Thursday, March 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

क्राईम बॅ्रंचचा अवैध धंद्यांवर रट्टा ! १०० हॉटेलांची तपासणी,२६ गुन्हेगारां पैकी १४ जणांना घेतलं ताब्यात

pune police zon 1

पुणे/ दि/ प्रतिनिधी/

       पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रँचच्या विविध पथकांनी बंडगार्डन, कोरेगाव पार्क, चतुःश्रृंगी, औंध भागातील १०० हॉटेलांची तपासणी  केली. तसेच अवैध धंद्यावर छापे टाकुन ३२ पब, हॉटेलावंर खटले भरण्यात आले तर १४ सराईतांना अटक करण्यात आली आहे.

       पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रँचचे नुतन उपायुक्त बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. बच्चनसिंग यांच्या आदेशानुसार पोलीसांच्या पथकाने शहराच्या विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईत शहरातील जुगार अड्डे, मध्यरात्री सुरू असलेले पब, हॉटेल्सवर छापे टाकण्यात आले. शनिवारी रात्रौ दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली, ती पहाटेपर्यंत सुरू होती.

       पोलीसांनी पुणे शहरातील नामांकित असलेल्या बंडगार्डन, कोेरेगाव पार्क, चतुःश्रृंगी व औंध भागातील १०० हॉटेलची तपाणी केली. बहुतांश हॉटेल्स रात्रौ उशिरापर्यंत सुरू असल्याचे आढळुन आले आहे. दरम्यान उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर खटले भरण्यात आले आहेत.

       दरम्यान कात्रज येथे रात्रौ उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, हातगाडी पानटपरीवर कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल अंबिका वर छापा टाकण्यात आला.

       या कारवाई दरम्यान २६ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यातील १४ जणांना अटक करून चौकशी करण्यात येत आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत अलाह द टिक्की बार, बॅकस्टेज पब, इस्क पब, मकाझा पब, पुणे सोशल नाईट रायडर, कनक, फ्लाय, हायसह ३२ हॉटेल आणि पब विराधोत कखटले दाखल केले. वारजे माळवाडी भागात बेकायदा दारू विक्री करणार्‍यांवर कारवाई केली. त्यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती क्राईम ब्रँचचे उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली. तसेच या कारवाई नंतर देखील, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरूद्ध अशाच प्रकारची कारवाई करण्याचे सुतोवाच श्री. बच्चनसिंग यांनी केले आहे.