Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील सा.बां. मंडळात अतुल चव्हाण आहेत, मग चिंताच मिटली बुव्वाऽऽऽ

पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे मुख्यमंत्री कार्यालय आणि वित्त विभागांच्या जीआर वरून महाराष्ट्रातील जनतेला समजत आहे. त्यातच कोरोना महामारीचे कारण सांगुन विकास कामांना खिळ बसली आहे. परंतु पुण्याच्या सा.बां. मंडळ आणि विभागात सगळचं कसं आलबेल आहे. इथ कोरोना नाही आणि खडखडाट देखील नाही. जिल्हा नियोजन मंडळाकडील निधीवर सध्या जोर असून, जेवढं उपसता येईल तितकं उपसण्याच पारंपारीक काम पुण्यातील सा.बां. मंडळ आणि विभागीय कार्यालयाकडून सुरू आहे. पुण्यातील सा.बां. मंडळात अतुल चव्हाण आहेत, नो टेंशन ओन्ली पेंशन अशी स्थिती आज शासनाच्या सा.बां. खात्यात झाली आहे.


सा.बां. खात्यातील सगळीचं कामं फुटपट्टी आणि गुण्यात करावी लागतात. खिडकीचं माप आणि भिंतीची लांबी रूंदी ही आकडेवारीत येते, त्यामुळं तिथं प्रत्यक्षातील माप बदलता येत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार हा दुरपर्यंत दिसत नाहीच. पण मापात पाप कस्सं करायचं ह्याच प्रशिक्षण याच खात्यात सहजगत्या मिळते.
सा.बां मंडळातर्ंगत असलेल्या खात्यात त्यामुळेच एकाच कार्यासनात वर्षानुवर्षे अधिकारी आणि कर्मचारी कसे काय राहू शकतात त्याचे हे गमक आहे. सध्या लिपिक संवर्गातील बदल्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्या बदलींचा आगडोंब उसळला आहे. लिपिक जागा सोडत नाहीत. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक देखील आपली जागा सोडत नाहीत. बरं… बळे बळं बदली झालीच तर दुसर्‍या विभागात देखील त्यांना पाहिजे तीच कार्यासन मिळतात, त्यामुळे इकडं काय आणि तिकडं काय… चोहीकडे आनंदी आनंद गडे….


मागील चार सप्ताहापासून लिपिक संवर्ग आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्या बदल्यांबाबत चर्चा सुरू आहे. परंतु अतुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पुण्यातील सा.बां. मंडळ जागेवरच हलायला तयार नाही. आजही बदल्या थांबविण्यासाठी इथली मंडळी तयारीत बसली आहेत. ना भय, ना भिती. कारण एकच आहे, अतुल चव्हाण आहेत मग चिंता ती कसली बुव्वाऽऽऽ….