Friday, April 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

पुणे महापालिकेत भ्रष्ट उप कामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे कटकारस्थान

पुणे महापालिकेत भ्रष्ट उप कामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे कटकारस्थान

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील सुमारे 10 हजार कंत्राटी कामगारांना शासन नियमानुसार किमान वेतन न देणे, खाजगी सुरक्षा रक्षक आणि झाडण काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सुरक्षा प्रावरणे न देणे, ईपीएफ व ईएसआय ठेकेदाराने भरलेला नसताना देखील संबंधित ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले धडाधड मंजूर करणे या सर्व गंभीर प्रश्नाच्या न्याय हक्कासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुणे महानगरपालिकेतील कामगार संघटनांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी तीव्र धरणे आंदोलन केलेली आहेत. आज त्याच भ्रष्ट प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांना मागील दाराने पदोन्नती देण्याची कारस्थाने सुरू असल्याचे ऐकिवात येत आहेत. मुख्य कामगार अधिकारी असलेले शिवाजी दौंडकर आता सेवानिवृत्त झाले आहेत. तथापि त्यांच्या कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेल्या दहा हजार कंत्रा...
पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही

पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही

शासन यंत्रणा
आयुक्त, अति. आयुक्त कारवाई करण्यापासून त्यांना संरक्षण कशासाठी …पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील10 हजार कंत्राटी कामगार व खाजगी सुरक्षा रक्षकांचे किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय, कंत्राटी कामगार यांना सुरक्षा प्रावरणे, साहित्य आदि सर्वांमध्ये महाघोटाळा केल्यामुळे मागील सहा वर्षात पुणे महापालिकेवर शेकडोंनी आंदोलने झाली. यामुळे संपूर्ण राज्यात पुणे महापालिकेची नाहक बदनामी झाली. अ वर्ग असलेल्या महापालिकेची मान शरमेने खाली गेली. त्यात मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांच्यासह 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी या आठ कर्मचाऱ्यांनी महापालिकेची नाहक बदनामी केली आहे. संविधान परिषदेसह अन्य संघटनांनी आंदोलन...
पुणे महापालिकेतील कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उदया 1 मे रोजी मोर्चा व सभा !

पुणे महापालिकेतील कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उदया 1 मे रोजी मोर्चा व सभा !

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतात 1 मे 1923 पासून जागतिक कामगार दिन साजरा करण्यात येतो, यंदाचा कामगार दिवस शतकपूर्ती साजरा करणार आहे. तरीदेखील नागरिकांच्या सेवेत 12 महीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्षे या प्रश्नांकारिता आपण वेळोवेळी आवाज उठवत आलेलो आहोत. मात्र आता या ढिम्म प्रशासनाच्या कारभारामुळे कामगार दिनीच कामगारांना त्यांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आपल्या सर्व कामगारांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यासमोर आपण 1 मे ,सोमवार रोजी आपल्या न्याय व हक्कांसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. 1 मे 2023 ला सकाळी 10 वाजता श्रमिक भवनपासून मोर्चाला सुरुवात करून आपण सगळे कामगार पुतळ्यापर्यंत जाणार आहोत. तरी सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कामगार युनियनने केले आहे. मोर्च्यातील प्रमुख मागण्या :1.कायम सफाई कर्...
कंत्राटी कामगारांसाठी शेकडो आंदोलनानंतर पुणे महापालिकेचा कामगार कल्याण विभाग जागा झाला, आठ वर्षानंतर ई पेहचानपत्राचे वाटप

कंत्राटी कामगारांसाठी शेकडो आंदोलनानंतर पुणे महापालिकेचा कामगार कल्याण विभाग जागा झाला, आठ वर्षानंतर ई पेहचानपत्राचे वाटप

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेसाठी 10 हजार कंत्राटी कामगार कष्ट उपसत आहेत. परंतु 2006 ते आज 2023 या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांना साधे ओळखपत्रही दिले गेले नाही. किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय ची सुविधा देखील दिली नाही. यामुळे पुणे महापालिकेवर विविध राजकीय पक्ष व संघटनांनी कित्येक महिने आंदोलने केली. आज आठ वर्षानंतर पुणे महापालिकेला जाग आली असून, त्यांनी कंत्राटी कामगारांना ई पेहेचान पत्राचे वाटप करण्यात आले आहे. पुणे महापालिकेत सुमारे 10 हजार कंत्राटी कामगार असतांना केवळ 37 जणांना या ओळखपत्राचे वाटप केले आहे. परंतु वाटपाचा मात्र मोठा गाजावाजा केला जात आहे. मुख्य कामगार अधिकाऱ्यांना 8 वर्षानंतर जाग -पुणे महापालिकेने 2006 ते 2023 या आठ वर्षाच्या कालावधीत कंत्राटी कामगारांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांना सुरक्षा उपकरणे प्रावरणे देखील देण्यात आली नाहीत. साधा युनिफॉर्म देखील दि...
सनातनी पिसाळले, राज्यात पुन्हा जातीयवादाचे थैमान

सनातनी पिसाळले, राज्यात पुन्हा जातीयवादाचे थैमान

शासन यंत्रणा
पुण्यात आंबेडकर जयंती मिरवणुक, कार्यकर्त्यांवर बंदुका उगारल्या…. लातूरमध्येही निळे झेंडे लावले म्हणून पोलिसांसह गावगुंडांची बेदम मारहाणनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/निवडणूक आलेले आमदार, खासदार भारतीय संविधानाची शपथ घेवून कायदयाप्रमाणे मी कामकाज करेन, कुणाचेही लांगुनचालुन करणार नाही अशी शपथ घेतात. परंतु राजकीय पक्षाच्या बॅनरखाली भाषणबाजी करीत असतांना, जाती आणि धर्माबद्दल समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करतात. त्यामुळे शपथेचा भंग केला म्हणून त्यांची आमदारकी व खासदारकी रद्द होणे कायदयाला अपेक्षित आहे. परंतु काँग्रेसच्या 70 वर्षाच्या राजवटीसह जनता पार्टी, भाजपाच्या 8 वर्षाच्या कालावधीत कुणीही कारवाई केली नाही. याचा अर्थ जाती व धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय आमदार, खासदार होता येत नाही किंवा सत्ताधारी देखील होता येत नाही असे काहीसे समिकरण राजकीय पक्षांनी तयार केल्यामुळेच र...
पुणे महापालिकेत बदली,पदोन्नतीचा दर 30 लाख रुपये, पुणे महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायतीच्याही खाली घसरला…

पुणे महापालिकेत बदली,पदोन्नतीचा दर 30 लाख रुपये, पुणे महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायतीच्याही खाली घसरला…

शासन यंत्रणा
pmcpune बदली घोटाळा रोखण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्षांचे नगरविकास मंत्र्यांकडे निवेदन नॅशनल फोरम /पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेत वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 20 लाख रुपये, वर्ग 2 व 3 साठी 10 लाख रुपये तर अपेक्षित विभागात बदली करून घ्यायची असेल तर 10 लाख रुपये असा बाजार पुणे महापालिकेत भरला असून, पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून महापालिकेचा कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायती पेक्षा खाली घसरलेला असल्याचे निवेदन काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नगरविकासमंत्र्याकडे पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान आधी काम केलेल्या मलईदार विभागात काम करायची तीव्र इच्छा असल्यास वर्ग कोणताही असला तरी बदलाचा भाव 30 लाख रुपये असल्याची चर्चा पुणे पुणे महापालिकेत आहे. भावाबद्दल कोणतीही घासाघिस करू नये. आम्हाला उत्पन्नाचा काही भाग वरिष्ठांना दयावा लागतो असे अधिका...
पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा<br>न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा
न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महापालिकेच्या विधी खात्यातील 5 हजार कोर्ट केसेस, 20 ते 25 हजार कोटींच्या मालमत्तेच्या वसुलीची प्रकरणे, (यात मोबाईल टॉवर 10 हजार कोटीची केस, पर्वती येथील 1 हजार कोटी रुपयांची केस, पुनावाला गार्डन या सारख्या अनेक कोर्ट केसेस), ॲडव्होकेट पॅनलची निवड, मनमानी वकीलांची निवड (ॲड.लिना कारंडे,ॲड. रोहन सराफ) काही विशिष्ठ वकीलांना 200/ 300 कोर्ट(उदा- ॲड. ज्ञानदेव चौधरी यांना 200/300 कोर्ट कसेसे) , काही वकीलांना 30/40 कोर्ट केसेस( काही ज्येष्ठ वकीलांकडून त्याही कोर्ट केसेस काढुन घेतल्या), बांधकाम, टॅक्स विभागातील कोर्ट प्रकरणे काही विशिष्ठ वकीलांना देणे(ॲड.ज्ञानदेव चौधरी,ॲड. संजय मुरकुटे), उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील वकीलांची निवड व त्यांच्या फी बाबत धोरण निश्चित न करणे, बदली अधिनियमाला हरताळ फासत 10 ते 15 वर्षांपासून विशिष्ठ कर्मचाऱ्यांचा विधी खात्यात घरोबा(उदा...
पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/शासकीय निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन किंवा चारच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीत अंशतः किंवा थोडंफार खोटं बोललं किंवा खोटी विधान केली तर ती फार कोणी असे मनावर घेत नाहीत. नागरीकांना आता सवय झाली आहे. परंतु एखाद्या वर्ग 1 मधील किंवा सुपर क्लास वन अधिकाऱ्याने सफाईदारपणे धांदातपणे खोटं बोलल्यास यामध्ये त्या अधिकाऱ्याची नव्हे तर संपूर्ण महानगरपालिकेची बदनामी होते. खोटं किती बोलावं, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा राहिली असल्याचे दिसून येत नाही. तारीख पे तारीख… तारीख पे तारीख…. झूट पे झूट…. झूट पे झूट… लबाडीचा कळस घातला आहे. पुणे महापालिकेच्या विधी विभागातील खोटी माहिती माध्यमांत प्रसारित करून पुणे महापालिकेची बदनामी करून न्यायालयीन व्यवस्थेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून अविश्वास दाखविल्या प्रकरणी मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर शिस्त...
पुणे महापालिकेतील मागासवर्गीय अभियंते पदोन्नतीपासून वंचित

पुणे महापालिकेतील मागासवर्गीय अभियंते पदोन्नतीपासून वंचित

शासन यंत्रणा
पुणे महापालिका किती वर्ष मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा छळ करणार…सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला तरी 20 वर्ष पदोन्नती नाही… विभागीय आयुक्त कार्यालयाकडील मागासवर्गीय कक्षाच्या पत्राला केराची टोपली… पुणे/दि/ नॅशनल फोरम/राज्यात मागील 40/50 वर्ष सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांनी भारतीय संविधानातील आरक्षण व पदोन्नतीचे आरक्षणाची किंवा कालबद्ध पदोन्नतीची प्रभावी अंमलबजावणी केली असती तर आज शासकीय कार्यालयातील नोकरीतील पदाचे आरक्षण व पदोन्नतीच्या आरक्षणाचा विचका झाला नसता. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा-सेना या पक्षांनी केवळ मागासवर्गीय बहुजन समाजाबद्दल कायम दुजाभाव ठेवुन घटनात्मक आरक्षणाची पायमल्ली केली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी अक्षरशः संगनमताने मागासवर्गीय जनतेवर सुड उगविला असल्याचे आज पुन्हा दिसून आले आहे. पुणे महापालिकेतील नोकर भरतीमधील गैरकारभार बाहेर आला असून,...
पुणे महानगरपालिकेत टेंडरराज,<br>ठेकेदारांच्या सोईसाठी टेंडर मधील अटीं मध्ये बदल- राष्ट्रवादीचा आरोप

पुणे महानगरपालिकेत टेंडरराज,
ठेकेदारांच्या सोईसाठी टेंडर मधील अटीं मध्ये बदल- राष्ट्रवादीचा आरोप

शासन यंत्रणा
pmcpune पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महानगरपालिकेत रस्त्याच्या कामाच्या टेंडरमध्ये ठराविक ठेकेदराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करणयासाठी व त्यात दबाव आणून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनपेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत. तसेच गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे सुरू असलेले टेंडरराज राज्यात शिंदे फडणवीस सरकार अल्यानंतर पुन्हा सुरू झाले असून यात सर्वसामान्य पुणेकरांच्या कररूपी पैश्यांची उधळपट्टी करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर राजरोसपणे दरोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुणे महानगरपालिकेतील विधी विभाग, बांधकाम विभाग, कामगार कल्याण व सामान्य प्रशासन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संविधान परिषद...