Friday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

एस.सी, एसटी, ओबीसींनो आपली सत्ता मिळवा – बाळासाहेब आंबेडकर

ambedkar-1

नागपुर/दि/ प्रबुद्ध भारत/

       आरक्षित जागांवरून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी हे गालाम आहेत. त्यांच्याकडून काही होणार नाही. आपल्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवायच्या असतील तर सत्ता आपल्या हातात असायला हवी. शासनात एक किंवा दोन माणसे पाठवुन काहीही होणार नाही. शासनाच्या धोरणात सहभागी व्हावे लागेल आणि त्यासाठी किमान ५० पेक्षा अधिक माणसे विधानसभेत पाठवा. एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी सत्तेत बसले, तर त्यांना कुणाला न्याय मागण्याची गरज नाही. केवळ नियोजनाची आवश्यकता आहे, हे नियोजनच देशाचे संविधान वाचवू शकते. तेंव्हा आपली सत्ता मिळवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आबेडकर यांनी येथे व्यक्त केले.

       विविध संघटनांच्या वतीने विवर्य सुरेश भट सभागृह येथे स्कॉलरशिप परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

       बाळासाहेब आबेडकर पुढे म्हणाले की, स्कॉलरशिपचा विषय आण गेल्या वर्षातही सोडवू शकलो नाही. १९७ मध्ये ज्यावर बोलले जात होते. तेच आजही बोलतो. पंरतु तेंव्हा समस्यांवर उपाय सुद्धा सुचविले जायचे. आज ती परिस्थिती दिसत नाही. विषय परिस्थिती व विषम शिक्षण जो पर्यंत आहे. तसेच शासन शिक्षणाची जबाबदारी घेत नाही, तो पर्यंत आरक्षण व स्कॉलरशिप मिळायलाच हवी. महाराष्ट्र सरकार हे सर्वाधिक प्रतिगामी सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकार जितकी स्कॉलरशिप देते तितकी विद्यार्थ्यांना मिळते. राज्य सरकारचा त्यात कुठलाही हिस्सा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

       यावेळी ओबीसी एकता मंचचे अध्यक्ष सुनिल पाल, ऍड. स्मिता कांबळे, आदिवासी विद्यार्थी संघाचे विलास उईके, अतुल खोब्रागडे, डॉ. सिद्धांत भरणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रस्ताविक अमन कांबहे यांनी केले. संचालन प्रितम बुडकूंड यांनी केले. प्रफुल्ल भालेराव यांनी आभार मानले.

विदर्भ हे आबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकते –

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले होते. याची सर्वांनाच माहिती आहे. परंतु का केले हे मात्र कुणाल सांगता येत नाही. विदर्भ हे आबेडकरी विचारांचे राज्य होऊ शकते. ते देशातील शोषित वंचितांच्या प्रश्‍नांना वाचा फोडणारे केंद्र ठरू शकते असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजपाला हरवण्यासाठी कॉंग्रेसला मत द्यायला हवे असे नागपूरच्या जनतेला वाटते. पण आपण येथे २८ टक्के आहोत. इतर समाजाला सोबत घेवून आपण स्वतःच इथले सत्ताधारी होऊ शकतो. असेही तुम्हाला वाटत नाही असा चिमटाही त्यांनी काढला.

स्कॉलरशिप मिळायलाच हवी, पण जे विद्यार्थीच नाही त्यांचे काय…

       आपण टीकार आहोत, निर्मात नाहीत. अशी टीका आपल्यावर नेहमी केली जाते. त्यामुळे आता आपल्याला निर्मात्यांच्या भूमिकेत यावे लागेल. स्कॉलरशिपचा मुद्दा हा विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. स्कॉलरशिप मिळायलाच हवी. परंतु जे विद्यार्थी होऊ शकले नाही, त्यांचे काय… त्यांचा विचारही करावा लागेल. ते विद्यार्थी कसे होतील हे पहावे लगोल. सर्वांनाच शिक्षण ळिायला हवे. या देशातील व्यक्ती किमान दाहवीपर्यंत शिकेली असावी यासाठी १० वी पर्यंत शिक्षण सक्तीचे व मोफत असावे अशी मागणी आपली असायला हवी असेही ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले.