Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

देशात दारू पिणार्या १६ कोटी लोकांपैकी ६ कोटी अट्टल बेवडे

नवी दिल्ली : देशात किती लोकं दारू पितात याचा तपशीलवार आकडा केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केला आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी ही आकडेवारी राज्यसभेत मांडली आहे. या आकडेवारीनुसार देशातले १६ कोटी नागरिक दारू पितात तर यातले ६ कोटी अट्टल बेवडे आहेत.

       सामाजिक न्यायमंत्रालयाने पहिल्यांदाच व्यसने करणार्‍या नागरिकांचा आकडा कळावा यासाठी सर्वेक्षण केलं होतं. २०१८ साली हे सर्वेक्षण करण्यात आलं असून २ लाख १११ कुटुंबाच्या आधारे हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला. देशातील सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कुटुंबे यासाठी निवडण्यात आली होती. अंमली पदार्थ किती प्रमाणात आणि कसे सेवन केले जातात याचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला होता. ४ लाख ७३ हजार ५६९ व्यक्तींना या सर्वेक्षणाअंतर्गत प्रश्‍न विचारण्यात आले होते.

       सर्वेक्षणात १६ कोटी नागरीक दारू पितात आणि ३.१ कोटी नागरीक भांगेचं सेवन करतात असं दिसून आलं आहे. २.२६ कोटी नागरीक अफूचे सेवन करत असल्याचंही म्हटले आहे. १० ते ७० वर्ष वयोगटामध्ये दारू किंवा इतर अंमली पदार्थांचं सेवन करण्याचे प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे.