिवे यासह वाहतुक नियोजन, अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमण रोखणे, व्यापारी संकुल, पथारी व्यावसायिक या सारख्या मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व भारतीय संविधानातील नागरी हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील महानगरपालिकेची आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती करणे, भरतीसाठी त्याचे नियमन करणे ही देखील महत्वाची बाब आहे. उच्च शैक्षणिक गुणवत्ता, कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांची निवड करून पुणेकरांचे नागरी जीवन सुकर बनविणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठीच पुणे महानगरपालिकेसाठी राज्य शासनाने, पुणे महापालिकेमध्ये अंमलात असलेले सर्व सेवा प्रवेश नियम तसेच यापूर्वी करण्यात आलेले ठराव...
पुणे महापालिकेत पैसा जिंकत आहे, मनपा कर्मचारी हारत आहेत… पुणे महापालिकेतील ॲडव्होकेट पॅनेल, सहा. विधी अधिकारी पदांच्या भरतीतही आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचा हस्तक्षेप, आयुक्तांजवळच्या उमेदवारांचा अधिक भरणा केल्याचा होत आहे आरोप

पुणे महापालिकेत पैसा जिंकत आहे, मनपा कर्मचारी हारत आहेत… पुणे महापालिकेतील ॲडव्होकेट पॅनेल, सहा. विधी अधिकारी पदांच्या भरतीतही आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांचा हस्तक्षेप, आयुक्तांजवळच्या उमेदवारांचा अधिक भरणा केल्याचा होत आहे आरोप

सर्व साधारण
अभियंता भरतीमध्ये बोगस दाखले देणाऱ्यांवर अद्याप पर्यंत फौजदारी कारवाई का झाला नाही… की पैसा बोलता है…नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून नोकर भरती वेगात सुरू आहे. नोकर भरती आणि पदोन्नतीच्या बहुतांश प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांच्याकडून स्वतःहून निर्णय घेतले जात आहेत, काही प्रकरणे मुद्दामपणे शासनाच्या अभिप्रायार्थ पाठवुन 15/20 वर्ष कार्यरत सेवकांना मात्र पदोन्नती दिली जात नाहीये. महापालिकेच्या बहुतांश, सहायक मनपा आयुक्त पदावर केवळ प्रतिनियुक्तीने आलेल्या शासकीय सेवकांना संधी देण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीमधुन आलेल्या नवख्या सेवकांना देखील सहायक महापालिका आयुक्त पदावर नियुक्त केले जात आहे. थोडक्यात पुणे महापालिकेतील संपूर्ण 80 खात्यांतील वर्ग 1 ते 4 मधील कर्मचारी त्रस्त झालेले आहेत, हैराण झालेले आहेत. आज पुणे महापालिकेत पैसा...