Friday, January 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

सा.बां. पुणे विभागातील कार्यमुक्ततेचा दहावा …. आतारी शासनाला कळवा

पुणे/दि/ प्रतिनिधी/
सा.बां. उपविभाग क्र. १ तद्नंतर २ ते थेट ३ व ५ आणि ससुन या पाच उवविभगाचं डोळ्यात न मावणारं स्थापत्य तंत्राशी जुलळेलं सा.बं. पुणे विभागाचं पवित्र कार्यक्षेत्र (पवित्र म्हणूया का…. नाहीतर एखादा फारच तोंड वंगाडून बाष्कळ खिल्ली उडवायचा. तुमचा तिसरा मजला रिकामाच राहिला. मग तुम्हाला सा.बां. पुणे डिव्हीजन कळलेच नाही.) हळु हळु उमगेल तेंव्हा उमगेल. पापभिरू व्यक्तीला सारच पवित्र भासते. वास्तवात या पाच उवविभगांवर हक्क सांगणारा सा.बां. पुणे विभाग म्हणजे उपविभागांची जीवन रेखाच म्हटलं पाहिजे (म्हणावं लागेल का…)
शाखा ते उपविभाग, उपविभाग ते थेट विभागात कार्यरत असणार्‍यांची आस्पिना ही सा.बां. मंडळ पुणेकडे जुळलेल्या तत्पुर्वी सा.बां. पुणे विभगााच्या आस्थपनेच्या नमनाला घडाभर तेल आहेच.

सा.बां. पुणे विभागातील वेतनधारित भक्तांचे अनेक अर्थाने कागदावर नाचणारे अपराध पोटात घेणारा. सर्वदा त्यांची काळजी वाहणारा. कोणालाहीवेतना व्यतिरिक्त वाम मार्गाच्या कमाईमुळे तहानलेला आणि उपाशी न ठेवणारा ही सा.बां. पुणे विभगाची ख्याती बरं का…
सेंन्ट्रल बिल्डंगच्या आवारातील मोठ्या इमारतीच्या बगलेत सवलेली लांबलचक पसरलेले दोन मजले, सुरेश दगडी बाधंकाम, दणकट बांधीच्या मोठमोठ्या पायर्‍या, प्रशस्त परिसर १९४६ सालाचा वारसा जतन करणारी सा.बां. पुणे विभगााची इमारत ( इथल्या हवेचं विचारता का…) मोळकी हवा नाहीए. इथली हवा निर्ढावलेली वारंवार दडपशाहीनं भारलेली.
हे झालं आऊट डोअर स्केचिंग. हे कोणी पाहिलं तर सहजतेने वर्णन करून सांगेल. इनडोअर स्केचिंगमध्ये तर जसे शहरातल्या रस्त्याच्या मध्यभागी घोळकया घोळक्याने बसलेले कळप. रंगाचे निरनिराळे कॉम्पोझिशन्सच. कितीही मोठ वाहन रस्त्यावर आलं तरी हे कळप ढिम्म… हालतच नाहीत. तसंच काहीसं साम्य असणारं वातावरण सा.बां. पुणे विभागांचं. दहा दहा/ १० वर्षे एकाच जागी स्वतःला यत्किंचित डिस्टर्ब होऊ न देता ठाण मांडून बसलेली ही मंडळी. नियम अधिनियम, ऍक्ट यांना न घाबरणारी. मग कधी कधी यांच्या जागेवर दुसराच प्रयत्न करतो तेंव्हा त्याला आडकाठी केली जातेच. यांच्या जागेवर बसणार तरी कोण हो… बदली कायद्याच्या आदेशाने फिरकणारा. तो जसा येतो तसाच यांच्या वशिंडाला हात लावुन नमस्कार करित आल्या पाऊली मार्गक्रम करतो. त्याला समजतं दणदणीत अडथळे आहेत. पण मध्या काळात सा.बां. प्रकल्प विभाग कडी कोयंड्यात बंद करण्यात आला. तेंव्हा त्याच्या कार्यत्राचं विभाजन अन्य विभागातम करण्यात अलं. उरला प्रश्‍न कर्मचार्‍यांचा त्यांनाही अन्य विभागात मर्ज करण्यात आलं. या समावेशनच्या प्रक्रियेत सा.बां. विभागात आलेल्या एका कर्मचार्‍याला तर किमान तीन महिने तर वेतनाव्यतिरिक्त, टेबल वर्क व्यतिरिक्त केवळ विभागातील कोपरेसुद्धा बसायला मिळत नव्हते. उलट विभागात फक्त रूजु झाल्याचं समाधान होत. दोष कोणाचा मानायचा. माझे कर्मचारी माझे ऑफीस स्वाभिमानाने सांगणार्‍याचा की अकरा की बारा वाजता कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांच्या अगोदर कितीतरी तास अगोदर येऊन कामाला जुंपून घेणार्‍या विभाग प्रमुख कार्यकारी अभियंत्यांचा.
सा.बां. इमारती विभागातून ट्णकन उडी मारून सा.बां. पुणे विभागात बस्तान बसवणार्‍या कार्यकारी अभियंता श्री. तेलंग यांचे सुरूवातीचं वर्ष कमालीच विभागाला शिस्तबद्धतेत आणून ठेवणारं भासले, का तर त्यांच्याच विभागातील अभियंते चर्चेतून मानस मांडतांना आढळत होते. की तेलंग बदली कायदयाचे आधारे विभागातील जुनाट खोड उपटून फेकून देतील अन एका नवीन विभागाची शिस्तबद्ध रचना करतील. पण छे…. कशाचं काय… आपले पाय आपल्या तोंडात मग तेलंग यांनी नाविन्यपूर्ण काम केलं. जुनाट खोडांना शंदूर फासला. वर्षानुवर्षे ठेकेदारांनी लाखाला शंभर रूपयाचा नैवेध दाखवायचा या शेंदूर फासलेल्या खांडांना. ही प्रथा आणखी घट्ट झाली. उलट या प्रथेला, या खोडांना तेलंग यांचे सुरक्षा कवचही मिळालं.
नेमकं घडलं काय… राजहंस मेला अन कावळा जन्माला आला, मांसाच्या तुकड्याएैवजी हाडकावरच तुटून पडला. आता तर सार्‍या विभागभर काव काव कावच….
या भालदार चोपदरांच्या काव कावीत तेलंगही एवढे गुरफटले आहेत की, कार्यालयीन शिरस्त्यात तेलंग या भालदार चोपदारांना केबीनमध्ये घेवून बसले की शाखेतून,उपविभागातून आलेले अभियंते तिष्ठेत उभे असतात. मग या तिष्ठतेच्या वेळेची मर्यादा नसतेच. काल परवा पर्यंत ठेकेदाराने केलेल्या कामाच्या पाहणीसाठी ठेकेदाराला घ्या टेप म्हणणारे श्री. तेलंग ठेकेदारांना केबीनबाहेर तिष्ठत ठेवत होते.
शिस्तीचा भोक्ता असणार्‍या या विभाग प्रमुख श्री. तेलंग यांनी बदलीकायदयाला कसा गुंगारा देवुन स्वतःवर शिस्तभंगाची कारवाई करून घेण्याचे प्रयोजन आखले आहे, ते स्पष्टच जाणवते आहे. वास्तवात बदली कायदयाच्या आधारे बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या झालेल्या बदल्यांच्या कार्यमुक्ततेची कोंडी आता फुटण्याची वेळ येवून ठेपली आहे.
ज्या नागरी सेवा मंडळाच्या बैठकीत नियतकालिक बदल्यांच्या माहिती आधारे ज्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्य कर्मचार्‍यांना श्री. तेलंग हेतूपुरसर व विविध कारणांच्या माध्यमातून त्या कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करण्यास कुचराई करित असतील तर सा.बां. पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. रा.सा. राहणे यांना वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचार्‍यांचीब दली आदेशित करण्याचे शासनाच्या अभिलेख्यात नमूद असलेले व प्रदान करण्याचे हक्क व अधिकार आहेत. तर त्याच कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करण्याचे अधिकार आहेत. उलट श्री. तेलंग यांनी कार्यमुक्ततेत विलंब करून बदली कायदयाचा नागरी सेवा मंडळाचा, शासनाच्या कार्यपद्धतीचा अवमान करून जे उल्लंघन केले आहे, याचा त्यांच्यावर केवळ ठपका न ठेवता त्यांना शिस्तभंगाच्या चौकशी कारवाईसाठी पुढे आणण्यासाठी अधीक्षक अभियंता श्री. राहणे यांनी सा.बां. प्रादेशित विभाग पुणे मुख्य अभियंता श्री. साळुंके यांचे कार्यालयामार्फत सा.बां. विभाग मंत्रालयाचे खाते प्रमुख यांना अहवाल पाठविणे आज तरी आवश्यक ठरणार आहे.